Connect with us

Information

अल्पभूधारक दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे, Alpabhudharak Dakhla Document in Marathi

Published

on

अल्पभूधारक दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे

अल्पभूधारक दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे: मित्रांनो आजकालच्या काळामध्ये केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना या अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी राबवल्या जात असतात. याच योजनेचा फायदा घेण्यासाठी आपल्याकडे अल्पभूधारक शेतकरी असल्याचा दाखला असणे खूपच गरजेचे असते.

याचाच विचार करून आज आम्ही आपल्यासाठी अल्पभूधारक दाखला काढण्यासाठी कोण कोणते कागदपत्रे लागतात याबद्दल माहिती घेऊन आलेलो आहोत. चला तर मित्रांनो वेळ न वाया घालवता जाणून घेऊया अल्पभूधारक दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणकोणते आहेत ते.

अल्पभूधारक शेतकरी असल्याचा दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे

मित्रांनो, देशामध्ये मोठ्या प्रमाणात लोक शेती करत असतात भारत हा कृषिप्रधान देश आहे असे देखील बऱ्याच वेळा म्हटले जाते. कोरोना काळात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था व कृषी व कृषी प्रयोग व्यवसायांनी सावरल्याचे समोर आल्याचे दिसते.

मित्रांनो केंद्राच्या तसेच राज्य सरकारच्या विविध योजना या अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी नेहमी असतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांच्याकडे अल्पभूधारक दाखला असणे खूपच गरजेचे असते. आज आपण अल्पभूधारक दाखला काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

1) ओळखीचा पुरावा

ओळखीचा पुरावा यामध्ये आपण पॅन कार्ड, पासपोर्ट, आधार कार्ड, मतदान कार्ड रोजगार हमी योजना ओळखपत्र तसेच ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी एक ओळखीचा पुरावा आपल्याकडे असावा लागतो.

2) पत्त्याचा पुरावा

आधार कार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड, पाणी बिल, ड्रायव्हिंग लायसन्स, विज बिल, घरपट्टी, सातबारा उतारा यापैकी एक कागदपत्र लागत असते.

3) इतर कागदपत्रे

मित्रांनो, आपल्याला जर अल्पभूधारक शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आपल्याला जमिनीचा सातबारा लागत असतो. तसेच तलाठ्याचा अहवाल देखील लागत असतो.

4) स्वयंघोषणापत्र

मित्रांनो, अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र काढण्यासाठी आपल्याला स्वयंघोषणापत्र भरून द्यावे लागत असते हे सर्वांसाठी अनिवार्य केलेले असून हे अर्ज सोबत भरून द्यावे लागते. आपले सरकार पोर्टलवर किंवा तहसीलदार कार्यालयांमध्ये आपण वरील प्रमाणे दिलेली सर्व कागदपत्रांसह अर्ज सादर केल्यानंतर आपल्याला पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये अल्पभूधारक दाखला मंजूर होईल.

अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र कोठे काढता येते

मित्रांनो, अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र सेतू केंद्रामध्ये काढता येते. तसेच महाराष्ट्र सरकारने सुरू केलेले आपले सरकार पोर्टलवर देखील अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र काढता येते. यासाठी आपल्याला आपले सरकार या वेबसाईटवर लॉगिन करावे लागते.

निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला अल्पभूधारक शेतकरी दाखला काढण्यासाठी वरील प्रमाणे दिलेली कागदपत्रे नक्कीच उपयोगी पडणार आहेत. तसेच अल्पभूधारक शेतकरी दाखला काढण्यासाठी वरील प्रमाणे दिलेली कागदपत्रे अगदी महत्त्वाची आहेत. यासाठी आपण आपल्या जवळच्या तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन देखील हा दाखला काढू शकता.

तसेच आपले सरकार या वरती देखील अर्ज करून आपण हा दाखला काढू शकता. मित्रांनो आपल्याला जर आपले सरकार यावरती दाखला कसा काढायचा हे माहीत नसल्यास आपण आम्हाला कमेंटद्वारे नक्की विचारा.

आम्ही त्याबद्दल अगदी सविस्तर माहिती घेऊन येऊ तसेच मित्रांनो आपल्याला अल्पभूधारक दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच वरील प्रमाणे दिलेली माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending