Connect with us

Information

ग्रामपंचायत निधी माहिती Gram Panchayat Fund Information in Marathi

Published

on

ग्रामपंचायत निधी माहिती

ग्रामपंचायत निधी माहिती काय मित्रांनो आपण गावाकडे राहात आहात आणि आपल्याला ग्रामपंचायत चा निधी कोठून येतो तसेच निधी काय आहे याची माहिती घ्यायची आहे आज आपण ग्रामपंचायत निधी माहिती याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.

मित्रांनो ग्रामपंचायतला अनेक प्रकारचा निधी येत असतो तो निधी कोणकोणत्या स्वरूपात येत असतो. तसेच त्यांनी तिचा उपयोग कोण कोणत्या पद्धतीमध्ये कामांमध्ये केला जातो याची देखील माहिती आज आपण सविस्तर रित्या जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया ग्रामपंचायत निधी माहिती या बद्दल अगदी सविस्तर रित्या.

ग्रामपंचायत निधी माहिती Gram Panchayat Fund Information in Marathi

15 वित्त आयोग मधून केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्याला 5000 कोटींचा निधी मंजूर केलेला आहे. चला तर मित्रांनो मंग ग्रामपंचायत चा निधी ची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

ग्रामपंचायत म्हणजे काय

73 व्या घटना दुरुस्तीनुसार प्राथमिक स्तरावरील संस्था म्हणजे ग्रामपंचायत होय. ग्रामपंचायत ही पंचायतराज मधील सर्वात महत्त्वाची अशी संस्था असून ग्रामपंचायत मध्ये निवडून येणाऱ्या सदस्यांपैकी एका सदस्याला सरपंच केले जाते. सरपंच हा गाव कारभारी असतो सरपंचावर गावचा कारभार हा असतो.

ग्रामपंचायत चे मुख्य अंग कोणते

ग्रामसभा हे ग्रामपंचायत के मुख्य अंग आहे. तसेच भारत देशातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे देखील ग्रामसभा हे मुख्य अंग आहे.

ग्रामपंचायतीचा सर्वोच्च निर्वाचित प्रतिनिधी कोण असतो

ग्रामपंचायतीचा सर्वोच्च निर्वाचित प्रतिनिधि हा सरपंच असतो.

ग्रामपंचायतीचे स्वरूप कसे असते

मित्रांनो, ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार हा विभागीय आयुक्तांना असतो. ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या गावची लोकसंख्या ही 600 पेक्षा जास्त असावी.

तसेच डोंगरी भागामध्ये त्या गावची लोकसंख्या ही तीनशे पर्यंत असावी. अशा लोकसंख्येच्या असणाऱ्या गावी ग्रामपंचायत स्थापन करता येते ग्रामपंचायत सदस्य संख्या ही सात किंवा 17 असावी.

ग्रामपंचायत सदस्य संख्या निश्चित करण्याचे अधिकार कोणाला असतात

ग्रामपंचायत सदस्य संख्या निश्चित करण्याचे अधिकार हे िल्हाधिकार्‍यांना असतात. जिल्हाधिकारी ग्रामपंचायत मध्ये असणारे सदस्य संख्या निश्चित करू शकतात. ज्यामध्ये कमीत कमी सात सदस्य आणि जास्तीत जास्त 17 सदस्य असू शकतात.

ग्रामपंचायतला शासनाकडून मिळणारा निधी किती असतो

ग्रामपंचायतला विविध प्रकारचा निधी प्राप्त होत असतो. त्यामध्ये आपण प्रामुख्याने ग्रामपंचायतला कोण कोणत्या प्रकारचा निधी प्राप्त होऊ शकतो. याची सविस्तर यादी जाणून घेऊया.

  • आपले सरकार केंद्र निधी हा देखील ग्रामपंचायतला निधी प्राप्त होऊ शकतो होत असतो.
  • राज्य वित्त आयोगाचा निधीदेखील ग्रामपंचायतला मिळत असतो.
  • महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत देखील ग्रामपंचायतला निधी मिळत असतो.
  • स्वच्छता अभियान योजनेअंतर्गत देखील ग्रामपंचायतला निधी मिळत असतो.
  • घरकुल योजने अंतर्गत देखील ग्रामपंचायतला निधी मिळत असतो.
  • सर्व शिक्षा अभियान या योजनेअंतर्गत देखील ग्रामपंचायतला निधी मिळत असतो.
  • बाल विकास योजनेअंतर्गत देखील ग्रामपंचायतला निधी मिळत असतो.
  • राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान या योजनेत देखील ग्रामपंचायतला निधी मिळत असतो.
  • राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेमध्ये देखील ग्रामपंचायतला निधी मिळत असतो.
  • जिल्हा परिषद चा निधी देखील ग्रामपंचायत ला मिळत असतो.
  • आमदार खासदार निधी देखील ग्रामपंचायत ला मिळत असतो.
  • पंतप्रधान विकास योजना मधून देखील ग्रामपंचायत निधी मिळत असतो.
ग्रामपंचायत निधी माहिती

ग्रामपंचायत द्वारे आकारले जाणारे विविध कर कोणते

  1. पाणीपट्टी, घरपट्टी हा ग्रामपंचायत द्वारे आकारला जाणारा महत्त्वाचा असणारा कर आहे.
  2. जत्रा उत्सव याद्वारे देखील ग्रामपंचायत कर हा आकारत असते.
  3. दिवाबत्ती कर देखील ग्रामपंचायत घेत असते.
  4. आठवडे बाजार यावरील देखील कर ही ग्रामपंचायत घेत असते.
ग्रामपंचायत निधी माहिती

ग्रामपंचायत ला मिळणारे मुख्य निधी स्रोत कोणते

ग्रामपंचायतला विविध प्रकारचा निधी मिळत असतो. ग्रामपंचायतला जिल्हा परिषद मधून देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये निधी मिळत असतो. तसेच पंचायत समिती मधून देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये निधी मिळत असतो.

त्याचप्रमाणे ग्रामविकास विभागाकडून देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये निधी मिळत असतो. तसेच रस्त्यामधील सुधारणा करणे गावांमधील असणारे यात्रा उत्सव यामध्ये देखील ग्रामपंचायतला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये निधी मिळत असतो.

वित्त आयोगाचा निधी उरला तर काय होते

मित्रांनो, ग्रामपंचायत ही व्यवस्थितरीत्या चालवणे हे सर्व प्रकारचे काम हे सरपंचाकडे असते. जर सरपंचाने ग्रामपंचायतचा कारभार हा व्यवस्थितरीत्या न सांभाळला तर वित्त विभागाकडून आलेला निधी हा परत देखील जाऊ शकतो. म्हणूनच ग्रामपंचायत सरपंच हा कार्यक्षम असला पाहिजे तसेच सर्व धर्मांना सोबत घेऊन जाणारा असला पाहिजे.

सरपंच कडे ग्रामपंचायतचे योग्य नियोजन असायला हवे तसेच ग्रामपंचायत विविध योजनेचा आराखडा सरपंचाने तयार करायला हवा.

सरपंच आणि एक गावच्या विविध विकास कामासाठी राज्य सरकारकडून तसेच केंद्र सरकार कडून त्याच प्रमाणे जिल्हा परिषद यामधून निधी कसा मिळवता येईल याकडे देखील लक्ष दिले पाहिजे त्यामुळेच सरपंच हा कार्यक्षम असलेला पाहिजे.

वित्त आयोगाचा निधी जर ग्रामपंचायत मध्ये शिल्लक राहिला तर तो परत जात असतो. यामुळे निधी जर परत गेला तर ग्रामपंचायत ही कार्यक्षम नाही असे ठरवले जाते तसेच त्या गावचा गाव पुढारी कार्यक्षम नाही असे देखील निधी जर परत गेला तर ठरवले जाते.

ग्रामपंचायत निधी माहिती Gram Panchayat Fund Information in Marathi निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला ग्रामपंचायत निधी माहिती याबद्दल दिलेली माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे. तसेच मित्रांनो आपल्याला ग्रामपंचायतींमध्ये असणारे विविध निधी हे कसे ग्रामपंचायतला मिळतात हे देखील आम्ही आपल्याला अगदी सविस्तर रीत्या सांगितलेले आहे.

तसेच ग्रामपंचायत विविध कामे देखील आपल्याला वरील भागामध्ये आम्ही अगदी सविस्तर रीत्या सांगण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे. मित्रांनो आपल्याला ग्रामपंचायत निधी माहिती याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच आपल्याला ग्रामपंचायत निधी माहिती या बद्दल काही माहिती हवी असल्यास ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. आम्ही आपल्यासाठी नेहमी नवनवीन माहिती घेऊन येत असतो.

2 Comments

2 Comments

  1. Pingback: रेशन कार्ड माहिती मराठी Ration card information in Marathi (New)

  2. Pingback: ड्रायव्हिंग लायसन्स माहिती License साठी RTO ला जाण्याची गरज नाही

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending