Connect with us

Information

BCA Course information in Marathi | बीसीए अभ्यासक्रमाची मराठीत माहिती

Published

on

BCA Course information in Marathi

BCA course information in Marathi: विद्यार्थी मित्रांनो आपली बारावी पूर्ण झालेले असेल आणि आपल्याला पदवी परीक्षेमध्ये जायचे असेल तर मित्रांनो आज आम्ही आपल्यासाठी बीसीए कोर्स बद्दल माहिती घेऊन आलेलो आहोत.

मित्रांनो बीसीए कोर्स पूर्ण केल्यानंतर आपल्याला चांगल्या पगाराची नोकरी देखील लागणार आहे. यासाठी मित्रांनो खालील प्रमाणे दिलेली माहिती आपण नीट लक्षात घेणे खूपच गरजेचे आहे. चला तर मित्रांनो जाणून घेऊया बीसीए कोर्स बद्दल अगदी सविस्तर माहिती.

BCA Course information in Marathi Language

मित्रांनो, सर्वांकडे पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण हे सारखेच असते. त्यानंतर आपल्याला अकरावी, बारावी करावी लागत असते आणि आपले अकरावी बारावी झाल्यानंतर आपल्याला आपल्या जीवनाचा मुख्य टप्पा निवडावा लागत असतो.

यामध्ये आपल्याला आपली शाखा निवडावी लागत असते. बारावी पूर्ण केल्यानंतर मित्रांनो आपल्याला पुढील शिक्षणाला करिता अनेक डिग्री कोर्स उपलब्ध आहेत.

त्यापैकी मित्रांनो आज आपण एक डिग्री कोर्स बद्दल म्हणजे बीसीए बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना कम्प्युटरमध्ये अधिक आवड असेल त्यांनी बीसीए मध्ये प्रवेश घेणे खूपच गरजेचे आहे.

BCA म्हणजे काय आहे

मित्रांनो, bca हा कम्प्युटर रिलेटेड कोर्स आहे. बीसीए चा फुल फॉर्म बॅचलर ऑफ कम्प्युटर एप्लीकेशन असा होत असतो. मित्रांनो हा कोर्स तीन वर्षाचा आहे.

मित्रांनो या तीन वर्षांमध्ये सहा सेमिस्टर असतात. प्रोफेशनल डिग्री कोर्स म्हणून देखील बघितले जाते. मित्रांनो bca हा एक कोर्स अंडर ग्रॅज्युएट असा असणारा कोर्स आहे.

मित्रांनो या कोर्समध्ये आपल्याला कम्प्युटर एप्लीकेशन आणि कम्प्युटर सायन्स यांच्याशी निगडित असणाऱ्या गोष्टी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये शिकवल्या जातात.

BCA अभ्यासक्रमांमध्ये आपल्याला काय शिकवले जाते

1) मित्रांनो, आपल्याला BCA मध्ये सॉफ्टवेअर बनवायला शिकवले जाते.

2) या कोर्समध्ये आपल्याला वेबसाईट डिझाईन करायला शिकवले जाते.

3) तसेच संगणक नेटवर्क बद्दल देखील शिकवले जाते.

4) मूलभूत गोष्टी देखील या कोर्समध्ये आपल्याला शिकवले जातात.

5) तसेच संगणकाचे प्रोग्रॅम भाषा देखील आपल्याला या कोर्समध्ये शिकवली जाते.

BCA course पात्रता काय आहे

1) मित्रांनो bca पूर्ण करण्यासाठी आपल्याला बारावी मधून आपण कोणत्याही विषयांमधून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

2) मित्रांनो आजकालच्या काळामध्ये काही महाविद्यालय आपल्याला बीसीए परीक्षेसाठी विज्ञान विषय विचारत असतात तसेच बारावीला गणित आणि संगणक विषय देखील विचारत असतात.

3) मित्रांनो आपल्याला BCA अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी 12 मध्ये कमीत कमी 45 गुण असणे आवश्यक आहे.

BCA अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थी काय शिकत असतात

1) या कोर्समध्ये आपल्याला संगणकाची मूलभूत तत्वे माहीत होत असतात.

2) या कोर्समध्ये आपल्याला ऑफिस ऑटोमेशन टूल्स माहित होत असतात.

3) मल्टीमीडिया तंत्रज्ञान माहित होत असते.

4) आपल्याला व्यवस्थापन माहिती प्रणाली देखील माहीत होत असते.

5) ई कॉमर्स बद्दल आपल्याला माहिती होत असते.

मित्रांनो, काही कॉलेजमध्ये याविषयी या कोर्स विषयी अभ्यासक्रम थोडा वेगळा असू शकतो. परंतु आजकालच्या काळामध्ये फक्त संगणक प्रोग्रामिंग, वेब डिझाईनिंग, ग्राफिक्स डिझाईनिंग, आणि नेटवर्किंग आपण Bca मध्ये शिकणार आहोत.

BCA course प्रवेश प्रक्रिया

मित्रांनो, बरेच विद्यालय मध्ये आपल्याला प्रवेश प्रक्रिया उत्तीर्ण करणे या कोर्ससाठी आवश्यक असते. परंतु आजकालच्या काळामध्ये बहुतेक विद्यापीठे तसेच कॉलेज प्रवेश परीक्षा घेत नाहीत. परंतु काही कॉलेजमध्ये आपल्याला बारावी तसेच बारावीच्या आधारे आपल्याला थेट प्रवेश मिळू शकतो.

BCA course fees

मित्रांनो, आपण जर सरकारी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला असेल तर आपल्याला अवघ्या एक लाखांमध्ये तुम्ही तीन वर्षाची पदवी पूर्ण करू शकता.

परंतु मित्रांनो आपण जर खाजगी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला असेल तर तुम्हाला फी जास्त भरावी लागेल. मित्रांनो कॉलेज जितके नावाजलेले असेल तितकेच जास्त आपल्याला फी देखील भरावी लागणार आहे.

मित्रांनो आपल्याला या कोर्स दरम्यान लॅपटॉप किंवा कम्प्युटरची गरज देखील बसू शकते असे काही इतर खर्च देखील होत असतात.

निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला BCA या कोर्स बद्दल दिलेली माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे. मित्रांनो आपल्याला वरील प्रमाणे कोर्स बद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच मित्रांनो वरील प्रमाणे दिलेली माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending