Connect with us

business ideas

शेळी पालन कसे करावे Goat Farming Information in Marathi

Published

on

शेळी पालन कसे करावे

शेळी पालन कसे करावे नमस्कार मित्रांनो आज आपण शेळीपालन हे कशा पद्धतीने केले जाते तसेच शेळीपालन कसे करावे याबद्दल अगदी सविस्तर माहिती पाहणार आहोत. मित्रांनो आपल्याला जर शेळीपालन करायचे असेल तर आपल्याला शेळ्यांची निवड कशी करावी हे देखील आपल्याला माहिती असावी लागते.

शेळ्यांसाठी कोणता खुराक लागतो हे देखील आपल्याला माहिती असणे अगदी गरजेचे असते. भारत देशामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये शेळ्यांच्या अनेक जाती आहेत

प्रामुख्याने आज आपण कोणकोणत्या जाती महाराष्ट्रामध्ये पाळल्या जातात तसे त्या जाती पासून आपल्याला कोणकोणते जास्त मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन मिळू शकेल चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया. शेळीपालन कसे करावे याबद्दल अगदी सविस्तर अशी माहिती.

शेळी पालन कसे करावे Goat Farming Information in Marathi

मित्रांनो, आपल्याला या लेखांमध्ये शेळीपालन कसे करावे याबद्दल अगदी सविस्तर माहिती आम्ही देणार आहोत. त्याच बरोबर आम्ही सर्वप्रथम आपल्याला शेळीपालन करताना कोणकोणते प्रश्न पडतात याबद्दल अगदी सविस्तर माहिती आपण सर्वप्रथम जाणून घेऊया.

शेळी पालन करत असताना आपल्याला पडणारे प्रश्न

  • शेळी पालन करताना आपल्याला शेळ्यांच्या चाऱ्याचे व करडांचे योग्य पद्धतीने नियोजन करता आले पाहिजे.
  • तसेच आपल्याला जर शेळी पालन करायचे असेल तर आपल्याला शेळ्यांसाठी राहण्यासाठी शेडची आवश्यकता आहे. खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असते म्हणूनच आपल्याला शेळ्यांसाठी शेड चे व्यवस्थापन करावे लागते.
  • तसेच शेळ्यांच्या वेगवेगळ्या जाती निवडणे देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये गरजेचे असते. आजकालच्या काळामध्ये शेळ्यांच्या खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या जाती आपल्याला पाहण्यास मिळतात. म्हणूनच आपण शेळ्यांच्या विविध जाती कोणकोणत्या आहेत हे देखील निवडणे खूपच गरजेचे असते.

योग्य शेळ्यांची निवड कशी करावी

शेळी पालन कसे करावे. योग्य शेळ्यांची निवड कशी करावी

शेळी पालन करत असताना आपल्याला शेळ्यांचे योग्य पद्धतीने निवड करणे खूपच महत्त्वाचे आणि गरजेचे असते. आजकालच्या काळामध्ये शेळ्यांच्या विविध प्रकारच्या जाती आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहण्यास मिळत असतात.

मित्रांनो आपण शेळ्यांची तसेच बोकडांची निवड करत असताना खालील प्रमाणे दिलेली माहिती अगदी सविस्तर रीत्या जाणून घेणे खूपच गरजेचे असते.

  1. आपण ज्या ठिकाणाहून शेळ्या विकत घेत असाल त्या ठिकाणाची माहिती तसेच शेळ्या विकत घेणाऱ्या माणसाची माहिती आपल्याला योग्य रित्या असणे गरजेचे असते.

    त्याचप्रमाणे शेळ्यांच्या आईचा पूर्व इतिहास आपल्याला पाहणे देखील गरजेचे असते. जेणेकरून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये त्या शेळ्या बद्दल खूपच सविस्तर अशी माहिती तसेच त्या शेळ्यांच्या चारा नियोजन आपल्याला करता येईल.
  2. प्रत्येक वर्षामध्ये शेळी ही तीन वेत देणारी असावी तसेच शेळी ही दोन ते तीन पिल्लांना जन्म देणारी असावी.
  3.  शेळी ही सशक्त असावी तसेच ती पिल्लांना निरोगी पद्धतीने जन्म देणारी असावी तसेच शेळी ही कमीत कमी दहा वेत देणारी असावी. 
  4. आपण शेळीची निवड करत असताना ती शेळी ही शेळ्यांच्या कळपात राहणारी असावी तसेच शेळ्यांमध्ये मिळून मिसळून राहणारी असावी.

शेळ्यांच्या असणाऱ्या विविध प्रकारच्या जाती

शेळ्यांच्या असणाऱ्या विविध प्रकारच्या जाती

शेळ्यांच्या विविध प्रकारच्या जाती महाराष्ट्र मध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येत असतात. त्याच प्रमाणे आज आपण शेळ्यांच्या मुख्य असणाऱ्या जाती तसेच फायदेशीर असणाऱ्या जाती कोणकोणत्या आहेत.

जर आपण शेळीपालन करण्याचा विचार करत असाल तर आपल्याला शेळी पालन का करावे तसेच शेळीपालन कसे करावे ही माहिती असणे अगदी गरजेचे असते. चला तर मग जाणून घेऊया शेळ्यांच्या असणाऱ्या विविध प्रकारच्या जाती कोणकोणत्या आहेत ते.

1) जमनापरी

भारत देशामध्ये उत्तर प्रदेशामध्ये ही जात प्रामुख्याने आढळते तसेच गंगा यमुना नदीच्या खोऱ्यामध्ये या जातीचा प्रामुख्याने शिरकाव हा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आहे.

जमनापरी ही जात शेळ्यांची दुधासाठी उत्तम मानली जाते त्याप्रमाणे जमनापुरी शेळ्यांची उंचीही वाढत असते त्या सर्वात जास्त उंचीच्या असणाऱ्या शेळी असतात. या शेळ्या रंगाने पांढरी असतात तसेच या शेळ्यांच्या मानेवर ठिपके असतात तसेच या शेळ्या पिवळ्या रंगाच्या देखील असतात.

2) बीटल

बिटल शेळी ची जात प्रामुख्याने पंजाब राज्यामध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आढळली जाते. बिटल शेळी ची शिंगे मागे वळलेली तसेच चपटी असतात बिटल या शेळीचे वजन हे 40 ते 50 किलोपर्यंत असते.

तसेच बिटल बोकडाचे वजन हे 50 ते 80 किलोपर्यंत असते. बिटल या शेळी चे कान हे लांब असतात बिटल शेळी दिवसाला तीन ते चार लिटर दूध देत असते. बिटल शेळी यांमध्ये शेळ्यांचे कलर हे हे विविध रंगांमध्ये आढळतात परंतु तपकिरी हा रंग त्यांचा प्रामुख्याने आहे.

3) उस्मानाबादी

महाराष्ट्र मधील असणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये या शेळ्यांचा शिरकाव हा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तसेच उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये या शेळ्यांच्या जाती या खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आहे.

तसेच महाराष्ट्रामध्ये उस्मानाबाद शेळ्यांचा प्रमाण हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आहे. उस्मानाबादी शेळ्या दुधासाठी तसेच मटणासाठी पाळल्या जातात. उस्मानाबादी शेळी आकाराने खूपच मोठे असतात.

उस्मानाबादी शेळ्या ह्या काळे रंगाच्या जास्त प्रमाणामध्ये असतात त्याचप्रमाणे यांच्या पांढरा तसेच तपकिरी यामध्ये देखील या शेळ्या खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येतात. आपण शेळीपालन करत असाल तर आपल्याला शेळ्यांच्या जाती माहिती असणे खूपच गरजेचे असते.

4) सिरोही

भारत देशामध्ये ही शेळी ची जात दुधासाठी तसेच मटणासाठी वापरली जाणारी तसेच पाळली जाणारी जात आहे. शिरोही शेळी खूपच वजनाने मोठी होत असते प्रामुख्याने शिरोही ही शेळी ची जात राजस्थान मधील शिरोही या गावची मुख्य आहे.

शिरोही शेळी पालन करण्यासाठी जात खूपच महत्त्वाचे आहे शिरोही या जातीच्या असणाऱ्या बोकडाचे वजन हे 40 ते 50 किलोपर्यंत असते शेळी पालन कसे करावे यासाठी ही माहिती अगदी उपयुक्त आहे.

शेळ्यांचे व्यवस्थापन कसे करावे

  • मित्रांनो, आपण जर बंदिस्त शेळीपालन करत असाल तर आपल्याला एका शेळीला पंधरा ते वीस स्केअर फुट जागा देणे खूपच महत्त्वाचे असते.
  • आपण शेळी पालन करत असताना शेळ्यांच्या शेड साठी आपण शेडला जाळी मारून घ्यावी.
  • शेडला जाळी मारल्यानंतर शेडमध्ये हवा खेळती राहील याचा देखील आपण विचार करणे गरजेचे असते.
  • शेडची उभारणी झाल्यानंतर त्या शेडमध्ये आपण सर्वप्रथम कोबा करून घेणे गरजेचे असते त्यानंतर तो कोबा शेणाने सारवणे गरजेचे असते.

दुधाळ शेळी ची लक्षणे कोणकोणते असतात

दुधाळ शेळी ची निवड करताना आपल्याला शेळ्यांचे काही गुणधर्म माहिती असणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे आपल्याला जर दुधाळ शेळ्यांची निवड करायचे असेल तर आपल्याला त्या शेळीची तोंड आपल्याला सर्वप्रथम पाहणे गरजेचे असते. शेळीचे तोंड हे कमी रुंदीचे असावे तसेच त्यांचा तोंडाचा भाग व्यवस्थितपणे वाढलेला असावा.

शेळीचा चेहरा हा बोकडासारखा नसावा तसेच शेळीचे डोळे हे नेहमी पाणीदार असावेत. त्याचप्रमाणे मान आणि खांदे हे लांब असावेत शेळीचे छाती ही भरदार असावी. त्याच प्रमाणे शेळीचे पुढचे पाय हे सरळ असावेत शेळीच्या पोटाखाली असणाऱ्या दुधाच्या शिरा ह्या लांब असाव्यात शेळीच्या स्थानामध्ये कोणत्याही प्रकारचा टणकपणा नसावा.

शेळी पालन कसे करावे

शेळ्यांसाठी महत्त्वाचे खुराक

असणारे सर्वसाधारणपणे शेळ्या हे आपल्या खाण्याची भूक ही 70 टक्क्यांपर्यंत झाड पाल्यावर भागवत असतात. त्याच प्रमाणे 30 ते 40 टक्के भूक ही शेळ्या गवतावर भागवत असतात. शेळ्यांच्या गर्भाची वाढ सुरुवातीला तीन महिन्यांपर्यंत कमी प्रमाणामध्ये होत असते.

तीन महिन्यानंतर शेळ्यांच्या गर्भाची वाढ ही मोठ्या प्रमाणामध्ये होत असते. गर्भ वाढीसाठी शेळ्यांना सकस आहार देणे खूपच गरजेचे असते. शेळ्यांसाठी आपण शेंगदाणा पेंड दिल्यास शेळ्यांच्या करडांना वजन वाढीसाठी याचा खूपच महत्वपूर्ण असा फायदा होत असतो.

शेळी चारा लागवड

मित्रांनो, आपलं जर शेळीपालन करायचे असेल तर आपण सर्वप्रथम आपल्याला शेळ्यांच्या खाण्याचा प्रश्न आपण मिटवला पाहिजे. म्हणूनच आज आपण शेळ्यांसाठी कोण कोणत्या पद्धतीचा आपण चारा निवडला पाहिजे याची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

शेळ्यांसाठी आपण गिनी गवत, हादगा, कडवळ, दशरथ घास, सुबाभूळ अशा प्रकारचा चारा आपण शेळ्यांना दिला पाहिजे अशाप्रकारे आपण शेळ्यांसाठी चारा लागवड केले पाहिजे.

शेळ्यांसाठी लागणारे शेड

मित्रांनो, आपल्याला जर बंदिस्त शेळीपालन करायचे असेल तर आपल्याला शेळ्यांसाठी शेडची उभारणी करणे खूपच गरजेचे असते. शेळ्यांना ऊन वारा पाऊस यांपासून बचाव करण्यासाठी आपल्याला शेळ्यांसाठी शेड ची गरज असते.

त्याच प्रमाणे त्यांना हिंसक प्राण्यांपासून वाचवण्यासाठी देखील शेडची गरजही खूपच मोठ्या प्रमाणामध्ये भासत असते. यासाठी आपण शेळ्यांसाठी सर्वप्रथम शेड उभारले पाहिजे.

शेळी पालन कसे करावे

शेळी पालनासाठी असणारे अनुदान

महाराष्ट्रामधील बेरोजगार तरुणांना रोजगार प्राप्त करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने बंदिस्त शेळी पालन योजना ही दिलेली आहे. यामध्ये 20 शेळ्या व बोकड अशी योजना आहे ग्रामीण भागांमध्ये ही योजना राबवली जाते.

राष्ट्रीय कृषी योजनेअंतर्गत ही योजना तयार करण्यात आलेली आहे. मित्रांनो आपल्याला जर चालू वर्षाचे शेळीपालन योजना यांची माहिती हवी असल्यास आपण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आम्ही आपल्यासाठी चालू वर्षाची शेळी पालन योजना तसेच शेळीपालन योजनेसाठी लागणारा फॉर्म देखील आम्ही आपल्यासाठी उपलब्ध करून देऊ.

शेळी पालन कसे करावे Goat Farming Information in Marathi निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला शेळीपालन कसे करावे याबद्दल दिलेली माहिती आवडलीच असेल अशी आम्हाला आशा आहे. त्याचप्रमाणे आपल्याला शेळीपालन आपण कोठे करू शकतो याची देखील माहिती आम्ही आपल्यासाठी दिलेले आहे.

त्याच प्रमाणे शेळीपालन साठी लागणारे अनुदान तसेच शेळी पालन करण्यासाठी असणारे योजना याची देखील माहिती आम्ही आपल्यासाठी दिलेली आहे. आपल्याला शेळीपालन कसे करावे याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आम्ही नेहमी आपल्यासाठी नवनवीन माहिती घेऊन येत असतो.

4 Comments

4 Comments

  1. Pingback: म्हैस पालन माहिती मराठी या व्यवसायातून महिना 4 लाख उत्पन्न (New)

  2. Pingback: शेती कशी करावी आणि सर्वात जास्त नफा कसा कमवावा [New Guide]

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending