Connect with us

Schemes

Business Loan Information in Marathi | व्यवसाय कर्जाची माहिती, कर्ज प्रकार, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे

Published

on

Business loan information in Marathi

Business loan information in Marathi: मित्रांनो, व्यवसाय करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते पण प्रत्येकाला व्यवसाय करणे शक्य होत नाही.

मित्रांनो व्यवसाय करण्यासाठी अनेक गोष्टी असाव्या लागतात. व्यवसाय करण्यासाठी सर्वात गोष्टी महत्त्वाच्या म्हणजे जोखीम आणि पैसा.

आज आपण व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला कर्ज कशा स्वरूपात मिळते याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. तसेच सरकारने आपल्यासाठी कोणते अनुदान सुरू केलेले आहे याबद्दल देखील आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

चला तर मित्रांनो कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया व्यावसायिक कर्ज योजना याबद्दल अगदी सविस्तर माहिती.

Business Loan Information in Marathi मराठीत व्यवसाय कर्जाची माहिती

जास्तीत जास्त नागरिकांनी आपला स्वतःचा व्यवसाय करावा यासाठी सरकारने देखील अनेक योजना सुरू केलेले आहेत. व्यवसायासाठी जलद कर्ज मिळावे यासाठी देखील काही खास योजना सुरू केलेल्या आहे.

आजच्या लेखांमध्ये आपण बिझनेस लोन कसे आपल्याला जास्तीत जास्त फायदेमंद ठरेल याची माहिती जाणून घेणार आहोत.

बिझनेस लोन व्यवसाय कर्ज काय असते

मित्रांनो, व्यवसाय कर्ज हे कोणताही व्यवसाय नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी घेतले जात असते. बिजनेस लोन कोणत्याहि व्यवसायासाठी घेतले जाऊ शकते.

त्यामध्ये तुमचा व्यवसाय छोटा असेल किंवा मोठा असेल तसेच तुम्हाला एखादे दुकान सुरू करायचे असेल किंवा एखादी डिस्ट्रीब्यूटर शिप घ्यायची असेल यासाठी देखील बिजनेस लोन आपण घेऊ शकता.

मित्रांनो अनेक वेळा तुमचा व्यवसाय सुरू असतो परंतु तो व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्हाला कर्ज मिळत असते. अनेकदा व्यवसाय वाढवण्यासाठी भांडवल देखील लागत असते ते आपल्याकडे नसते अशा वेळेस बिजनेस लोन आपल्यासाठी खूपच उपयुक्त ठरत असते.

सोप्या भाषेमध्ये बिझनेस लोन म्हणजे तुम्हाला एखाद्या नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी तसेच तो व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये वाढवण्यासाठी लागणारे भाग भांडवल म्हणजेच पैसा हा बँकेकडून कर्ज स्वरूपात घेता याला बिजनेस लोन असे देखील बोलले जाते.

कर्जाचे असणारे प्रकार कोणते आहेत

1) सुरक्षित कर्ज

मित्रांनो, सुरक्षित कर्ज प्रकारातील कर्जाला आपण तारण कर्ज देखील असे म्हणू शकतो. कारण ते सुरक्षित असणारे कर्ज आहे.

मित्रांनो आपल्याला एखादी गोष्ट आपण बँकेकडे गहाण ठेवली तरच बँक आपल्याला कर्ज देत असते. प्रत्येक छोटी किंवा नुकती सुरू झालेली बँक अशा प्रकारची कर्ज देण्यास नेहमीच जास्त पसंत करत असतात.

2) असुरक्षित कर्ज

मित्रांनो, या कर्ज प्रकारातील कर्ज देण्यामध्ये सगळ्याच बँकांचा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये फायदा असतो. या कर्ज प्रकारामधून बँकेला खूपच जास्त प्रमाणामध्ये व्याज मिळत असते.

बिजनेस लोन साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणकोणते आहेत

  • पॅन कार्ड
  • आधार कार्ड
  • व्यवसाय नोंदणी पुरावा
  • मतदान ओळखपत्र
  • आयटीआर फाईल
  • जमीन मालकी असलेला पुरावा

महाराष्ट्र सरकारच्या आणि भारत सरकारच्या बिझनेस साठी असणाऱ्या कर्ज योजना

1) स्टँड अप इंडिया योजना
2) स्टार्ट अप इंडिया योजना
3) मुद्रा कर्ज योजना
4) प्रधानमंत्री रोजगार योजना

बिझनेस लोन साठी व्याजाची टक्केवारी किती असते

मित्रांनो, आपण जर व्यवसायिक कर्ज एखाद्या सरकारी योजनेअंतर्गत घेत असाल तर आपल्याला व्याजदर हा अगदी माफक दरामध्ये असतो.

तसेच मित्रांनो व्याजदर हा प्रत्येक योजनेनुसार नेहमी बदलत असतो. सरकारी योजनेअंतर्गत व्यावसायिक लोन घेतल्यास व्याजदर हा कमी लागत असतो.

पण आपण जर एखाद्या खाजगी बँकेकडून जर लोन घेतले असेल तर आपल्याला व्याजदर हा अधिक लागत असतो. खाजगी बँकेमध्ये आपल्याला अगदी कमी वेळेमध्ये खूपच जलद गतीने कर्ज मिळत असते.

मात्र सरकारी बँकांमध्ये किंवा योजनेअंतर्गत कर्ज घेण्यास थोडा उशीर लागत असतो. त्यामुळे मित्रांनो आपण कर्ज कुठून घेत असाल यावर देखील व्याजदर बऱ्याचदा अवलंबून असतो. व्यावसायिक लोन साठी व्याजदर हा 13% च्या पुढेच आहे.

बिझनेस लोन साठी सिबिल स्कोर ची आवश्यकता किती असते

मित्रांनो, आपल्याला कोणत्याही बँकेकडून जर कर्ज घ्यायचे असेल तर त्यासाठी आपला सिबिल स्कोर हा एक खूपच महत्त्वाचा घटक मानला जातो.

जर मित्रांनो आपलाच क्रेडिट स्कोर कमी असेल तर तुम्हाला बँकेकडून कर्ज दिले जात नाही. 750 हून अधिक सिविल स्कोर असणे खूपच गरजेचे असते .

प्रत्येक बँक हे नागरिकांचा सिबिल स्कोर चेक करूनच कर्ज द्यायचे आहे की नाही हे ठरवत असते. जितका तुमचा सिबिल स्कोर चांगला असेल तितक्याच आकर्षक पद्धतीने तुम्हाला व्याजदर देखील मिळत असते.

निष्कर्ष

आपल्याला नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी तसेच आपला सुरू असणारा व्यवसाय वाढवण्यासाठी व्यवसाय कर्ज आपल्याला खूपच मदत करत असते.

मित्रांनो आपल्याला वरील प्रमाणे दिलेले बिजनेस लोन याबद्दलची माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे. मित्रांनो आपल्याला बिजनेस लोन संदर्भात दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच आपल्याला आणखी कोणती माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच बिजनेस लोन संदर्भात दिलेली माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

Trending