Connect with us

Farmers Guide

Desi Kombadi Palan Mahiti, देशी कोंबडी पालन माहिती, गावरान कोंबडी पालन कसे करावे [PDF]

Published

on

देशी कोंबडी पालन माहिती

देशी कोंबडी पालन माहिती मित्रांनो, शेतकऱ्याचे घर म्हटले की पशु संगोपन हे आलेच आज आपण देशी कोंबडी पालन माहिती याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. कोंबडी पालनामध्ये किती नफा आहे याची देखील माहिती आज आपण घेणार आहोत. तसेच हा व्यवसाय आपण फायदेशीर कोणत्या पद्धतीमध्ये करू शकतो याची देखील माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया देशी कोंबडी पालन माहिती.

देशी कोंबडी पालन माहिती काय आहे

मित्रांनो, शेळीपालनाच्या खालोखालच चांगली संधी असलेला हा व्यवसाय कुक्कुटपालन देशी कोंबडी पालन खूपच महत्त्वाचा आणि ग्रामीण भागामध्ये खूपच रूढ झालेला असा शेतीपूरक असा व्यवसाय आहे.

कोंबडी पालन तसेच याला पोल्ट्री फार्म असे देखील बोलले जाते. मित्रांनो शेळी पालन व्यवसायप्रमाणे देखील कोंबडी पालनाचा व्यवसाय सुद्धा आपण कोंबड्या मोकळ्या जागेमध्ये सोडून तसेच पिंजऱ्यामध्ये बंद करून अशा दोन्ही पद्धतींमध्ये आपल्याला करता येतो.

देशी कोंबडी पालन व्यवसाय कसा कराल

मित्रांनो, देशी कोंबडी पालन हा व्यवसाय मुळातच मुक्त गोठ्यामध्ये गाई म्हशीसोबत केला जाऊ शकणारा व्यवसाय आहे. मित्रांनो यासाठी वेगळे काही करण्याची गरज नाही देशी किंवा गावरान क्रॉस जातीचा हा अतिशय काटक आणि रोगप्रतिकारक्षम कोंबड्या असतात. मित्रांनो आपल्याला जर देशी कोंबडी पालन करण्यासाठी योग्य जातीची निवड करणे खूपच गरजेचे असते.

गावरान कोंबड्यांच्या जाती कोणत्या आहेत

देशी कोंबडी पालन माहिती

1) वनराज

मित्रांनो, भारतामध्ये तसेच महाराष्ट्र मध्ये सगळीकडेच ही जात खूपच मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्ध आहे. या कोंबडीचे वजन हे दोन महिन्यांमध्ये एक किलोपर्यंत वजन वाढत असते. तसेच एका अंडे चक्रामध्ये ही कोंबडी 140 ते 200 अंडी देत असते.

2) कडकनाथ

मित्रांनो, कडकनाथ जात ही मध्य प्रदेशांमध्ये असणारी जात आहे मध्य प्रदेशामधील असणाऱ्या धार या जिल्ह्यातील आदिवासी समाजाने ओळख करून दिलेली कडकनाथ कोंबडीची जात आहे.

कडकनाथ कोंबडीची जात ही कोंबडी रंगाने गडद काळे असते तसेच गुलाबी तुरा असतो या कोंबडीचे रक्त आणि अंडी सुद्धा काळसर असतात. या कोंबडीच्या मटणांमध्ये कॅल्शियम, प्रोटीन आणि लोह खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असते.

ह्या कोंबडीची रोगप्रतिकारक शक्ती देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये चांगले असते. औषधी गुणधर्मासाठी प्रसिद्ध हे असे देशी वाण आहे या कोंबडीची पाच महिन्यांमध्ये एक किलो पर्यंत वाढ होते तसेच ही कोंबडी एका चक्रामध्ये 70 ते 100 पर्यंत अंडी देऊ शकते.

3) गिरीराज

मित्रांनो, कर्नाटक राज्यांमधील असणाऱ्या बेंगलोर मधून या जातीचा उगम झालेला आहे. गिरीराज ही गावरान कोंबडी सारखीच दिसणारी जात आहे या कोंबडीचे वजन हे दोन महिन्यांमध्ये एक किलो पर्यंत वाढत असते. आणि ही एक चक्रामध्ये अंडी दोनशे अंडी उत्पादन देते.

देशी कोंबडी पालन मुक्त संचार पद्धत

मित्रांनो, मुक्त संचार पद्धतीचा अवलंब केल्यामुळे यावर येणारा मजुरांवरील खर्च तसेच खाद्यवरील येणारा खर्च कमी होत असतो. कोंबड्या मोकळ्या वातावरणामध्ये असल्यामुळे याच्यावरचा खर्च देखील खूपच कमी येत असतो.

मित्रांनो सुरुवातीच्या तीन ते चार आठवडे पिल्लांची काळजी घेणे खूपच गरजेचे असते. मुक्त संचार पद्धतीमध्ये कोंबड्या स्वतःच्या अन्न शोधून किडे कोवळे गवत खाऊ लागतात.

मुक्त संचार पद्धतीमध्ये फक्त रात्रीच कोंबड्या शेडमध्ये येत असतात त्यामुळे स्वच्छता ठेवणे देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये सोपे जात असते.

मित्रांनो, अशा प्रकारे आपण देशी कोंबडी पालन करू शकता तसेच मित्रांनो आणखी आपल्याला देशी कोंबडी पालन याबद्दल काही माहिती हवी असल्यास आपण आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा.

आम्ही आपल्यासाठी देशी कोंबडी पालन माहिती नक्की घेऊन येऊ आपल्याला पाहिजे ती माहिती, आम्ही आपल्यासाठी लवकरात लवकर घेऊन येऊ.

देशी कोंबडी पालन माहिती याबद्दलचा निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला देशी कोंबडी पालन माहिती याबद्दल दिलेली माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे. तसेच मित्रांनो आपल्याला देशी कोंबडी पालन याबद्दल आणखी काही माहिती हवी असल्यास आपण आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा.

आम्ही आपल्यासाठी ती माहिती लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करू तसेच मित्रांनो आपल्याला देशी कोंबडी पालन माहिती याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली आपण आम्हाला नक्की कमेंट द्वारे कळवा. तसेच वरील प्रमाणे दिलेली माहिती आपण आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करण्यास कदापिहि विसरू नका.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending