शेळीपालन अनुदान योजना । Goat Farming Anudan Yojana Marathi

शेळी पालन अनुदान योजना

शेळीपालन अनुदान योजना: मित्रांनो, आपण जर व्यवसाय करायचा विचार करत असाल तर शेळी पालन हा व्यवसाय शेतीपूरक असा असणारा व्यवसाय आहे.

मित्रांनो, ग्रामीण भागामध्ये खूपच मोठ्या पद्धतीमध्ये शेळीपालन व्यवसाय केला जातो. मित्रांनो आपल्याला जर शेळीपालन हा व्यवसाय सुरू करायचा असेल त्यासाठी आपण अनुदान शोधत असाल

तसेच अनुदान याविषयी आपल्या डोक्यामध्ये विचार येत असेल तर आज आपण योग्य ठिकाणी आहात. चला तर मित्रांनो जाणून घेऊया शेळीपालन अनुदान योजना काय आहे याबद्दल अगदी सविस्तर माहिती.

शेळीपालन अनुदान योजना माहिती मराठीमध्ये Goat Farming Subsidy Scheme Information in Marathi

मित्रांनो, महाराष्ट्र मध्ये शेळी पालन करण्यासाठी हवामान हे अतिशय चांगले आहे. पात्रता असलेल्या शेतकऱ्यांना नेहमी अनुदान देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने नॅशनल बँकेचे कृषी व ग्रामीण विकास संस्था हे देखील सहकार्य करत असतात.

लोकांना शेळी पालन करण्यास प्रवृत्त करणे हे देखील या संस्थांचे मुख्य उद्दिष्ट आहे. खादी ग्रामोद्योग तसेच संबंधित संस्थांकडून शेळीपालन संबंधित सर्व माहिती जसे की बकरीच्या जाती त्यांचे वैशिष्ट्य, आहार त्यांना राहण्यासाठी शेड, रोग आणि उपचारांविषयी अचूक माहिती हे देखील हे सरकारकडून आपल्याला मिळत असते.

तसेच शेळी पालन करण्यासाठी सरकारी महाराष्ट्र सरकारकडून अनुदान देखील खूपच चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये मिळत आहे.

शेळीपालन अनुदान योजनेसाठी पात्रता काय आहे

1) अर्जदाराकडे मॉडेल प्रोजेक्ट अहवाल असावा लागतो. यामध्ये बकरी विकत घेतल्याबद्दल बकरीची खरेदी किंमत तसेच खर्च आणि लाभ दर्शविला जाणे आवश्यक आहे.

2) 100 शेळी साठी नऊ हजार चौरस मीटर जागा असावी लागते जमीन भाड्याची असेल तर त्याचे करार पत्र जोडावे लागते.

3) लाभार्थ्याच्या वतीने दोन लाख रुपये गुंतवावे लागतात. जर शेतकरी कर्ज घेण्यास तयार असेल तर त्याच्याकडे एक लाख रुपयांचा चेक, पासबुक, एफडी किंवा कर्ज घेण्यासाठी इतर कोणत्याही प्रकारचे प्रवेश असले तरी चालतात.

शेळीपालन अनुदान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागतात

1) आधार कार्ड लागत असते.

2) पॅन कार्ड लागत असते.

3) अर्जदाराचे फोटो लागत असतात.

4) रहिवासी दाखला लागत असतो.

5) जात प्रमाणपत्र लागत असते.

शेळीपालन अनुदान योजना अर्ज प्रक्रिया

मित्रांनो, तुम्हाला जर शेळीपालन अनुदान योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. कारण की महाराष्ट्र सरकारकडून अद्याप शेळीपालन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रणाली सुरू करण्यात आलेली नाही.

सर्वात प्रथम तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या आपले सरकार पोर्टलवर जावे लागेल तिथून सर्व आपल्याला माहिती मिळेल. तसेच तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतशी सुद्धा संपर्क करू शकता ग्रामपंचायत मधून देखील तुम्हाला शेळीपालन अनुदान योजनेसाठी माहिती मिळेल.

शेळीपालन अनुदान योजनेसाठी नियम व अटी काय आहेत

1) मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना शेळीपालन सुरू करायचे आहे त्यांच्याकडे शेळ्या पाळण्यासाठी जमीन असणे आवश्यक आहे.

2) शेळ्यांची निगा व त्यांच्या चाऱ्याची योग्य व्यवस्था करावी लागते.

3) शेतकऱ्यांकडे चारा पिकवण्यासाठी जमिनीची व्यवस्था असावी लागते.

4) शेळीपालन कर्ज योजनेअंतर्गत शेळी पालन व्यवसाय सुरू करत असताना तुम्हाला स्वतःहून दोन लाख रुपये गुंतवावे लागतात.

5) अर्जदाराचा नेहमी शेळी पालन प्रकल्प असावा लागतो. ज्यामध्ये शेळीची किंमत असावी लागते. तसेच शेळ्यांची माहिती देखील असावी लागते.

निष्कर्ष

मित्रांनो, वरील प्रमाणे दिलेली शेळी पालन अनुदान योजना याबद्दलची माहिती आपल्याला नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.

मित्रांनो आपल्याला वरील प्रमाणे दिलेली शेळीपालन अनुदान योजना याबद्दलची माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच आपल्याला आणखी कोणत्याही अनुदानाबद्दल अनुदानाबद्दल माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच मित्रांनो शेळी पालन अनुदान योजना याबद्दल दिलेली माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिहि विसरू नका.

शेळीपालन अनुदान योजना । Goat Farming Anudan Yojana Marathi

Leave a Reply

Your email address will not be published.

Scroll to top