सेंद्रिय शेतीचे तोटे Disadvantages of Organic Farming in marathi

सेंद्रिय शेतीचे तोटे

सेंद्रिय शेतीचे तोटे: सेंद्रिय शेतीचे फायदे असले तर त्याचे तोटे देखील असतात. म्हणूनच मित्रांनो आज आपण सेंद्रिय शेतीचे तोटे कोणकोणते आहेत याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो सेंद्रिय शेतीचे फायदे हे अनेक आहेत पण त्याचे काही तोटे देखील आहेत. चला तर मित्रांनो कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया सेंद्रिय शेतीचे तोटे कोणकोणते आहेत याबद्दल अगदी सविस्तर माहिती.

सेंद्रिय शेतीचे तोटे कोणकोणते आहेत Disadvantages of Organic Farming in Marathi

1) सेंद्रिय शेतीमध्ये पीक थोडे उशिरा मिळत असते.

2) सेंद्रिय शेतीमध्ये मजुरी जास्त लागत असते, आणि ही पद्धत खर्चिक व वेळखाऊ पद्धत असते.

3) सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये जमिनीच्या मशागती तसेच इतर अन्य कामांसाठी जास्त मेहनत व खर्च लागत असतो.

4) सेंद्रिय शेतीमध्ये घेतलेले उत्पादन हे बऱ्याच वेळेत दिसायला चांगले नसते.

5) सेंद्रिय शेतीमध्ये किडींचा प्रादुर्भाव झाल्यास मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत असते.

6) एवढ्या समस्या सोसल्यावर देखील भाव मात्र कमीच मिळत असतं.

7) सेंद्रिय शेतीमध्ये उत्पादनाचे प्रमाण हे कमी निघत असते.

8) सेंद्रिय खत हे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध देखील नाहीत रासायनिक खतांपेक्षा सेंद्रिय खतांचा डोस मोठ्या प्रमाणावर द्यावा लागतो.

9) सेंद्रिय शेतीमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये भांडवल खर्च हा जास्त लागत असतो.

10) सेंद्रिय शेतीमध्ये बी बियाणांचा साठा भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये करावा लागत असतो.

निष्कर्ष

सेंद्रिय शेतीचे फायदे हे भरपूर असल्यामुळे सेंद्रिय शेती करणे खूपच गरजेचे आहे. परंतु याचे तोटे देखील आपण शेती करत असल्यास लक्षात घेतले पाहिजे.

तसेच मित्रांनो सेंद्रिय शेतीचे तोटे याबद्दल दिलेली माहिती आपल्याला नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे. मित्रांनो सेंद्रिय शेतीचे तोटे याबद्दल दिलेली माहिती आपल्याला कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच सेंद्रिय शेतीचे तोटे याबद्दल दिलेली माहिती आपण आपल्या मित्रपरिवार सोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

सेंद्रिय शेतीचे तोटे Disadvantages of Organic Farming in marathi

Leave a Reply

Your email address will not be published.

Scroll to top