कृषी डिप्लोमा माहिती । Agriculture Diploma Information in Marathi, नोकरीची खास संधी

कृषी डिप्लोमा माहिती

कृषी डिप्लोमा माहिती नमस्कार मित्रांनो आज आपण कृषी क्षेत्र मधील कृषी डिप्लोमा माहिती याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.

मित्रांनो आपण जर बारावी पूर्ण केले असेल तर आपल्याला करिअरच्या अनेक वाटा दिसून येतात परंतु अलीकडच्या काळामध्ये कृषी क्षेत्रामध्ये करिअर करण्याच्या संधी ही खूपच मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध झालेले आहेत.

हेच विचार करून आपण जर कृषी डिप्लोमा माहिती इंटरनेटवर शोधत असाल तर आज ही माहिती आपल्यासाठी खूपच उपयुक्त अशी असणारी माहिती आहे. चला तर मित्रांनो सविस्तर जणून घेऊया कृषी डिप्लोमा माहिती याविषयी.

काय आहे कृषी डिप्लोमा माहिती | Agriculture Diploma Information in Marathi

मित्रानो कृषी डिप्लोमा माहिती जाणून घेणे अगोदर आपण कृषी पदविका अभ्यासक्रम हा जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

काय आहे कृषी पदविका अभ्यासक्रम

कृषी डिप्लोमा माहिती

मित्रांनो, कृषी पदविका अभ्यासक्रम हा दोन वर्षांचा कालावधी चा असणारा अभ्यासक्रम आहे. पहिल्या वर्षाच्या अभ्यासक्रमांमध्ये कृषी मुलतत्वे, प्रमुख पिकाचे उत्पादन व तंत्रज्ञान फळे व भाजीपाला उत्पादन तंत्रज्ञान कृषी अवजारे, यंत्रसामग्री आधुनिक सिंचन पद्धती पीक संरक्षण

ग्रामीण भागातील समाजशास्त्र कृषी विस्तार व माहिती तंत्रज्ञान अशा एकूण अकराशे गुणांचा अभ्यासक्रम पहिल्या वर्षी असतो. यामध्ये साडेपाचशे गुण लेखी परीक्षा आणि साडेपाचशे गुण प्रात्यक्षिक ला असतात.

तसेच मित्रांनो दुसऱ्या वर्षी सहकार पतपुरवठा व पणन बीजोत्पादन तंत्रज्ञान तसेच रोपवाटिका व्यवस्थापन त्याचप्रमाणे फुलशेती व हरितगृह तंत्रज्ञान, पशुसंवर्धन कुक्कुटपालन व रेशीम उद्योग

त्याचप्रमाणे शेतमाल प्रक्रिया सेंद्रिय शेती कृषी आधारित उद्योग यामध्ये प्रात्यक्षिक आणि लेखी असे एकूण बाराशे गुण हे कृषी पदविका अभ्यासक्रमामध्ये असतात. यामध्ये प्रात्यक्षिक मध्ये साडे आठशे तर लेखी मध्ये साडेतीनशे गुण निश्चित केलेले असतात.

कृषी डिप्लोमा प्रवेश प्रक्रिया

मित्रांनो, कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया हि साधारणपणे जुलै ते सप्टेंबर दरम्यान राबवली जाते. दहावी उत्तीर्ण असणे ही यासाठी प्रमुख पात्रता आहे.

तसेच शासकीय संस्थेमध्ये प्रवेश घेतल्या दन्ही वर्षाची फी साधारणपणे 40 हजारांच्या जवळपास असते. त्याचप्रमाणे आपण जर खाजगी संस्थेमध्ये कृषी डिप्लोमा ला प्रवेश घेतला तर खासगी संस्थेची 60 हजारांपेक्षा जास्त असू शकते.
अशाप्रकारे कृषी पदविका तसेच कृषी डिप्लोमा ची प्रवेश प्रक्रिया चालत असते.

कृषी डिप्लोमा अभ्यासक्रम नेमका काय आहे

मित्रांनो, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या तर्फे कृषी डिप्लोमा अभ्यासक्रम चालवला जातो. 10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शेतीचे शिक्षण मिळावे म्हणून हा डिप्लोमा अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेला आहे. तर ग्रामीण भागांमध्ये स्वयंरोजगार याबाबत जागरूकता निर्माण व्हावी यामुळे राज्य सरकारनं प्रशिक्षित कर्मचारी वर्ग उपलब्ध व्हावा म्हणून अभ्यासक्रम चालवलेला आहे.

विद्यापीठाची एकूण केंद्रे आणि 76 कृषी प्रशिक्षण शाळा यांच्यामार्फत हा अभ्यासक्रम घेतला जातो. प्रत्येक केंद्राची प्रवेश क्षमता ६० इतकी असते. जिल्हानिहाय गुणवत्ता यादी द्वारे प्रवेश दिले जातात. दरवर्षी एकूण पाच हजार पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेत असतात.

कृषी विद्यापीठाचे असणारे कार्यक्षेत्र

मित्रांनो, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी चे कार्यक्षेत्र हे अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, आणि कोल्हापूर या ठिकाणी आहे.

कृषी डिप्लोमा माहिती निष्कर्ष

मित्रांनो, वरील प्रमाणे दिलेली कृषी डिप्लोमा माहिती आपल्याला नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे. तसेच मित्रांनो आपल्याला कृषी डिप्लोमा बद्दल आणखी काही माहिती हवी असल्यास आपण कमेंट द्वारे आम्हाला कळवा.

आम्ही आपल्यासाठी नेहमी नवनवीन माहिती घेऊन येत असतो. तसेच मित्रांनो कृषी डिप्लोमा माहिती आपल्या मित्रांसमवेत शेअर करण्यास देखील विसरू नका.

कृषी डिप्लोमा माहिती । Agriculture Diploma Information in Marathi, नोकरीची खास संधी

5 thoughts on “कृषी डिप्लोमा माहिती । Agriculture Diploma Information in Marathi, नोकरीची खास संधी

  1. कृषी डिप्लोमा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर या अभ्यासक्रमास 10+2 12वी समकश पुढील शिक्षणास धरले जाते की नाही जर समकक्ष धरले जात नसेल तर विद्यार्थ्यांचे नुकसान आहे आणि जर समकक्ष धरले जात असेल तर कोणत्या शिक्षणास धरले जाते ते कळवावे
    विनंती
    किरण थोरात

Leave a Reply

Your email address will not be published.

Scroll to top