Connect with us

Schemes

Education Loan Information in Marathi । शिक्षण कर्ज बद्दल संपूर्ण माहिती, कमीत कमी व्याजदर

Published

on

Education loan information in Marathi

Education loan information in Marathi: मित्रांनो, आपल्याला उच्च शिक्षण करायचे असल्यास आपल्याला बँकेकडून नेहमी कर्ज मिळत असते. आज आपण शैक्षणिक कर्जाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

शैक्षणिक कर्ज विविध बँकेद्वारे काही अटी पूर्ण करून आपल्याला मिळत असते. शैक्षणिक कर्ज मिळत असल्याने आपले शिक्षण घेणे खूपच सोपे झालेले आहे. चला तर मित्रांनो जाणून घेऊया शैक्षणिक कर्ज याबद्दल अगदी सविस्तर माहिती आपल्या मराठी मातृभाषेमध्ये.

Education Loan Information in Marathi शैक्षणिक कर्जाची माहिती मराठीत

मित्रांनो, आज कालच्या काळामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज मुळे आपले उच्च शिक्षण पूर्ण करणे खूपच सोयीचे झालेले आहे.

तसेच आजकालच्या काळामध्ये विविध बँका शैक्षणिक कर्जासाठी नेहमी वेगवेगळ्या स्कीम देखील लागू करत आहेत. यामुळे आपल्याला बऱ्याचदा व्याजदरामध्ये फायदा होऊ शकतो आणि होत आहे.

शैक्षणिक कर्ज म्हणजे काय

मित्रांनो, शैक्षणिक कर्ज म्हणजे जे विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी घेतले जाणारे कर्ज याला शैक्षणिक कर्ज असे म्हणतात.

मित्रांनो आपण भारत देशामध्ये किंवा इतर परदेशी शिक्षण घेण्यासाठी शैक्षणिक कर्ज देखील घेऊ शकता. मित्रांनो आजकालच्या काळामध्ये विविध बँका शैक्षणिक कर्जासाठी बऱ्याच वेगवेगळ्या स्कीम लागू करत आहे.

त्यामुळे यामध्ये व्याजदरामध्ये आपल्याला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होत आहे. मित्रांनो शैक्षणिक कर्ज मध्ये आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्याला एक वर्षाची वाढीव मुदत देखील दिली जाते.

कर्ज परतफेड करण्यासाठी आणि आपल्याला यानंतर महिन्याला व्यास देखील भरावी लागत असते. जर मित्रांनो तुमच्याकडे जर पैसे असल्यास तुम्ही शैक्षणिक कर्जाचे पूर्ण पेमेंट एका वेळेस देखील करू शकता.

शैक्षणिक कर्ज कोणाला मिळते

1) कर्ज घेणारे व्यक्ती ही भारतीय नागरिक असावी.

2) कर्ज घेणाऱ्या व्यक्तीने पूर्णवेळ पदविका तसेच पदवी अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेला असावा.

कोणत्या कारणांसाठी बँका कर्ज देतात

1) महाविद्यालयासाठी बँक कर्ज देत असतात.

2) प्रयोगशाळेमध्ये शुल्क भरण्यासाठी बँका कर्ज देत असतात.

3) शिक्षणासाठी उपकरणे खरेदी करण्यासाठी बँक कर्ज देत असतात.

4) संगणकाची खरेदी करण्यासाठी बँका कर्ज देत असतात.

शैक्षणिक कर्जाचे प्रकार कोणते आहेत

1) परदेशी शिक्षण कर्ज

या कर्ज प्रक्रियेमध्ये जे कर्ज विद्यार्थ्यांना परदेशी कॉलेज किंवा युनिव्हर्सिटी मध्ये त्यांच्या इच्छा नुसार अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे स्वप्न साकार करण्यास नेहमी मदत करत असतात.

2) स्वदेशी शिक्षण कर्ज

भारत देशामध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी या कर्ज प्रकारासाठी अर्ज देखील करू शकतात. अर्जदाराने भारतीय शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेतल्यानंतर आणि कर्जदाराची इतर सर्व अटी पूर्ण केल्यास तरच कर्ज मंजूर देखील केले जाते.

शैक्षणिक कर्ज साठी लागणारे कागदपत्रे

1) शैक्षणिक कर्जासाठी सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट लागत असते.

2) केवायसी डॉक्युमेंट लागत असतात जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड.

3) महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतल्याचा पुरावा ऍडमिशन लेटर लागत असते. त्याचबरोबर काही ऍडमिशन ची पावती देखील लागत असते.

4) आपण पास झालेल्या दहावी बारावीचा रिझल्ट तसेच बोर्ड सर्टिफिकेट देखील लागत असते.

शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी पात्रता काय लागते

1) शैक्षणिक कर्ज घेणाऱ्या उमेदवाराचे वय हे अठरा वर्षापेक्षा जास्त असायला हवे.

2) शैक्षणिक कर्ज घेणारे व्यक्ती भारताची नागरिक असायला हवी.

3) लोन घेणाऱ्या व्यक्तीचे बँकेमध्ये खाते असायला हवे.

4) शैक्षणिक कर्ज घेणारे विद्यार्थ्यांनी संस्था तसेच महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणे गरजेचे असते.

5) उच्च शिक्षण अभ्यासक्रमासाठी एज्युकेशन लोन मिळत असते.

शैक्षणिक कर्जाचे असणारे फायदे

1) शिक्षणानंतर आपल्याला पैसे द्यावे लागत असतात.

2) शैक्षणिक कर्ज मध्ये सोपे परतफेड करण्याची सोय झालेली असते.

3) जर तुमचे डॉक्युमेंट बरोबर असल्यास तुम्हाला एका आठवड्याच्या आत मध्ये देखील शैक्षणिक कर्ज मिळू शकते.

4) जॉब लागेपर्यंत शैक्षणिक कर्ज परतफेड करण्याची संधी उपलब्ध होत असते.

शैक्षणिक कर्जाचे असणारे तोटे

1) शैक्षणिक कर्ज मध्ये रेट ऑफ इंटरेस्ट नेहमीच बदलत असतो.

2) जर मित्रांनो तुम्हाला जर शैक्षणिक कर्ज मिळाले तर तुम्ही कॉलेज किंवा कोर्स चेंज करू शकत नाही.

3) चार लाखांच्या वर कर्जासाठी आपल्याला गॅरेंटर आवश्यक असतो.

एज्युकेशन लोन देणारा बँका कोणत्या आहेत

  • ॲक्सिस बँक
  • एचडीएफसी बँक
  • स्टेट बँक ऑफ इंडिया
  • आयडीबीआय बँक
  • कॅनरा बँक

निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज हे खूपच उपयोगी पडत असते. वरील प्रमाणे दिलेले एज्युकेशन लोन याबद्दलची माहिती आपल्याला नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.

तसेच आपल्याला वरील प्रमाणे दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच वरील प्रमाणे दिलेली माहिती आपण आपल्या मित्रपरिवार सोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

Trending