ड्रायव्हिंग लायसन्स साठी लागणारी कागदपत्रे: मित्रांनो तुमच्याकडे जर दुचाकी असेल तसेच स्कूटर असेल किंवा चार चाकी वाहन असेल तर आपल्याला ड्रायव्हिंग लायसन्स काढणे खूपच गरजेचे असते. आपल्याकडे जर ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर आपण विनापरवाना वाहन चालवणे हा एक कायदेशीर गुन्हा आहे.
हा नियम आपल्याला मित्रांनो माहीतच असेल मित्रांनो आजकालच्या काळामध्ये वाहन चालवण्याचा परवाना हा ओळखपत्र म्हणून देखील वापर केला जातो.
मित्रांनो आपले जर 18 वर्षे पूर्ण झाले असतील तर आपण नक्की ड्रायव्हिंग लायसन्स काढून घ्यावे. आज आपण ड्रायव्हिंग लायसन्स साठी लागणारी कागदपत्रे कोणकोणती आहेत याची माहिती जाणून घेणार आहोत.
ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहेत
1) ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आपल्याला आधार कार्ड लागत असते.
2) ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आपल्याला मतदान कार्ड देखील लागत असते.
3) आपल्या घरचे विज बिल हे देखील लागत असते.
4) आपले टेलिफोन बिल देखील लागत असते.
5) आपला रहिवासी पुरावा म्हणून रेशन कार्ड देखील लागत असते.
6) आपल्याकडे सरकारी कर्मचाऱ्यांनी दिलेले कोणतेही ओळखपत्र असणे गरजेचे असते.
7) आपल्या वयाचा पुराव्यासाठी आपल्याला दहावीचे बोर्डाचे गुणपत्रक तसेच सर्टिफिकेट लागत असते त्याचबरोबर जन्म प्रमाणपत्र असले तरी देखील चालते.
8) पॅन कार्ड देखील लागत असते.
मित्रांनो, आपल्याकडे जर वरील प्रमाणे दिलेली कागदपत्रे नसतील तर आपण आपल्या तालुका दंडाधिकार्याने दिलेले प्रतिज्ञापत्र सादर करणे गरजेचे असते.
ड्रायव्हिंग लायसन्स साठी लागणारी कागदपत्रे याबद्दलचा निष्कर्ष
मित्रांनो, ड्रायव्हिंग लायसन्स काढणे आजकालच्या काळामध्ये खूपच गरजेचे बनलेले आहे. मित्रांनो ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आपल्याला वरील प्रमाणे दिलेल्या कागदपत्रांची पूर्तता करणे खूपच गरजेचे असते.
मित्रांनो आपल्याला वरील प्रमाणे दिलेली ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी कागदपत्रे याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच वरील प्रमाणे दिलेले माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर नक्की करा.