Connect with us

Schemes

लगेच घरासाठी कर्ज पाहिजे । Home Loan Information in Marathi

Published

on

घरासाठी कर्ज पाहिजे

घरासाठी कर्ज: भारत देशामध्ये विविध प्रकारच्या गृहकर्जांचा वापर हा नवीन घर तसेच अपार्टमेंट किंवा जमिनीचा तुकडा खरेदी करण्यासाठी नेहमी केला जात असतो.

आज आपण आपल्याला नवीन घर बांधण्यासाठी तसेच जुने घर नवीन करण्यासाठी कर्ज योजना याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो कोणताही वेळ न वाया घालवतात जाणून घेऊया घरासाठी कर्ज याबद्दलच्या अगदी सविस्तर माहिती.

नवीन घर बांधण्यासाठी तसेच जुने घर नवीन करण्यासाठी घरासाठी कर्ज

मित्रांनो, आपल्या प्रत्येकाचे नेहमी स्वप्न असते की स्वतःचे घर आणि त्यासाठी आपण नेहमी पैशाची व्यवस्था करत असतो. पैसे कमी पडले तर आपल्याला घरासाठी कर्ज काढावे लागत असते.

मित्रांनो घरासाठी काढलेल्या कर्जाला होम लोन देखील म्हटलं जातं. मराठीमध्ये आपण त्याला गृह कर्ज देखील असं बोलतो हे होम लोन कसे मिळते याबद्दलची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. त्याबद्दलची प्रोसेस काय आहे याबद्दलची देखील माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

घरासाठी कर्ज पात्रता निकष

1) अर्जदाराचे वय हे 18 वर्षे ते 65 वर्षे असावे लागत असते.

2) अर्जदार भारताचा रहिवासी असणे आवश्यक आहे.

3) स्वयं रोजगार आणि पगार जर व्यक्ती असणे आवश्यक आहे.

4) अर्जदाराचा सिबिल स्कोर हा 750 च्या वर असणे आवश्यक आहे.

5) अर्जदाराचे उत्पन्न हे दर महिना कमीत कमी 25 हजार असणे आवश्यक आहे.

1) नवीन घर खरेदी करण्यासाठी कर्ज

मित्रांनो, जर तुम्ही नवीन घर खरेदी करणार असाल तर तसेच विकत घेणार असाल तर कर्ज आपल्याला घ्यावे लागत असते. यामध्ये बँक आपल्याला 80 ते 90% रक्कम देत असते.

ती रक्कम बिल्डरला बँकेकडून दिली जात असते जोपर्यंत कर्जाचे हप्ते पूर्ण होत नाही तोपर्यंत घरावर बँकेचा ताबा असतो. बँकेकडे घर गहाण राहत असते कर्ज पूर्ण फिटल्या नंतर बँकेकडून एनओसी दिली जात असते.

घरासाठी कर्ज पाहिजे

2) जुने घर खरेदी करण्यासाठी

जर मित्रांनो तुम्ही जुने घर घेणार असाल तर कर्ज देखील दिले जाते पण हे कर्ज देताना खूप मोठी प्रोसेस असते. या कर्जासाठी वेळ देखील लागत असतो सहजासहजी हे कर्ज भेटत देखील नाही.

3) जागा खरेदी करण्यासाठी

जर मित्रांनो आपल्याला घरासाठी जागा खरेदी करायची असेल तर आपल्याला बँकेकडून कर्ज मिळत असते. पण हे कर्ज घेताना आपल्याला उत्पन्नाचा विचार देखील केला जात असतो.

सरकारी नोकरी किंवा जास्त पगाराची परमनंट अशी खाजगी नोकरी असेल किंवा जर तुमचे व्यवसायातील उत्पन्न जास्त असेल तर एक कर्ज आपल्याला सहजपणे दिले जात असते. अन्यथा सहजासहजी हे कर्ज देखील मिळत नाही.

4) बांधकाम करण्यासाठी

जर मित्रांनो तुम्हाला तुमची स्वतःची जागा असेल तर त्या जागेवर बांधकाम करायचे असेल तर बँक कर्ज देत असते. आपल्याला जागा व त्यावर बांधलेले बिल्डिंग बँकेकडे गहाण राहत असते.

मित्रांनो या कर्ज प्रक्रियेमध्ये जर आपल्याकडे स्वतःची जागा असेल तर जागेची किंमत जास्त असेल तर कर्ज आपल्याला सहजपणे मिळत असते.

घरासाठी कर्ज घेण्यासाठी बँकेची निवड कशी करावी

मित्रांनो, आपल्याला घरासाठी कर्ज घेण्यासाठी योग्य बँकेची निवड करावी लागत असते. यामध्ये सरकारी बँका खाजगी बँका फायनान्स कंपनी तसेच इतर अनेक पर्याय देखील आहे.

शक्यतो सरकारी बँक हा चांगला पर्याय आहे. सरकारी बँकेतून घरासाठी कर्ज मिळणे थोडे अवघड काम असते पण तिथला व्याजदर देखील खूपच कमी असतो. सरकारी योजना व अनेक फायदे देखील आपल्याला यामधून मिळत असतात.

घरासाठी कर्जाची माहिती

मित्रांनो, आपण बँकेमध्ये जाऊन कर्जाची संपूर्णपणे माहिती घेणे खूपच आवश्यक आहे. कर्जाची रक्कम तसेच कर्ज परतफेड पद्धत व्याजदर सरकारी योजनांचा लाभ बँकेचे नियम व इतर महत्त्वाची माहिती देखील घेणे खूपच गरजेचे आहे.

घरासाठी कर्ज पाहिजे

घरासाठी कर्ज यासाठी लागणारी कागदपत्रे

1) ओळखीचा पुरावा

2) उत्पन्नाचा पुरावा

3) बँक पासबुक

4) आयडेंटिटी फोटो

5) पॅन कार्ड

घरासाठी कर्जाची परतफेड

मित्रांनो, आपण प्रत्येक महिन्याला हप्ता भरून आपण पाच ते 30 वर्षे या मुदतीमध्ये कर्जाची परतफेड करू शकतो. आधी मध्ये आपण जास्त रक्कम भरून देखील कर्जाचे मुद्दल कमी करता येत असते.

कालावधी समाप्त होण्याच्या आत कर्जाची परतफेड देखील करता येत असते. पण यासाठी बँकेचे काही वेगवेगळे नियम देखील असतात हे देखील आपण जाणून घेतले पाहिजे.

घरासाठी कर्ज घेण्याचे फायदे

1) व्याजदर कमी

मित्रांनो, गृहकर्जावर व्याजदर हे इतर कोणते कर्जाच्या प्रकारापेक्षा खूपच कमी आहेत. त्यामुळे तुम्ही आर्थिक अडचणीत असल्यास तुम्हाला तुमच्या सध्याच्या गृहकर्जाला पूरक ठरेल असे कर्ज पर्सनल लोन पेक्षा कमी दरामध्ये मिळू शकते आणि आपण परिस्थितीवर देखील मात करू शकतो.

2) कराचे सवलती

मित्रांनो, घरासाठी कर्ज घेण्याचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे तुम्ही करत असलेल्या मुद्दलाच्या रकमेवर आणि व्याजावर तुम्ही प्राप्त करातील वजावट देखील खूपच सहजपणे मिळू शकतात.

निष्कर्ष

मित्रांनो, वरील प्रमाणे दिलेली माहिती आपण जर घरासाठी कर्ज घेत असाल तर आपल्याला खूपच उपयोगी पडणार आहे. मित्रांनो आपल्याला घरासाठी कर्ज याबद्दल दिलेली माहिती आपल्याला नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.

मित्रांनो आपल्याला वरील प्रमाणे दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच आपल्याला इतर कोणती माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच मित्रांनो वरील प्रमाणे दिलेली माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending