Connect with us

Information

D.ED Course Information in Marathi | D.ED अभ्यासक्रमाची मराठीत माहिती

Published

on

D.ED course information in Marathi

D.ED course information in Marathi: मित्रांनो, तुम्हाला जर शिकवण्याची आवड असेल तसेच लोकांना विषय समजून सांगण्याच्या आवड असेल तर तुम्ही डीएड हा कोर्स करू शकता. आणि आपल्यासाठी खूपच चांगला देखील राहील. मित्रांनो आज आपण डीएड कोर्स बद्दल सर्व माहिती जाणून घेणार आहोत.

D.ED course information in Marathi 

डीएड हा कोर्स शिक्षण नोकरी तसेच इतर क्षेत्रांमधील सामर्थ्याने कौशल्य प्रदान करत असतो.

D.ED म्हणजे काय

मित्रांनो, या कोर्समध्ये तुम्हाला शिक्षक होण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. डीएड हा कोर्स इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिक्षक होण्यासाठी प्रशिक्षण देत असतो.

हा कोर्स केल्यानंतर तुम्ही सरकारी शाळा खाजगी शाळा आणि खाजगी स्तरावर शिकवण्याचे काम देखील करू शकता.

D.ed चा फुल फॉर्म काय आहे

डीएड चा फुल फॉर्म हा डिप्लोमा इन एज्युकेशन हा आहे. डीएड करण्यासाठी तुम्हाला बारावी मध्ये 50 टक्के गुण असणे आवश्यक आहे.

तसेच अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना काही प्रमाणामध्ये सूट देण्यात आलेली आहे.

D.ED course information in Marathi

D.Ed साठी पात्रता काय आहे

1) मित्रांनो आपल्याला डीएड करण्यासाठी बारावी मध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

2) तसेच बारावी वर्गातील विद्यार्थ्यांना त्यांच्या बोर्ड परीक्षेमध्ये कमीत कमी 50 टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे.

डीएड कोर्स केल्यानंतर पगार किती मिळू शकतो

मित्रांनो, आपण जर डीएड कोर्स पूर्ण केला तर आपण सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रामध्ये दोन्ही क्षेत्रांमध्ये काम करू शकता. खाजगी नोकरीपेक्षा सरकारी नोकऱ्यांसाठी पगार हात जास्त असतो.

डीएड करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वार्षिक पगार हा अडीच लाख ते साडेतीन लाख दरम्यान असतो अनुभवाने हे वेतन वाढत जात असते.

डीएड कोर्स करण्याचे फायदे कोणकोणते आहेत

1) डीएड कोर्स करत असताना विद्यार्थ्याला अनेक विविध क्षमता प्राप्त होत असतात त्यांना विद्यार्थ्यांना शिकवताना त्यांच्याशी संवाद साधण्याची कला देखील प्राप्त होत असते.

2) डीएड केलेला विद्यार्थी हा कार्यक्रमांमध्ये कोचिंग तसेच सार्वजनिक किंवा खाजगी शाळांमध्ये शिक्षक म्हणून देखील काम करू शकतो.

3) डीएड केलेला उमेदवार हा प्राथमिक स्तरावरील शाळेमध्ये सरकारी शिक्षक म्हणून देखील काम करू शकतो.

D.ED course information in Marathi

डीएड या कोर्सची प्रवेश परीक्षा कशी असते

मित्रांनो, डीएड या कोर्सला काही कॉलेजमध्ये बारावीच्या गुणांवर देखील प्रवेश दिला जातो. तर काही कॉलेजमध्ये प्रवेश परीक्षा देखील घेतली जाते. व त्या प्रवेश परीक्षेचे गुण व बारावी बोर्डाचे गुण एकत्रित करून देखील प्रवेश दिला जातो.

डीएड आणि बीएड यामध्ये काय फरक आहे

मित्रांनो, डीएड हा एक डिप्लोमा अभ्यासक्रम आहे तर बीएड हा एक पदवी पूर्व अभ्यासक्रम आहे. डीएड पदवी असलेले शिक्षक हे प्राथमिक शाळेचे शिक्षक होण्यास पात्र असतात. तर बीएड पदवी असलेले शिक्षक बारावीपर्यंतचे शालेय शिक्षक बनू शकतात.

निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला डीएड कोर्स बद्दल दिलेली माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे. मित्रांनो आपल्याला डीएड कोर्स बद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच मित्रांनो आपल्याला आणखी कोणती माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच मित्रांनो वरील प्रमाणे दिलेली माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending