शेती विषयक माहिती: मित्रांनो, शेती हा मानवी संस्कृतीचा सर्वात महत्त्वाचा असा प्राचीन असणारा व्यवसाय आहे. मित्रांनो अन्न, वस्त्र, निवारा आणि इंधन तसेच जनावरांसाठी चारा यांसारख्या मानवाच्या अत्यंत गरजेच्या असणाऱ्या गरजा या शेती द्वारे नेहमी पूर्ण केल्या जातात. मित्रांनो शेती हा व्यवसाय म्हणून विकसित झालेला आहे.
मित्रांनो आजकालच्या काळामध्ये शेतीचे अनेक व्यावहारिक परिणाम स्पष्ट झालेले आहेत. चला तर मित्रांनो आज आपण शेती विषयक माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया शेतीविषयक माहिती अगदी सविस्तर रीत्या.
अनुक्रमणिका
शेती विषयक माहिती मराठी मध्ये Agriculture information in Marathi
मित्रांनो, सर्वसाधारणपणे सर्वांनाच आपल्यापैकी शेतीही माहित असते परंतु नुसती शेती हे नाव असून देखील चालणार नाही. मानवाच्या मूलभूत गरजांपैकी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे अन्न हे शेती द्वारेच आपल्याला मिळत असते.
मित्रांनो आपल्यापैकी काही जण फक्त शेती हे नाव ऐकूनच असतील परंतु त्यांना शेतीबद्दल पुरेशी माहिती अजून मिळालेली नसेल. म्हणूनच मित्रांनो आज आम्ही आपल्यासाठी शेती विषयक माहिती अगदी सविस्तर घेऊन आलेलो आहोत.
शेतीची व्याख्या काय आहे
मित्रांनो, जगातील बहुतांशी लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे शेतकऱ्यांनी उदरनिर्वाहासाठी धंदा म्हणून स्वतःच्या शेतावर चालू केलेला व्यवसाय म्हणजे शेती अशी शेतीची व्याख्या होते.
मित्रांनो, शेतीमधून काढायचे असणारे उत्पादन यानुसार शेतीचे अनेक वेगवेगळे प्रकार पडत असतात. त्यामध्ये उसाचा मळा, पशुप्रदान शेती, मत्स्य शेती, भात शेती अशा प्रकारे शेतीचे प्रकार पडत असतात.
मित्रांनो त्याचप्रमाणे पाण्याच्या तसेच सिंचनाच्या उपलब्धतेनुसार बागायती शेती व जिरायती शेती असे देखील शेतीचे अनेक प्रकार पडत असतात.
तसेच खतांच्या वापरानुसार देखील शेतीचे अनेक प्रकार पडत असतात. त्यामध्ये सेंद्रिय शेती तसेच रासायनिक शेती हे प्रकार नेहमी पडत असतात नैसर्गिक घटकांमुळे शेतीच्या प्रकारांमध्ये विभिन्नता आढळून येत असते.
मित्रांनो, भारत देशामध्ये मुख्य तीन ऋतू आहेत त्यामध्ये हवामानामध्ये होणारे बदल यामुळे जमीन भूरचना यादेखील सतत बदलत असतात.
मित्रांनो, एखाद्या भागातील जमिनीवर कोणते पीक घ्यावे हे त्या भागातील असणारे हवामान आणि जमिनीवर ठरवले जाते. चला तर मित्रांनो आता आपण शेतीचे कोणकोणते प्रकार आहेत याची माहिती जाणून घेऊया.
शेतीचे असणारे प्रकार
1) जिरायती शेती
मित्रांनो, जिरायती शेती या शेती पद्धतीमध्ये 50 ते 100 सेंटीमीटर च्या आसपास असणाऱ्या पावसाच्या प्रमाणावर वरून पिके घेतली जातात.
मित्रांनो भारतातील काही भागांमध्ये खरीप पिके आणि रब्बी पिके अशा दोन हंगामामध्ये पिके घेतली जातात. खरीप आणि रब्बी पिकांसाठी सेंद्रिय खतांचा वापर हा मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो.
2) बागायती शेती
मित्रांनो, या शेती पद्धतीमध्ये शेतातील पिके ही मुख्य पावसावर अवलंबून असतात. त्यामुळे या पिकांचे उत्पादन हे जिरायती पिकांपेक्षा चांगल्या प्रकारे अधिक असते.
पुरेसा पाणीपुरवठा असल्यामुळे या बागायती शेतीमध्ये पिके वर्षभर घेतली जातात. पाण्याची जास्त प्रमाणामध्ये साठवणूक करून बागायती शेती केली जाते.
3) दुर्जल शेती
मित्रांनो, या शेती प्रकारामध्ये ज्या ठिकाणी 50 सेंटिमीटर पेक्षा कमी पाऊस पडत असतो अशा भागामध्ये दुर्जन शेती केली जाते. जमिनीमध्ये ओलावा टिकवणे तसेच भूसंरक्षण करणे या समस्या आधारित दुर्जल शेती केली जाते या शेती पद्धतीमध्ये पिकांची निवड ही सुद्धा मर्यादित केलेली असते.
4) फुल शेती
फुल शेती हा देखील मित्रांनो बागायती शेतीचा एक प्रकार आहे. पूर्वीपासूनच फुलांचा होणारा मोठ्या प्रमाणातील व्यापार लक्षात घेऊन आजकालच्या काळामध्ये फुल शेती खूपच मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते.
मित्रांनो फुलाचे उत्पादन हे कमी टिकणारे आणि जलद वाहतुकीची सोय असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी फुल शेती ही खूपच फायदेमंद झालेली आहे.
मित्रांनो अलीकडच्या काळामध्ये हरितगृहांचा वापर हा फुल शेती करण्यासाठी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. मित्रांनो फुल शेतीमध्ये गुलाब, निशिगंध यांसारख्या फुलांचे उत्पादन घेतले जाते. आजकालच्या काळामध्ये व्यावसायिक दृष्ट्या फुल शेती ही खूपच महत्त्वाची ठरली गेली आहे.
5) फळबाग शेती
शेतीच्या प्रकारामध्ये फळबाग शेती हा एक प्रकार आहे. या शेती प्रकारांमध्ये मुख्य उत्पादन हे फळे असतात. यामध्ये आंबा, काजू, नारळ, सुपारी, डाळिंब, पेरू अशा प्रकारे फळबाग शेती केली जाते.
तसेच मित्रांनो महाराष्ट्र मधील असणारे पठारी भागांमध्ये लिंबू ,संत्री, मोसंबी यांसारखे फळांचे देखील शेती मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते अशा प्रकारे फळबाग शेती केली जाते.
6) पशुधन आणि दुग्ध व्यवसाय शेती
मित्रांनो, कोणत्याही पिकासाठी नेहमी अनुकूल परिस्थितीमध्ये देखील असणारी शेतजमीन यामध्ये पशुधन शेती केली जाते. तसेच दुग्ध व्यवसाय प्रदान असे शेती केली जाते.
या शेतीमध्ये जनावरांना करण्यासाठी चारा तसेच जनावरांना वैरण याचे उत्पादन घेतले जाते या शेतीसाठी सिंचन सुविधा आवश्यक असते.
7) भाजीपाल्याची शेती
मित्रांनो, हा देखील बागायती शेतीतीलच प्रकार आहे. तसेच निश्चित पाऊस असणे सिंचन सुविधांची उपलब्धता असणे. बाजारपेठेची उपलब्धता असणे.
तसेच इतर साधनांचा वापर असणे यामुळे भाजीपाला शेती हा खूपच फायदेमंद असा असणारा व्यवसाय आहे.
8) रासायनिक शेती
मित्रांनो, या शेती प्रकारांमध्ये फक्त रासायनिक पदार्थांचा वापर करून शेती केली जाते. तसेच उत्पादन वाढीसाठी यामध्ये मर्यादा देखील येत असतात.
तसेच मित्रांनो रोग आणि किडींच्या नियंत्रणासाठी देखील रासायनिक कीटकनाशके आणि रोगनाशके वापरले जातात. अशा प्रकारे काही काळासाठी रासायनिक शेतीमधून उत्पादन वाढविले जाते.
परंतु उत्पादन धान्याची गुणवत्ता ही कमी होत असते. तसेच धान्य मधून जाणारे मानवाच्या शरीरासाठी रासायनिक द्रव्य हे आरोग्याला खूपच धोकादायक ठरू शकतात.
9) सेंद्रिय शेती
या शेतीच्या प्रकारांमध्ये पिकांची तसेच अन्नद्रव्यांची गरज ही जमिनीतून भागवली जाते. तसेच उत्पादन वाढीचे उद्दिष्ट साध्य करत असताना अन्नद्रव्यांचा वापर देखील मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो तसेच शेणखत आणि कंपोस्ट खत पिकांसाठी वापरले जाते.
10) मत्स्य शेती
मित्रांनो, मत्स्य शेतीचा प्रकार हा अलीकडच्या काळामध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये केला जात आहे. माती खोदून मोठ्या आकाराचे तळे निर्माण केले जात आहे.
त्यामध्ये पाणी सोडले जात आहे. आणि या तळ्यामध्ये मत्स्यबीज सोडून माशांच्या जातींची वाढ केली जात आहे. तसेच माशांच्या उत्तम वाढीसाठी शास्त्रीय पद्धतीने त्याचे संगोपन देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये केले जात आहे.
मित्रांनो, वरील प्रमाणे दिलेले शेतीचे प्रकार आणि अशा प्रकारे भारत देशामध्ये तसेच महाराष्ट्र मध्ये शेती केली जाते.
निष्कर्ष
मित्रांनो, आपल्याला वरील प्रमाणे दिलेले शेती विषयक माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे. मित्रांनो आपल्याला वरील प्रमाणे दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.
तसेच मित्रांनो आपल्याला आणखी कोणती माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच मित्रांनो शेती विषयक माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.