Connect with us

Information

Anganwadi Sevika Honyasathi Kay Karave in Marathi | अंगणवाडी सेविका होण्यासाठी काय करावे लागेल

Published

on

अंगणवाडी सेविका होण्यासाठी काय करावे लागेल

अंगणवाडी सेविका होण्यासाठी काय करावे लागेल: नमस्कार मित्रांनो, आज आपण अंगणवाडी सेविका होण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल याबद्दल अगदी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून या योजनेअंतर्गत अंगणवाडी मधील असणाऱ्या अंगणवाडी सेविका तसेच मिनी अंगणवाडी सेविका तसेच मदतीने या मानधनी कर्मचाऱ्यांसाठी नियुक्ती संदर्भात शासनाने सर्व आदेश यापूर्वी दिलेले आहेत.

आज आपण अंगणवाडी सेविका होण्यासाठी काय काय करावे लागेल याबद्दल अगदी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया अंगणवाडी सेविका होण्यासाठी काय करावे लागेल याबद्दल अगदी सविस्तर माहिती.

अंगणवाडी सेविका होण्यासाठी काय करावे लागेल आणि अंगणवाडी भरतीसाठी लागणारी कागदपत्रे

मित्रांनो, अंगणवाडी सेविका हे पद हे बालविकास सेवा योजनेअंतर्गत प्रत्येक अंगणवाडीमध्ये भरली जात असते. अंगणवाडी सेविकेचे काम हे मुलांना शिकवणे तसेच कार्यालयीन काम पाहणे तसेच अंगणवाडीमध्ये नाव नोंदवलेल्या मुलांना शासनामार्फत आलेला पोषण आहार वाटप करणे तसेच गरोदर मातांना पोषक आहार वाटप करणे.

त्याचप्रमाणे लहान मुलांचे पोलिओ डोस शिबिरामध्ये सहकार्य करणे तसेच महिला, बालक संबंधित सरकारी योजनांची यांना प्रत्येकांना माहिती देणे अशी अनेक कामे अंगणवाडी सेविकेला करावी लागत असतात.

अंगणवाडी सेविकेची कामे कोणती आहेत

1) मुलांसाठी पिण्याचे पाणी भरणे.

2) आपल्या अंगणवाडी व सभोवतालचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवणे.

3) बालकांची स्वच्छता ठेवणे तसेच त्यांना स्वच्छ राहण्यासाठी मदत करणे.

4) बालकांचा आहार स्वच्छता पूर्वक शिजवणे तसेच त्यांचे योग्य रीतीने वाटप करणे.

5) लहान बालकांच्या माता-पित्यांची नेहमी संपर्क ठेवणे तसेच त्यांना अंगणवाडीमध्ये मीटिंग असल्यावर बोलावणे.

6) अंगणवाडी कार्यकर्ता यांच्या देखरेख खाली अंगणवाडी केंद्र सुरू करण्यात असेच ते केंद्र बंद करणे याची देखील जबाबदारी अंगणवाडी सेविका यांवर असते.

अंगणवाडी सेविका होण्यासाठी काय करावे लागेल

अंगणवाडी सेविका होण्यासाठी पात्रता काय आहे

1) अंगणवाडी सेविका होण्यासाठी किमान दहावी पास असणे आवश्यक आहे.

2) अंगणवाडी सेविका होण्यासाठी आपले वय हे 18 ते 45 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

3) अंगणवाडी सेविका होण्यासाठी उमेदवार हा महाराष्ट्रातील स्थानिक रहिवासी असावा.

अंगणवाडी सेविका होण्यासाठी प्रक्रिया काय आहे

  • मित्रांनो, अंगणवाडी सेविका भरतीची जाहिरात ही जिल्हा परिषद तसेच महानगरपालिकांद्वारे नेहमी जाहीर केली जात असते.
  • मित्रांनो, पात्र उमेदवारांनी अर्ज फॉर्म भरून संबंधित कार्यालयांमध्ये सादर करणे खूपच आवश्यक आहे
  • अर्जाची छाननी करून योग्य उमेदवाराची निवड केली की परीक्षा आणि मुलाखती द्वारे केली जाते.
  • निवड झालेल्या उमेदवारांना अंगणवाडी सेविका म्हणून नियुक्त देखील केली जाते.

मित्रांनो, अंगणवाडी सेविका ही एक खूपच महत्त्वाची अशी असणारी जबाबदारी अंगणवाडी सेविकांचे मुख्य जबाबदारी ही सहा वर्षे वयोगटांपर्यंत मुलांचे विकासासाठी आणि त्यांच्या शारीरिक तसेच मानसिक आणि भावनिक करण्यासाठी काम करणे ही खूपच महत्त्वाची जबाबदारी आहे.

मित्रांनो अंगणवाडी सेविका ही एक समाज उपयोगी नोकरी आहे या नोकरीमध्ये मुलांच्या तसेच सार्वजनिक विकासामध्ये योगदान देण्याचे आणि समाजाला काहीतरी वेगळे देण्याची तसेच चांगले देण्याची संधी अंगणवाडी सेविकांना मिळत असते.

अंगणवाडी सेविका होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत

1) आपली शैक्षणिक प्रमाणपत्रे.

2) जातीचा दाखला.

3) पासपोर्ट आकाराचे फोटो.

4) निवास प्रमाणपत्र.

5) वय प्रमाणपत्र

अंगणवाडी सेविका होण्याचे फायदे कोणकोणते आहेत

1) मित्रांनो, अंगणवाडी सेविका ही एक सरकारी नोकरी आहे या नोकरीमध्ये नियमित पगार, पेन्शन आणि इतर भत्ते मिळत असतात.

2) मित्रांनो, अंगणवाडी सेविका ही एक स्थिर नोकरी आहे या नोकरीमध्ये नोकरीच्या सुरक्षिततेची हमी खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते.

3) अंगणवाडी सेविका ही एक महत्त्वाचे असे असणारे समाज उपयोगी नोकरी या नोकरीमध्ये मुलांच्या विकासामध्ये योगदान देण्याची संधी मिळत असते तसेच समाजाला काहीतरी चांगले देण्याची संधी मिळत असते.

अंगणवाडी सेविका होण्यासाठी काय करावे लागेल

अंगणवाडी सेविका होण्यासाठी काही महत्त्वपूर्ण टिप्स

1) अंगणवाडी सेविका होण्यासाठी किमान आपण दहावी पास असणे खूपच आवश्यक आणि गरजेचे आहे.

2) अंगणवाडी सेविका होण्यासाठी सहा वर्षे वयोगटांपर्यंत असणाऱ्या मुलांसोबत काम करण्याची इच्छा असणे खूपच आवश्यक आहे.

निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला जर वरील प्रमाणे दिलेली माहिती आपल्या खूपच उपयोगाची आहे. तसेच आपल्या मैत्रिणींना अंगणवाडी सेविका व्हायची असेल तर वरील प्रमाणे दिलेली माहिती नक्की उपयोगाची आहे.

आपल्याला वरील प्रमाणे अंगणवाडी सेविका होण्यासाठी काय करावे लागेल याबद्दल दिलेले माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच आपल्याला आणखी कोणती देखील माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच जे आपल्या मैत्रिणी अंगणवाडी सेविका होण्यासाठी इच्छुक असतील त्यांना ही माहिती नक्कीच शेअर करा.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending