जातीचा दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे: मित्रांनो आपल्याला विविध सरकारी सवलतींचा लाभ घेण्यासाठी जातीचा दाखला हा खूपच महत्त्वाचा असतो.
मित्रांनो जातीचा दाखला म्हणजे आपण ज्या जातीचे आहोत ती प्रामाणिक करणारी सरकारी दस्तावेज म्हणजे जातीचा दाखला असतो. जेव्हा मित्रांनो आपण नागरिक विशिष्ट प्रवर्गातील असतील तेव्हा जातीचे प्रमाणपत्र हे आपल्यासाठी खूपच महत्त्वाचे ठरत असते. महाराष्ट्रामध्ये विविध जातींना प्रमाणपत्र जातीचे दिले जाते.
आज आपण जातीचा दाखला काढण्यासाठी कोण कोणती कागदपत्रे लागतात याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया जातीचा दाखला काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे कोणकोणती आहेत ते.
अनुक्रमणिका
जातीचा दाखला काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे कोणकोणते आहेत
1) जातीचा दाखला काढण्यासाठी रेशन कार्ड झेरॉक्स लागत असते.
2) जातीचा दाखला काढण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला लागत असतो.
3) जर अर्ज करणारी व्यक्ती अशिक्षित असेल तर प्राथमिक शाळेचा प्रवेश दाखला जोडावा लागत असतो.
4) तलाठी रहिवासी दाखला देखील लागत असतो.
जातीचा दाखला कोठे काढावा
मित्रांनो, जातीचा दाखला काढण्यासाठी आता गावोगावी महा ई सेवा केंद्र स्थापन झालेले आहेत. यामध्ये आपण जातीचा दाखला काढण्यासाठी जाऊ शकता.
तसेच मित्रांनो तालुक्याच्या ठिकाणी देखील आपल्याला सेतू कार्यालय झालेले आहेत या ठिकाणी देखील आपल्याला जातीचा दाखला मिळू शकतो. सेतू कार्यालय मध्ये आपण आवश्यक कागदपत्रे दिल्यानंतर आपल्याला जातीचे प्रमाणपत्र मिळते.
सेतू कार्यालय हे माननीय तहसीलदार यांच्या खाली येत असतात. तसेच मित्रांनो आपण तहसीलदार कार्यालय मध्ये सुद्धा आपण जातीच्या दाखल्यासाठी प्रस्ताव सादर करू शकता.
जातीचा दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे याबद्दलचा निष्कर्ष
मित्रांनो, आपल्याला विविध सरकारी सवलतीचा लाभ घेण्यासाठी जातीचा दाखला खूपच आवश्यक असतो. आपल्याला वरील प्रमाणे दिलेले कागदपत्रांच्या यादीमध्ये आपण जातीचा दाखला काढण्यासाठी कागदपत्रे आपल्याला खूपच उपयोगी ठरणार आहे. तसेच आपण जातीचा दाखला हा आपल्या गावामध्ये देखील काढू शकता.
आपल्याला वरील प्रमाणे दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच आपल्याला आणखी कोणती माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.