जन्म दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे: मित्रांनो अनेक सरकारी कामासाठी आपल्याला जन्माचा दाखला हा अनिवार्य असतो. जन्म दाखला हा आपल्याला आपल्या जन्माचे प्रमाणपत्र असते जे आपल्याला शाळेत प्रवेश घेण्यासाठी देखील लागत असते.
तसेच आपल्या पासपोर्ट बनवण्यासाठी देखील लागत असते. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया जन्म दाखला काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात ते.
अनुक्रमणिका
जन्म दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे Documents Required for Birth Certificate in Marathi
जन्म दाखला काढण्यासाठी आपल्याला खालील प्रमाणे आवश्यक कागदपत्रे लागत असतात. मित्रांनो जन्म प्रमाणपत्र ही एक अधिकृत माहिती आहे ज्यामध्ये तारीख, जन्मस्थान, लिंग, आणि नवीन जन्मलेल्या मुलांचे नाव याची पुष्टी होत असते.
जन्म प्रमाणपत्र एखाद्या व्यक्तीचे कायदेशीर अस्तित्व सिद्ध करत असते. तसेच जन्म प्रमाणपत्र हे या घटनेची नोंदणी आहे की लोकसंख्येच्या मूलभूत महत्त्वपूर्ण डेटाचा जन्म प्रमाणपत्र आहे मुख्य स्रोत आहे.
जन्म दाखला काढण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे
1) आपल्या पालकांचा ओळख पुरावा लागत असतो.
2) जन्मस्थळाचा पुरावा लागत असतो.
3) पालकांचे विवाह प्रमाणपत्र देखील काही पर्यायी पद्धतीमध्ये लागत असते.
जन्माचा दाखला मिळवण्यासाठी काही महत्त्वपूर्ण गोष्टी
1) जन्म दाखला काढण्यासाठी ग्रामपंचायत तसेच नगरपालिका व महानगरपालिका यांच्यातर्फे स्वतंत्र नोंदणी कक्ष स्थापन केलेला आहे.
2) जन्म दाखला काढण्यासाठी प्रथम ज्या रुग्णालयांमध्ये प्रस्तुतीसाठी दाखल केलेले आहे तेथे जन्म नोंदणी करणे आवश्यक आहे.
3) मित्रांनो, आपल्याला जर प्रामाणिक जन्म दाखला मिळवण्यासाठी विविध नमुन्यातील अर्ज भरून 21 दिवसाच्या आत स्थानिक जन्म नोंदणी अधिकार्याकडे सादर करणे गरजेचे असते.
4) संबंधित अधिकारी रुग्णालयातील रेकॉर्डची सत्यता पडताळणी करून जन्म प्रमाणपत्र देत असतात.
5) जर निर्धारित मुदतीच्या हात नोंदणी झाली नसेल तर पोलिसांद्वारे प्रामाणिक प्रतिज्ञापत्र केल्यानंतर जन्म प्रमाणपत्र काढता येते.
6) मित्रांनो, आपल्याकडे आपल्या मुलाचे तसेच मुलीचे सहा वर्षे पूर्ण असून देखील जन्म दाखला नसेल तर पुढील तसेच वरील प्रमाणे दिलेली कागदपत्रे जमवून आपल्याला जन्माचा दाखला काढता येतो.
सहा वर्षे पूर्ण झाल्यानंतर जन्म दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे
1) गावचे सरपंच तसेच वैद्यकीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र.
2) ग्रामसेवकाचा दाखला.
3) शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपर.
निष्कर्ष
मित्रांनो, आपल्याला जन्म दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे याबद्दल दिलेली माहिती नक्कीच आपल्याला उपयोगी पडणार आहे.
तसेच मित्रांनो आपल्याला जन्म दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच आपल्याला आणखी कोणतेही माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. वरील प्रमाणे दिलेली माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.