Connect with us

Schemes

पैशाची गुंतवणूक कशी करावी । How to Invest Money in Marathi, पैसे गुंतवण्याचे सर्वोत्तम मार्ग

Published

on

गुंतवणूक कशी करावी

गुंतवणूक कशी करावी मित्रांनो, महागाई सतत वाढत आहे म्हणूनच आज आपण गुंतवणूक कशी करावी याबद्दल सर्व माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो आपल्या भविष्यासाठी गुंतवणूक ही फारच महत्त्वाची अशी गोष्ट आहे. चला तर मग जाणून घेऊया गुंतवणूक कशी करावी. ज्यामध्ये आपल्याला खूप सारा फायदा होईल चला तर जाणून घेऊया गुंतवणूक कशी करावी.

पैशाची गुंतवणूक कशी करावी

1) फिक्स डिपॉझिट FD

मित्रांनो, मुदत ठेव हा देखील आजकालच्या काळामध्ये सुरक्षित गुंतवणुकीचा खूपच महत्त्वाचा असणारा पर्याय आहे. मित्रांनो तुम्ही कोणतीही जोखीम न घेता ही गुंतवणूक करू शकता. तसेच इतर योजनांच्या तुलनेमध्ये देखील यामध्ये परतावा कमी असला तरी अल्पकालीन उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी हा एक आजकालच्या काळामधील चांगला पर्याय आहे.

2) आवर्ती ठेव

मित्रांनो, तुम्ही आज काल च्या काळामध्ये एसआयपी सारखे गुंतवणूक देखील आज-काल सुरू करू शकता. मित्रांनो रिकरिंग डिपॉझिट मध्ये तुम्ही अल्पमुदतीच्या देण्यासाठी पैसे जमा करू शकता.

मित्रांनो यामध्ये दर महिन्यात तुमच्या बँक खात्यातून एक निश्चित रक्कम कापून तुमच्या रिकरिंग डिपॉझिट खात्यामध्ये जमा होत असते. याद्वारे तुम्ही वार्षिक विम्याचा हप्ता किंवा इतर कोणतेही आर्थिक उद्दिष्ट खूपच महत्वपूर्ण रित्या पूर्ण करू शकता.

3) इन्शुरन्स विमा

तरुण मित्रांनो, आपण सर्वप्रथम गुंतवणूक विषयावर भर देणे गरजेचे असते असे मित्रांनो तज्ञांचे म्हणणे आहे. मित्रांनो आरोग्य विमा, जीवन विमा, मुदत योजना या तिन्ही विमा योजना मध्ये आपण गुंतवणूक करावी यामध्ये परतावा मिळण्याची खूपच महत्त्वाचा फायदा असा असतो. विमा लवकर सुरू करण्याचा फायदा हा आहे की मित्रांनो तो कमी प्रेमियम मध्ये आपल्याला चांगले कव्हरेज देऊ शकतो.

गुंतवणूक कशी करावी

4) पब्लिक प्रोविडेंट फंड PPF

मित्रांनो, आजकालच्या काळामध्ये नोकरी सुरू होताच काही लोक निवृत्तीचे नियोजन देखील करत असतात तसेच केले देखील पाहिजे. यासाठी सर्वोत्कृष्ट योजना म्हणजे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी यालाच पब्लिक प्रॉव्हिडंट फंड असे दखील म्हटले जाते.

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड माध्यमातून तुम्ही खूपच कमी वेळेमध्ये चांगला निधी गोळा करू शकता. यामध्ये तुम्हाला टॅक्स सवलतीचा लाभ देखील मिळत असतो.

5) म्युच्युअल फंड गुंतवणूक कशी करावी

मित्रांनो, तुम्ही सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन च्या माध्यमातून खूप सारे गुंतवणूक करू शकता. एसआयपी लवकर सुरू केल्याने मित्रांनो तुम्हाला आयुष्यातील एका टप्प्यावर तुमच्याकडे चांगली रक्कम जमा झालेले असते. मित्रांनो आपल्याला मिळकत वाढल्यास आपण एसआयपी मधील गुंतवणूक देखील वाढवू शकतो.

गुंतवणूक कशी करावी

6) एमर्जन्सी निधी

मित्रांनो, आपण इमर्जन्सी निधी सुरू करण्याचे नेहमी सुनिश्चित करा जितक्या लवकर आपण एमर्जन्सी निधी सुनिश्चित करू तसेच आपल्या आयुष्यामध्ये होणारे अनेक चढ-उतार हे आपल्या आयुष्यात समोर येत असतात. अशा परिस्थितीमध्ये आपण जर आपत्कालीन निधी उपयुक्त तसेच उपलब्ध केला तर याचा आपल्यासाठी खूपच महत्त्वाचा असा फायदा होत असतो.

आपल्याकडे जर इमर्जन्सी निधी असेल तर आपल्याला आपले असणाऱ्या बचत योजना मध्ये देखील छेडछाड करण्याची गरज नाही. मित्रांनो आपत्कालीन निधी हा तुमच्या उत्पन्नाच्या किमान सहा महिन्याच्या समान असावा.

गुंतवणूक करण्याचे फायदे

  • मित्रांनो, गुंतवणूक केल्याने आपला अनावश्‍यक खर्च टाळता येतो.
  • मित्रांनो, आपण गुंतवणूक योग्य वेळी केली तर भविष्यामध्ये आपण मोठी संपत्ती निर्माण करू शकतो.
  • मित्रांनो, आपण लवकर गुंतवणूक केल्यास आपण आपले भविष्य आनंदी सुरक्षित तसेच आपल्या पुढील आयुष्यात आपण आपल्या स्वतःचा आधार होऊ शकतो.
  • मित्रांनो, गुंतवणुकीमुळे आपल्याला आर्थिक बचत करण्याची सवय देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये लागते.
  • मित्रांनो, गुंतवणूक केल्यामुळे आपण आपल्या कुटुंबाच्या शिक्षण व्यवसाय तसेच सुखी कुटुंबासाठी आपल्याला खूपच गुंतवणुकीमुळे मदत होत असते.
  • मित्रांनो, आपण गुंतवणूक योग्य वेळी योग्य ठिकाणी केल्यास आपण आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यास नेहमी भविष्यातील अनेक स्वप्न पूर्ण करण्यास सक्षम होऊ शकतो.

अशाप्रकारे मित्रांनो गुंतवणुकीचे आपल्या आयुष्यामध्ये खूपच महत्वपूर्ण आणि आपल्याला लवकरात लवकर उपयोगी येणारे फायदे आहेत.

गुंतवणूक कशी करावी याबद्दल शेवटचे शब्द

मित्रानो आपल्याला गुंतवणूक कशी करावी याबद्दल दिलेली माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे . आपल्याला पैशाची गुंतवणूक कशी करावी याबद्दल आणखी माहिती हवी असल्यास आपण आम्हला कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. तसेच पैशाची गुंतवणूक कशी करावी या बद्दल दिलेली माहिती आपल्याला मित्रांसमवेत share करण्यास कधीही विसरू नका.

2 Comments

2 Comments

  1. Pingback: (लग्नाची) विवाह नोंदणी कशी करावी,ऑनलाइन प्रक्रिया,फॉर्म नमुना PDF

  2. Pingback: ड्रायव्हिंग लायसन्स माहिती License साठी RTO ला जाण्याची गरज नाही

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending