Information
आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय | Disaster Management in Marathi, आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005

आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय मित्रांनो, आज आपण आपत्ती हे सर्वात मोठे असणारे संकट या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. आपत्ती म्हणजे ही खूपच भयंकर अशी राष्ट्रावर उद्भवणारी समस्या आहे. आपत्तीमुळे राष्ट्राची आणि समाजाची खूपच मोठ्या प्रमाणामध्ये जीवित आणि आर्थिक हानी होत असते. चला तर मग जाणून घेऊया आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय.
अनुक्रमणिका
आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय
सर्वप्रथम आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय हे जाणून घेण्यापूर्वी आपण आपत्ती म्हणजे नक्की काय हे सर्वप्रथम जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
आपत्ती म्हणजे काय
मित्रांनो, आपत्ती म्हणजे ज्या संकटामुळे आपल्या राष्ट्राच्या आणि समाजाची खूपच मोठ्या प्रमाणामध्ये जीवित आणि आर्थिक हानी तसेच सामाजिक हानी होत असते. त्याचबरोबर राष्ट्रावर किंवा समाजावर या पद्धतीचे खूपच दूरगामी परिणाम होत असतात. अशा संकटाला आपत्ती असे बोलले जाते.

आपत्तीचे असणारे प्रकार
आपत्तीचे प्रामुख्याने दोन प्रकार पडत असतात ज्यामध्ये मानवनिर्मित आपत्ती आणि नैसर्गिक आपत्ती या दोन प्रमुख आपत्ती आहेत म्हणून आज आपण या दोन्ही आपत्ती जाणून घेणार आहोत.
1) मानव नर्मित आपत्ती म्हणजे काय
मानव निर्मित आपत्ती ही मानवी चुका तसेच निष्काळजीपणा आणि जाणून-बुजून केलेल्या चुकांमुळे उद्भवणारी अशी असणारे आपत्ती आहे. मानव निर्मित आपत्ती नेहमी मानवी निष्काळजीपणामुळे उद्भवत असते. परंतु ज्या जाणून-बजून किंवा अजाणते पणे घडू शकणारी तसेच चांगले नियोजन आणि प्रतिबंधात्मक पद्धतीने मानवनिर्मित आपत्ती देखील टाळता येते.
मानव निर्मिती आपत्ती ही कोणत्याही प्रकारची असू शकते. ज्यामध्ये इमारत कोसळणे, दंगल, दहशतवादी हल्ला औद्योगिक धोका, चेंगराचेंगरी, आग इत्यादी प्रकारे मानवनिर्मित आपत्ती होऊ शकते.
2) नैसर्गिक आपत्ती म्हणजे काय

मित्रांनो, नैसर्गिक आपत्ती ही एक अतिशय महाभयंकर असणारे आणि धोकादायक असणाऱ्या पण अचानक प्रमाणे घडते. आणि सहसा घरे मालमत्ता वस्तु आणि इतर अनेक प्रकारचे नुकसान हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये करत असते. नैसर्गिक आपत्तीमध्ये अनेक प्रकारचे मृत्यूदेखील होत असतात.
मानवी चुकांमुळे आज नैसर्गिक आपत्तीमध्ये दिवसेंदिवस खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत चाललेली आहे. कारण मानवाकडून पर्यावरणीय संशोधनाचा गैरवापर खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. मित्रांनो नैसर्गिक आपत्ती मध्ये ज्वालामुखी पूर, भूकंप दुष्काळ, पूर, चक्रीवादळ, सुनामी, उष्ण लाटा, वीज इत्यादी अनेक प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती आहेत.
आपत्ती व्यवस्थापनाची गरज काय आहे
मित्रांनो, आपत्ती ही अशी घटना आहे याचा परिणाम मानवी जीवनावर आणि पर्यावरणावर खूपच मोठा होत असतो. आपत्ती ही नेहमी अनिश्चित असतात जेव्हा कोणालाच माहित नसते तेव्हा आपत्ती घडत असते.
परंतु हे रोखण्यासाठी काहीही करू शकत नाही, मग ही आपत्ती व्यवस्थापनाची गरज आहे. सोप्या भाषेमध्ये सांगायचे झाले तर आपण तिची तयारी आपल्या हातात असते आपण त्याचे व्यवस्थापन कसे करावे हे आपल्यावरच अवलंबून असते.
पूर्वतयारी म्हणून पूर्व चेतावनी आणि जलद निर्णय प्रतिसादांचा प्रभाव किंवा पूर्णपणे हे रोखले जाऊ शकते. आपत्ती व्यवस्थापनासाठी सरकारी हस्तक्षेप आणि योग्य नियोजनाची तसेच निधीची देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यकता असते.
आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपत्ती व्यवस्थापन दल आपत्तीच्या धडकेमध्ये मृत आणि जखमी चे प्रमाण आणि मदत बचाव आणि पुनर्वसन प्रक्रिया मर्यादा घालण्यासाठी लगेच कृतीत उतरणारी सरकारी यंत्रणा ही खूपच महत्त्वाचे असते.
तसेच आपत्तीग्रस्तांना अन्न कपडे आणि औषधे यांसारख्या मदत उपायांमध्ये मदत करता येतात ामध्ये प्रशिक्षित व्यक्ती खूपच मोठ्या प्रमाणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतात. आपत्ती किंवा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी कसे टाळायचे याचे प्रशिक्षण देखील प्रशिक्षित व्यक्तींना आजकालच्या काळामध्ये देणे गरजेचे आहे.
हे नुकसान कमी करण्यासाठी खूपच महत्त्वाची भूमिका बजावत असतात. प्रशिक्षित व्यक्ती ह्या लोकांच्या सामान्य जीवनामध्ये लोकांना सामान्य जीवनात परत आणण्यासाठी एक टीम म्हणून काम करत असतात.
आपत्ती व्यवस्थापन कसे केले जाते
मित्रानो, आपत्ती व्यवस्थापनाचे तीन प्रमुख असणारे टप्पे आहेत. चला तर मग जाणून घेऊ या आपत्ती व्यवस्थापनाचे कोणते प्रमुख तीन टप्पे आहेत ते.

1) आपत्तीपूर्व व्यवस्थापन
मित्रांनो, या व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये प्रशिक्षण जनजागृती उपक्रम यंत्रणांचा सराव तसेच प्रात्यक्षिक आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून यंत्रणांना नेहमी सुसज्ज ठेवण्यात येते. तसेच विविध आपत्ती प्रतिसाद दलांची नेहमी संपर्क समन्वय ठेवणे यामध्ये खूपच महत्त्वाचे असते.
2) आपत्ती प्रसंगी व्यवस्थापन
मित्रांनो यामध्ये प्रत्यक्ष आपत्कालीन प्रसंगी मदत कार्याचे नियोजन खूपच मोठ्या प्रमाणामध्ये करणे तसेच मदत यंत्रणा असते. त्यांना समन्वय राखणे इत्यादी कामे आपत्ती प्रसंगी व्यवस्थापन यामध्ये केली जातात.
3) आपत्ती नंतरचे व्यवस्थापन
मित्रांनो आपत्तीनंतर चे करावे लागणारे मदत कार्य नियंत्रित करणे हे देखील आपत्ती नंतरची व्यवस्थापनामध्ये खूपच महत्त्वाची भूमिका बजावत असते. त्यामध्ये मदत व पुनर्वसन योजनेची योग्य अंमलबजावणी करणे यामध्ये खूपच महत्त्वाचे असते.
आपत्ती व्यवस्थापनामध्ये असणारे आव्हाने
- लक्ष असंतुलन
- अनिश्चिततेचा सामना करणे
- परिस्थितीजन्य जागृकता
- आपत्ती व्यवस्थापनासाठी तसे त्या संघासाठी शिक्षण आणि प्रशिक्षण खूपच कठीण असू शकते
- विकसनशील देश
- क्रॉस ऑर्गनायझेशन संबंध
- आपत्ती दरम्यान लोकांशी संवाद
आपत्ती व्यवस्थापनामध्ये असणारा लोकसहभाग
मित्रांनो, नेहमी मानव निर्मित आणि निसर्ग निर्मित असे आपत्तींचे दोनच प्रकार पडत असतात. विशेष म्हणजे हवामानातील बदलामुळे नैसर्गिक आपत्तीत उद्भवते. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमध्ये जीवित व वित्तहानी होण्याची दाट शक्यता असते.
आपण दैनंदिन व्यवहारातही बघतो जर एखाद्या वाहनाला फार मोठा अपघात झाला किंवा एखादी व्यक्ती अपघातात जखमी झाले तर त्यांना उपचारासाठी त्यांचे प्राण वाचविण्यासाठी समाजातील अनेक जण धावपळ करत असतात.
एकंदरीत सांगायचे झाले तर मानवी संवेदना मुळे ही सकारात्मक वृती समाजाकडून घडत असते. यामध्ये प्रशासनाच्यावतीने सुद्धा योग्य ती दखल घेतली जात असते. म्हणूनच आपत्ती व्यवस्थापन आणि लोकांचा असणारा हा सहभाग यांचं नातं फार जवळच आहे.
तसेच भूकंप महापूर चक्रीवादळ तसेच होणारे अतिवृष्टी यांसारख्या घटणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमध्ये होणाऱ्या सर्व प्रक्रिया आहेत. अशा आपत्तीमध्ये होणारी जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आपत्ती जोखीम व्यवस्थापन अंतर्गत विभागीय व जिल्हास्तरावर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे.

आपत्ती व्यवस्थापनासाठी कोणते उपाय योजना आहेत
मित्रांनो, नेहमी निर्माण होणारे संभाव्य परिस्थितीला हाताळण्यासाठी नेहमी प्रशासन सज्ज असते. याशिवाय पुर परिस्थितीमध्ये देखील प्रशासन नेहमी सज्ज असते. तसेच साथीच्या रोगांना नियंत्रणात ठेवण्यासाठी आरोग्य यंत्रणा,
विद्युतपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरण कंपनी, दूरध्वनी सेवा सुरळीत ठेवण्यासाठी दूरसंचार विभाग अशाप्रकारे सर्व परिस्थितीला हाताळण्यासाठी प्रशासन नेहमी सज्ज असते.
आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय शेवटचे शब्द
मित्रांनो, वरील भागामध्ये आपल्याला आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय या बद्दल सर्व माहिती दिलेलीच आहे. मित्रांनो आपल्याला आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय याबद्दल दिलेली माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.
तसेच मित्रांनो आपत्ती बद्दल आपल्याला काही मनामध्ये शंका असतील तर आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. आम्ही आपल्यासाठी नेहमी नवनवीन माहिती घेऊन येत असतो त्याचप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय याबद्दल दिलेली माहिती आपल्या मित्रांसमवेत शेअर करण्यास देखील विसरू नका.
-
Information4 months ago
गीर गाय दुधाचे फायदे Benefits of Gir Cow Milk in Marathi
-
business ideas4 months ago
ग्रामीण भागातील व्यवसाय संधी Business Opportunities in Rural Areas in Marathi
-
business ideas4 months ago
महिला बचत गटाचे फायदे Mahila Bachat Gat Benefits in Marathi
-
marketing5 months ago
मार्केटिंग कसे करावे How To Do Marketing in Marathi
-
business ideas4 months ago
रोपवाटिका माहिती Nursery Information in Marathi
-
business ideas4 months ago
तेल घाणा उद्योग माहिती Oil Ghana Business Information In Marathi
-
business ideas6 months ago
बचत गट व्यवसाय माहिती Bachat Gat Business Information in Marathi
-
business ideas5 months ago
प्रसिद्ध उद्योगपती टाटा कंपनी माहिती मराठी [Tata Company]