Connect with us

Schemes

Home Loan Information in Marathi । गृहकर्ज माहिती मराठी मध्ये, फायदे, तोटे, प्रकार, डॉक्युमेंट्स

Published

on

Home loan information in Marathi

Home loan information in Marathi: प्रत्येकाला स्वतःच्या घरामध्ये राहावे असे नेहमी वाटत असते. पण घर बांधण्यासाठी काही लोकांकडे पैसे नसतात आणि त्यांचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी बराच वेळ लागत असतो.

म्हणूनच मित्रांनो आम्ही आपल्यासाठी होम लोन संदर्भात माहिती घेऊन आलेलो आहोत. चला तर मित्रांनो आपण आज आपल्या स्वप्नाचे घर बांधण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या स्वरूपामध्ये पैशाची मदत होत असते याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर कोणताही वेळ नव्हता जाणून घेऊया home loan information in Marathi याबद्दल अगदी सविस्तर माहिती.

Home loan information in Marathi  मराठीत गृहकर्ज माहिती

शून्यातून वर आलेला व्यक्ती नेहमी आपल्या जीवनामध्ये स्वतःचे घर बनवण्यासाठी नेहमी पुढाकार घेत असतो. त्याच्यासमोर सर्वात मोठे आव्हान म्हणजे पैशाचे आव्हान असते.

आज आपण गृह कर्ज या संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. चला तर कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया गृह कर्ज याबद्दल अतिशय सविस्तर माहिती.

होम लोन म्हणजे नक्की काय

मित्रांनो, होम लोन म्हणजे असे पैसे जे बँक आपल्याला घर बनवण्यासाठी पुरवत असते. आणि मूळ रक्कम आणि त्यावर एक ठराविक व्याजदर घेऊन ते पैसे हप्त्याच्या स्वरूपात परत घेत असते.

मित्रांनो आपण जे लोन घेत असतो ते ते निवासी मालमत्ता खरेदी करण्यासाठी तसेच इमारत दुरुस्ती किंवा विस्तार करण्यासाठी आपण गृह कर्ज घेत असतो.

जेणेकरून आपल्या या कामासाठी आपली केलेली बचत आणि गुंतवणूक मोडावी लागणार नाही यामध्ये कर्जाची परतफेड होईपर्यंत संबंधित मालमत्ता बँकेत गहाण ठेवले जात असते.

होम लोनचे व्याजदर किती असते

मित्रांनो, गृह कर्जाचे व्याजदर हे 7% पासून सुरु होत असते. मित्रांनो तसेच आपण कोणत्या बँकेतून कर्ज घेत आहात यावर देखील बँकेचे व्याजदर डिपेंड असते.

होम लोनचे असणारे प्रकार कोणते आहेत

 • घर बांधण्यासाठी कर्ज
 • घर खरेदी कर्ज
 • घर दुरुस्ती साठी कर्ज
 • जमीन खरेदीसाठी कर्ज
 • गृह विस्तार कर्ज
 • नवीन घरासाठी कमी पडणारी रक्कम
 • एका पेक्षा जास्त व्यक्तींना सामायिक कर्ज
 • परदेशी मध्ये स्थायिक झालेले भारतीयांसाठी कर्ज

गृह कर्जाची वैशिष्ट्ये कोणती आहेत

मित्रांनो, होम लोनचे वैशिष्ट्ये आणि फायदे हे वेगवेगळ्या बँकेवर निर्धारित असतो. आपण जे बँकेमधून कर्ज घेत आहात त्या बँकेमध्ये फायदे वेगळे असतात आणि इतर बँकेमध्ये फायदे वेगळे असतात.

1) रजिस्ट्रेशन आणि स्टॅम्प ड्युटी

होम लोन मध्ये आपण मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क कपातीचा दावा देखील करू शकतो.

मित्रांनो या खर्चासाठी तुम्ही ज्या वर्षी पैसे दिले आहेत त्याच वर्षी कपातीचा दावा देखील करू शकता. आयकर विभागाच्या कायद्यानुसार दीड लाखापर्यंत कपात केली जाऊ शकते.

2) कमीत कमी व्याजदर

मित्रांनो, गृह कर्ज देणाऱ्या बँका कर्ज घेणाऱ्या व्यक्तीला ते गृह कर्ज अधिक परवडणारे ठराव यासाठी कमीत कमी व्याजदर आक्रमक असतात.

जेणेकरून जास्त व्याजदरामुळे कर्ज घेणाऱ्या व्यक्तीवर ताण पडू नये आणि तो नियमितपणे कर्जाची परतफेड देखील करू शकेल यामुळे कमीत कमी व्याजदर हा आकारला जातो.

3) HRA

मित्रांनो, आपण जर घरासाठी कर्ज घेतले असेल आणि आपण भाड्याच्या घरात राहत असाल तर तुम्हाला गृह कर्जाचे अनेक लाभ देखील घेऊ शकता.

होम लोन साठी लागणारी कागदपत्रे

 • पासपोर्ट फोटो
 • आधार कार्ड
 • मतदान कार्ड
 • पॅन कार्ड
 • राहण्याचा पुरावा
 • ड्रायव्हिंग लायसन्स
 • सहा महिन्याचे बँकेचे स्टेटमेंट
 • सॅलरी स्लिप
 • नोकरीचे प्रमाणपत्र
 • तीन वर्षाचे आयटीआर
 • प्रॉपर्टी चे फोटो
 • प्रॉपर्टी सेल केलेले एग्रीमेंट
 • लोन सेक्शन लेटर
 • लोन स्टेटमेंट
 • क्लोजर लेटर
 • म्युचल फंड
 • फिक्स डिपॉझिट
 • एलआयसी पॉलिसी
 • इतर प्रॉपर्टी पेपर
 • कार आर आर सी बुक

होम लोन घेण्यासाठी पात्रता काय लागते

मित्रांनो, होम लोन घेण्यासाठी प्रत्येक बँकेमध्ये वेगवेगळे नियम आहेत. तसेच प्रत्येक बँकेचे वेगवेगळे नियम व अटी असतात. पण मित्रांनो आपण तरी देखील होम लोन घेण्यासाठी आज आपण सामान्य पात्रता काय असावी लागते याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

1) होम लोन घेण्यासाठी आपले वय नेहमी 18 ते 70 वर्षे पूर्ण असावे लागते.

2) कर्ज घेण्यासाठी आपण भारतीय रहिवासी असावी लागते.

3) होम लोन घेण्यासाठी आपला क्रेडिट स्कोर हा साडेसातशे च्या वर असणे गरजेचे आहे.

4) आपण जर नोकरी करत असाल तर आपल्यासाठी कमीत कमी दोन वर्षाचा कार्य अनुभव असणे खूपच गरजेचे आहे.

5) आपला जर एखादा व्यवसाय असेल तर कमीत कमी तो व्यवसाय तीन वर्ष जुना असणे खूपच गरजेचे आहे.

होम लोन साठी आपण अर्ज कसा करावा

मित्रांनो, आजकालच्या काळामध्ये होम लोन घेणे खूपच सोपे आणि सोयस्कर झालेले आहे. सध्याच्या तंत्रज्ञानामुळे आणि आजकालच्या काळामध्ये बरीच माध्यम उपलब्ध झालेले आहेत.

आपण होम लोन घेण्यासाठी सरळ बँकेमध्ये जाऊन तेथे चौकशी करू शकता. तसेच आपण ऑनलाईन पद्धतीने देखील होम लोन साठी अर्ज करू शकता.

यासाठी आपल्याला ज्या बँकेमधून आपल्याला होम लोन करायचे आहे त्या बँकेच्या वेबसाईटवर आपण जावे. आणि त्या ठिकाणी होम लोन या ऑप्शनवर क्लिक करून आपली माहिती भरावी.

1) मित्रांनो, अर्ज करत असताना आपल्याला बँकेकडून आवश्यक ती कागदपत्रे जमा करण्यास सांगत असतात. त्यानुसार तुमच्या होम लोन ची प्रक्रिया होत असते. यामध्ये तुमचा सिबिल स्कोर मालमत्तेचे मूल्य अशा बऱ्याचशा गोष्टीचे मूल्यमापन देखील केले जाते.

2) मित्रांनो, आपल्याला सर्व कागदपत्रांचे मूल्यमापन झाले असेल आणि व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच तुम्हाला होम लोन द्यायचे की नाही याबद्दल ठरवले जाते.

3) मित्रांनो, होम लोन संदर्भात अधिक माहितीसाठी आपण आपल्या जवळच्या बँकेशी संपर्क साधू शकता.

होम लोन चा अर्ज नाकारण्याची कारणे कोणती आहेत

मित्रांनो, खालील प्रमाणे दिलेली कारणे ही होम लोन चा अर्ज नाकारण्याची कारणे असू शकतात.

1) कमीत कमी क्रेडिट स्कोर असणे.

2) आपण क्रेडिट अहवालावर चुकीची माहिती भरणे.

3) इतर बँकांकडून कर्जाचे अर्ज सतत नाकारले जाणे.

4) कमी असणारे उत्पन्न.

5) मालमत्तेचे स्थान हे देखील प्रमुख कारण असू शकते.

निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला वरील प्रमाणे गृह कर्ज तसेच होम लोन याबद्दल दिलेली माहिती आपल्याला नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.

तसेच मित्रांनो आपल्याला होम लोन संदर्भात दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच मित्रांनो आपल्याला जर होम लोन घेण्यास कोणत्याही प्रकारचे अडचण येत असेल तसेच आणखी कोणतेही प्रकारचे लोन घेण्यास बँकेकडून कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

आम्ही आपल्यासाठी योग्य सोलुशन घेऊन येऊ. तसेच मित्रांनो आपल्याला home loan information in Marathi याबद्दल दिलेली माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत तसेच कुटुंबासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending