बिटल शेळी पालन नमस्कार मित्रांनो आज आपण बीटल शेळीपालन कसे करावे याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो ही शेळी प्रामुख्याने पंजाब प्रांतांमध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आढळत असते. महाराष्ट्रामध्ये बीटल चे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आकर्षण आहे. चला तर मग जाणून घेऊया बीटल शेळी पालन कसे करावे याबद्दल माहिती.
अनुक्रमणिका
बिटल शेळीची माहिती
1) मित्रांनो, बिटल ही शेळी जगातील सर्वात उंच असणाऱ्या शेळ्यांच्या जातीमधील एक जात आहे. बिटल या शेळीची उंची 40 ते 45 इंच होत असते. तसेच नराची उंची 45 ते 50 इंच होत असते.
2) मित्रांनो, बिटल ही शेळी महाराष्ट्र मधील कोणतेही वातावरणाशी तग धरून राहत असते.
3) बिटल या शेळीचे मार्केट ईद साठी खूपच मोठे आहे. तसेच महाराष्ट्रामध्ये कटिंग साठी देखील बिटल चे मार्केट खूपच मोठे आहे.
4) बिटल ही शेळी दीड वर्षांमधून दोनदा वेत देत असते.
5) बिटल या शेळीचे कान लांब असतात तसेच त्यांचे डोळे पांढरे असतात. तसेच बीटल ही शेळी पांढऱ्या, लाल आणि पिवळ्या रंगांमध्ये आढळून येते.

बिटल शेळी पालन कसे करावे
मित्रांनो, आपण बीटल शेळीची क्रॉस ब्रीडिंग ही कमी गुणवत्तेच्या असलेल्या शेळ्या बरोबर करून आपण त्यांची गुणवत्ता सुधारू शकतो. मित्रांनो क्रॉस ब्रीडिंग मुळे होणारे पिल्लांची वजन वाढ चांगल्या प्रकारे होत असते.
बिटल शेळीची शरीर रचना
मित्रांनो, बीटल या शेळ्यांचा आकार हा वेगळा असतो यांच्या आकाराने या शेळ्या आपल्याला सहजपणे ओळखता येतात तसेच बिटल यांचे पाय लांब असतात. तसेच कान खाली लांबलेले असतात.
बिटल शेळ्यांची शेपटी लहान असते बीटल शेळ्यांचे सिंग हे वळलेली असतात. बिटल शेळ्यांची दूध देण्याची क्षमता ही इतर शेळ्यांच्या तुलनेमध्ये जास्त असते.
बिटल शेळी गाभण असल्यास देखरेख कशी करावी
मित्रांनो, गाभण शेळीची देखभाल ही व्यवस्थित पणे केली पाहिजे. साधारणपणे शेळीचे सहा ते नऊ आठवड्यापूर्वीच दूध काढणे बंद करावे. तसेच शेळ्यांना स्वच्छ गोठ्यामध्ये बांधावे.
शेळ्यांच्या छोट्या पिल्लांचा जन्म झाल्यानंतर त्यांना व्यवस्थितपणे स्वच्छ करावे. पिल्लांचा जन्म झाल्यानंतर तीस मिनिटानंतर लगेच त्यांना दुध पाजावेअशाप्रकारे बिटल शेळ्यांची देखभाल करावी.
बिटल शेळी पालन याबद्दल शेवटचे शब्द
मित्रांनो, आपल्याला जर बीटल शेळी पालन करायचे असेल तर आपण वरील प्रमाणे दिलेल्या लेखांमध्ये माहिती आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा.
मित्रांनो आपल्याला बीटल शेळी पालन कसे करावे याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.
मित्रांनो आम्हाला अशी आशा आहे की आपल्याला बीटल शेळी पालन कसे करावे याबद्दल दिलेली माहिती नक्कीच आवडली असेल. बीटल शेळीपालन याबद्दल दिलेली माहिती आपण आपल्या मित्रांसमवेत शेअर करण्यास कदापि विसरू नका.