Connect with us

Farmers Guide

गोठा बांधण्याची पद्धत कोणती चांगली आहे, ज्यामुळे नफा हा जास्त प्रमाणात राहील

Published

on

गोठा बांधण्याची पद्धत

गोठा बांधण्याची पद्धत: नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण गाई म्हशींसाठी तसेच शेळीपालनासाठी गोठा कसा बांधावा याची माहिती जाणून घेणार आहोत. तसेच गोठा बांधताना आपण जागा कोणती निवडावी तसेच सांडपाण्याची विल्हेवाट कशी करावी याबद्दल देखील आपण आज सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया गोठा बांधण्याची पद्धत कोणती आहे ती.

गोठा बांधण्याची पद्धत

मित्रांनो, गोट्याचे छत हे नेहमी योग्य उंचीवर असावे तसेच ते छत पावसाळ्यामध्ये न गळणाऱ्या असावे. त्याचप्रमाणे गोट्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये सूर्यप्रकाश यायला हवा. तसेच हवा खेळती राहील अशी व्यवस्था करायला हवी.

तसेच गोटा हा दक्षिण उत्तर दिशेस असावा. तसेच गोठ्यामधील असणाऱ्या विटा या भाजलेल्या मातीच्या असाव्यात त्याचप्रमाणे जमिनीचा गव्हाणी कडून उतार दिलेला असावा.

गोठा बांधण्याच्या पद्धती कोणत्या आहेत

1) तोंडाकडे तोंड पद्धत

मित्रांनो, अशा पद्धतीमध्ये तोंडाकडे तोंड करून बांधलेल्या जनावरांचे योग्य पद्धतीने निरीक्षण नेहमी करता येते. तसेच गोठ्याच्या दोन्ही बाजूंमध्ये मोकळी जागा राहत असते. त्यामुळे सूर्यप्रकाश हा भरपूर प्रमाणामध्ये जनावरांना मिळत असतो.

त्याचप्रमाणे जनावरांना चारा टाकणं देखील सोपे जात असते. त्याचबरोबर रोगप्रसार या पद्धतीमध्ये खूपच कमी प्रमाणामध्ये होत असतो.

गोठा बांधण्याची पद्धत

2) शेपटीकडे शेपटी पद्धत

या पद्धतीमध्ये मित्रांनो जनावरांना धुण्यासाठी तसेच दूध काढण्यासाठी दोन्ही ओळीमधील असणारी जागा नेहमी आपल्याला उपयोगी पडत असते. तसेच जनावरांचे तोंड बाहेरच्या बाजूस असल्यामुळे संसर्गजन्य रोग होण्याची शक्यता या पद्धतीमध्ये कमी होत असते.

तसेच बाहेरच्या बाजूने ताजी हवा जनावरांना खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मिळत असते. त्याचप्रमाणे दूध काढणाऱ्यांवर देखील यामध्ये आपल्याला या पद्धतीमध्ये देखरेख करणे सोपे जात असते. तसेच या पद्धतीमध्ये माझावर येणारी जनावरे आपल्याला सहज पद्धतीने ओळखता येतात.

गोठा बांधत असताना घ्यायची काळजी

1) जनावरांना योग्य पद्धतीने चारा खाता येईल अशा पद्धतीने आपण गव्हाण बांधावी.

2) गव्हाणीचा पृष्ठभाग हा नेहमी गुळगुळीत असावा आणि त्याचा गव्हाणीचा काठ हा नेहमी गोलाकार असावा.

3) गोठा नेहमी हवेशी राहील या पद्धतीने नेहमी भिंतींचे बांधकाम करावे तसेच गोठ्यातील छत हे कठीण आणि टिकाऊ असावे.

4) जनावरांना ताजे व स्वच्छ पाणी सदैव उपलब्ध राहण्यासाठी एक उंचावर टाकी बांधावी.

5) मूत्र जमा करण्यासाठी गोठ्याच्या कडेने योग्य आकाराचे गटार करावे.

6) गोटा बांधताना नेहमी पशु तज्ञांचा सल्ला घ्यावा.

7) गोटा हा केवळ जनावरांच्या निवाऱ्याकरता नसतो, तर तो त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने देखील महत्त्वाचा असतो अशा हिशोबाने आपण गोटा बांधावा.

8) गोटा बांधत असताना आपण आर्थिक बाबींचा विचार करणे गरजेचे असते.

9) गोठ्याची जागा निवडताना ती जागा रहदारीची नसावी.

10) गोठ्याची जागा उंच ठिकाणी असावी ज्यामुळे पावसाळ्यामध्ये त्या ठिकाणी पाणी साचणार नाही.

11) गोटा नेहमी पूर्व पश्चिम दिशेने बांधावा.

12) गोट्याचा दरवाजा हा मोठ्या आकाराचा असावा जेणेकरून जनावरांना सहजपणे आत बाहेर काढता येईल.

गोठा बांधण्याची पद्धत याबद्दल शेवटचे शब्द

मित्रांनो आपल्याला वरीलप्रमाणे दिलेल्या गोठा बांधण्याची पद्धत हि आपण गोठा बांधत असताना खूपच उपयोगी येणार आहे . आपल्याला गोठा बांधण्याची पद्धत कशी वाटली ते आपण आम्हाला कंमेंट द्वारे नक्की कळवा.

आम्हाला अशी आशा आहे कि आपल्याला गोठा बांधण्याची पद्धत या बद्दल दिलेली माहिती नक्कीच आवडलेली असेल. आपण आपल्या मित्रपरिवाराला गोठा बांधण्याची पद्धत हि माहिती share करण्यास विसरू नका.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending