Connect with us

Information

होम लोन साठी लागणारी कागदपत्रे | sbi होम लोन साठी लागणारी कागदपत्रे, Home Loan Documents in Marathi

Published

on

होम लोन साठी लागणारी कागदपत्रे

होम लोन साठी लागणारे कागदपत्रे: मित्रांनो आपल्याला शहरी भागांमध्ये जर घर घ्यायचे असेल तर बहुतेक वेळा आपल्याला कर्ज शिवाय दुसरा पर्याय देखील नसतो. मित्रांनो यासाठी आपल्याला गृह कर्ज मिळवणे त्रासदायक असते त्यासाठी कागदपत्रे जमवून देखील त्रासदायक असते.

मित्रांनो आज आम्ही आपल्यासाठी होम लोन साठी लागणारी कोण कोणती कागदपत्रे आहेत याबद्दल माहिती घेऊन आलेलो आहोत. ज्यामुळे अगदी आपल्याला काही क्षणांमध्येच आपल्याला गृह कर्ज मंजूर होईल. चला तर मग मित्रांनो कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया होम लोन साठी लागणारे कागदपत्रे कोणकोणते आहेत ती.

होम लोन साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत

नोकरी करणाऱ्यांसाठी होम लोन साठी लागणारी कागदपत्रे

1) नोकरदारांसाठी सॅलरी स्लिप लागत असते.

2) बँकेचे स्टेटमेंट देखील लागत असते.

3) वयाचा देखील दाखला लागत असतो.

4) नोकरीचा पुरावा देखील लागत असतो.

नोकरी करणाऱ्यांसाठी लागणारे अत्यावश्यक कागदपत्रे

1) आपण जर बिल्डर कडून घर खरेदी केले असेल तर घर खरेदीसाठी केलेले करार पत्र लागत असते.

2) बांधकाम करण्यात येणाऱ्या जागेचा सातबारा देखील लागत असतो.

3) बांधकाम केलेली जमीन ही शेतजमीन नसल्याची एनओसी देखील लागत असते.

4) नागरी जमीन धारणा कायद्याखालील नोटिसाची एक प्रत देखील लागत असते.

5) पाठीमागील तीस वर्षाचा टायटल रिपोर्ट लागत असतो.

6) बिल्डरच्या जागेची झालेले मालकाशी करारपत्र देखील लागत असते.

7) सरकारी अधिकाऱ्यांनी बिल्डिंग प्लॅनला दिलेली मंजुरी प्रमाणपत्राची झेरॉक्स देखील लागत असते.

8) बिल्डिंग पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देखील लागत असते.

9) बँक खाते मधील झालेल्या व्यवहाराचे मागील सहा महिन्यातील व्यवहाराचे स्टेटमेंट देखील लागत असते.

10) रेशन कार्ड ची झेरॉक्स देखील लागत असते.

11) पॅन कार्ड ची झेरॉक्स देखील लागत असते.

व्यवसायिकांसाठी होम लोन साठी लागणारी कागदपत्रे

1) आपल्या व्यवसायाची थोडक्यात माहिती द्यावी लागते.

2) व्यवसायाच्या नोंदणीचे प्रमाणपत्राची झेरॉक्स देखील द्यावी लागते.

3) आपले असणारे बचत खात्यामधील मागील सहा महिन्यातील व्यवहाराचे स्टेटमेंट देखील द्यावी लागते.

4) आपल्या व्यवहारातील नफा तोट्याचा अहवाल देखील द्यावा लागतो.

5) या अगोदर घेतलेल्या कर्जाची माहिती असलेले प्रमाणपत्र देखील द्यावी लागते.

होम लोन साठी लागणारी कागदपत्रे याबद्दलचा निष्कर्ष

मित्रांनो, आपले सुंदर घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते मित्रांनो काही परिस्थितीमध्ये आपल्याला घर बांधण्यासाठी पैशांची जरुरत ही कर्ज काढून पूर्ण करावी लागते.

म्हणूनच मित्रांनो आपल्याला होम लोन साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे वरील प्रमाणे दिलेले आहेत. मित्रांनो वरील प्रमाणे दिलेली माहिती आपल्याला कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच मित्रांनो आपल्याला आणखी कोणतेही माहिती हवी असल्यास ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. त्याचबरोबर वरील प्रमाणे दिलेली माहिती आपण आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करण्यास कदापिहि विसरू नका.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending