Connect with us

Information

BBA Course Information in Marathi | बीबीए अभ्यासक्रमाची मराठीत माहिती

Published

on

BBA course information in Marathi

 BBA course information in Marathi: काय मित्रांनो आपली बारावी पूर्ण झालेली आहे आणि बारावीचा निकाल लागलेला आहे आपण विचारांमध्ये आहात की येणाऱ्या काळामध्ये कोणत्या कोर्सला प्रवेश घ्यायचा आज आम्ही आपल्याला बीबीए या कोर्स बद्दल माहिती सांगणार आहोत चला तर मित्रांनो कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया बीबीए कोर्स बद्दल सर्व माहिती

BBA course information in Marathi 

मित्रांनो, आजचे युगामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये बरेच काही नेहमी सुधारणात्मक बदल होत चाललेले आहेत. मित्रांनो आज कालच्या काळामध्ये प्रत्येक कोर्सचा व अभ्यासक्रम हा वेगवेगळा असतो.

मित्रांनो आजकालच्या काळामध्ये काही मुलांना नोकरीपेक्षा स्वतःचा व्यवसाय करावा असे नेहमी वाटत असते. मित्रांनो नेहमी नोकरीपेक्षा व्यवसाय मध्ये काही मुलांना जास्त इंटरेस्ट असतो. जर मित्रांनो आपल्याला एक स्वतःचा चांगला व्यवसाय सुरू करायचा असेल तर आपल्यासाठी बीबीए हा एक खूपच चांगला असा असणारा पर्याय आहे.

मित्रांनो बी बी ए चा फुल फॉर्म हा बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट असा होत असतो. मित्रांनो आजकालच्या काळामध्ये आपण जर बीबीए चा कोर्स पूर्ण केल्यानंतर आपल्याला करिअरच्या अनेक संधी देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होत असतात.

मित्रांनो बीबीए कोर्स पूर्ण केल्यानंतर आपण कॉर्पोरेट सेक्टरमध्ये सहजपणे नोकरी देखील मिळू शकते. तसेच मित्रांनो तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करून देखील आपले चांगले भविष्य घडवू शकता.

बीबीए चा फुल फॉर्म काय आहे

BBA चा फुल फॉर्म हा बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट असा आहे
या कोर्स मधून आपल्याला आपल्या व्यवसायाची व्यवस्थापन कसे करावे हे आपल्याला या अभ्यासक्रमामध्ये शिकवले जाते.

या कोर्समध्ये आपल्याला मूलभूत गोष्टी शिकवल्या जातात जसे की मार्केटिंग, ह्युमन रिसोर्स, अकाउंटिंग अशा प्रकारे बीबीए कोर्स मध्ये आपल्याला शिकण्यास मिळते.

मित्रांनो आजकालच्या काळामध्ये जे विद्यार्थी हे कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये करिअर करून इच्छिता त्यांच्यासाठी बीबीए हा एक उत्तम पर्याय आहे. मित्रांनो या कोर्समध्ये शारीरिक श्रम पेक्षा बुद्धी कौशल्य जास्त लागत असते.

बीबीए कोर्स करण्यासाठी पात्रता काय आहे ?

मित्रांनो, बीबीएमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी हा कोणत्याही शाखेतून मान्यताप्राप्त बोर्ड मधून बारावी उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. बारावीच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांची किमान टक्केवारी 50 टक्के असली पाहिजे. किंवा काही उच्च स्तराच्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी किमान टक्केवारी 60 सुद्धा लागत असते.

बीबीए कोर्सला प्रवेश घेण्यासाठी वयोमर्यादा ही खुल्या वर्गासाठी 17 ते 22 वर्ष आहे. तसेच आरक्षित वर्गासाठी वयोमर्यादा ही 17 ते 24 वर्ष आहे.

बीबीए कोर्स पूर्ण करण्यासाठी किती खर्च येतो

मित्रांनो, BBA हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अडीच ते तीन लाख रुपये खर्च येऊ शकतो. वेगवेगळ्या महाविद्यालयाची वेगवेगळी फी असते.

मित्रांनो तुम्ही कोणत्या महाविद्यालयाची निवड करता यावर तुमचे खर्च अवलंबून असतात जर मित्रांनो तुम्ही तुमचे शहर सोडून दुसरे ठिकाणी जाऊन बीबीए करत असाल तर तुम्हाला हॉस्टेल शुल्क देखील भरावा लागत असतो.

बीबीए कोर्स कालावधी किती आहे

मित्रांनो, बीबीए कोर्स पूर्ण करायला आपल्याला तीन वर्षे लागत असतात या मध्ये एका वर्षामध्ये दोन सेमिस्टर असतात असे सहा सेमिस्टर असतात. जर मित्रांनो आपले विषय राहिले तर आपल्याला कोर्स पूर्ण करायला आपल्याला तीन पेक्षा जास्त वर्ष देखील लागू शकतात.

बीबीए कोर्स चे विषय काय आहेत

1) मार्केटिंग

2) अकाउंटिंग

3) फायनान्स

4) बिझनेस मॅथेमॅटिक्स

5) प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट

6) ऑपरेशनल रिसर्च

बीबीए कोर्स करण्याचे फायदे कोणते आहेत ?

1) मित्रांनो व्यवसाय मध्ये आणि व्यवस्थापनामध्ये जे विद्यार्थी करियर करून इच्छित आहेत त्यांच्यासाठी बीबीए ही पूर्णपणे व्यावसायिक अशी असणारी पदवी आहे.

2) मित्रांनो bba हा कोर्स तुम्हाला व्यवसाय मध्ये उद्योजकीय कौशल्य विकसित करण्यासाठी नेहमी मदत करत असतो. बीबीए कोर्स केल्यानंतर तुम्हाला विद्यार्थी व्यवस्थापनाबद्दल बरेच काही नेहमी शिकायला मिळत असते.

3) मित्रांनो बीबीए केल्यानंतर आपला व्यक्तिमत्व विकास देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो.

4) मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना एमबीए करायचे आहे त्यांच्यासाठी बीबीए करणे खूपच फायदेशीर आहे. बीबीएनंतर एमबीए केले तर तुम्हाला चांगली सॅलरी मिळवण्यासाठी देखील खूपच मदत होत असते.

5) मित्रांनो आपण जर बीबीए केले तर आपण सरकारी क्षेत्रामध्ये आणि आयटीमध्ये देखील नोकरी करू शकता.

6) मित्रांनो बीबीए पूर्ण केल्यानंतर तुम्हाला एक मजबूत आत्मविश्वास पूर्ण व्यक्ती बनण्यासाठी नेहमी मदत करत असते. आणि जे एक पूर्ण कंपनी चालवण्यात सुद्धा सक्षम असे व्यक्ती बीबीए कोर्स तुम्हाला बनवू शकतो.

बीबीए कोर्स पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या संधी कोणत्या आहेत

1) रियल इस्टेट बिजनेस

2) कन्सल्टन्सी

3) मार्केटिंग

4) मॅनेजमेंट सेक्टर

5) फायनान्स सेक्टर

6) सेल्स एक्झिक्युटिव्ह

आपण जर बीबीए कोर्स पूर्ण केला तर आपल्याला वरील प्रमाणे दिलेले आहे. सेक्टरमध्ये नोकरीच्या असंख्य संधी प्राप्त होत असतात.

बीबीएचे असणारे प्रकार कोणते आहेत ?

1) पूर्णवेळ BBA

2) अर्धवेळ बीबीए

3) ऑनलाइन बीबीए

4) अंतर पत्र व्यवहार असे बीबीएचे प्रकार आहेत.

निष्कर्ष

मित्रांनो आपली जर बारावी पूर्ण झाली असेल तर आपण बीबीए कोर्स हा व्यवसाय दृष्टीने केल्यास आपल्याला येणाऱ्या काळामध्ये कोणत्याही प्रकारची आर्थिक जोखीम राहणार नाही. म्हणून मित्रांनो आजकालच्या काळामध्ये व्यवसायाला खूपच महत्त्व आलेले आहे.

व्यवसाय मधून आपण आर्थिक साक्षरता प्राप्त करू शकतो म्हणून मित्रांनो आपण जर बीबीए करत असाल तर आपल्यासाठी खूपच वरील प्रमाणे दिलेली माहिती महत्त्वाची आहे.

मित्रांनो आपल्याला वरील प्रमाणे दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच आपला आणखी कोणती माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच मित्रांनो वरील प्रमाणे दिलेली माहिती आपण आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending