Connect with us

business ideas

लोह पोलाद उद्योग माहिती । Iron and Steel Industry Business information Marathi Language

Published

on

लोह पोलाद उद्योग माहिती

लोह पोलाद उद्योग माहिती: नमस्कार मित्रांनो आज आपण लोह पोलाद उद्योग याबद्दल सर्व माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो भारत देशामध्ये लोह पोलाद उद्योग हा खूपच जास्त प्रमाणामध्ये आहे. आजकालच्या काळामध्ये भारत देशामध्ये असणाऱ्या लोह पोलाद उद्योगाला मागणी इतर देशांमध्ये जास्त आहे. म्हणूनच आज आपण लोह पोलाद उद्योग बद्दल सर्व माहिती मराठीमध्ये जाणून घेणार आहोत.

लोह पोलाद उद्योग माहिती मराठी मध्ये Iron And Steel Industry Information in Marathi

पोलाद हा लोह आणि कार्बन पासून बनवला जाणारा मिश्र धातू आहे. पोलाद मध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते व कमी प्रमाणामध्ये कार्बन असतो. म्हणजेच लोह कोळसा खाणीचे पोलाद उत्पादनामध्ये फार महत्त्व आहे. भारत देशामध्ये याचा वाटा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आहे. Iron हा घटक पोलादाच्या उत्पादनासाठी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वापरला जातो.

पोलादाचे प्रकार

1) हलके पोलाद.

2) मध्यम पोलाद.

3) उच्चपोलाद.

अशाप्रकारे पोलादाचे प्रकार पडत असतात. यामध्ये कार्बनचे कमी जास्त प्रमाण असते त्यानुसारच पोलादाचे प्रकार पडत असतात.

आर्थिक महत्त्व काय आहे

लोह पोलाद उद्योग माहिती

पोलादाचे उत्पादन वापर किती आहे हे त्या देशाच्या आर्थिक विकासाचे निर्देशक म्हणून देखील मांडले जाते. कारण पोलादाचा वापर हा पायाभूत सुविधांमध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो.

तसेच पोलादाचा वापर हा बांधकाम क्षेत्रामध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो. त्यामध्ये घरे पूल बांधताना पोलादी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वापरले जाते. वाहन उद्योग क्षेत्रामध्ये देखील पोलादाचा वापर हा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो.

तसेच घरगुती उपकरणे बनवण्यासाठी देखील पोलादाचा वापर हा होत असतो. रेल्वे विभागांमध्ये देखील पोलादाचा वापर खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होतो .

त्याचप्रमाणे विजेचे क्षेत्रांमध्ये देखील पोलादाचा वापर हा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो. संरक्षण खात्याचे साधनसामृगीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोलाद वापरता येत असते.

भारताची पोलादाबद्दल स्थिती काय आहे

भारत देशामध्ये पोलाद उद्योगाचा पाया हा जमशेदजी टाटा यांनी घातलेला आहे. आपल्या भारत देशामध्ये पोलाद निर्मितीचे कारखाने हवेत या ध्येयाने ते पछाडलेले होते.

म्हणूनच त्यांनी पोलादाचा वापर हा आपल्या भारत देशामध्ये कशा पद्धतीने होईल याचा विचार करून भारत देशामध्ये पोलादाचा कारखाना उभा केला. 1907 मध्ये जमशेदजी टाटा यांनी टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पहिला कारखाना सुरू केला. 1947 मध्ये भारत देशामध्ये फक्त तीन पोलाद कारखाने होते.

1) टाटा आयर्न अँड स्टील कंपनी.

2) इंडियन आयर्न अँड स्टील कंपनी.

3) विश्व आयर्न अँड स्टील कंपनी.

भारत देशामध्ये वरील प्रमाणे काही कारखाने देखील होते या सर्वांचे मिळून दहा लाख टन पोलाद उत्पादन करण्याची क्षमता त्या काळामध्ये होती.

भारतातील पहिला आधुनिक लोह पोलाद उद्योग पश्चिम बंगालमधील kulti येथे सुरू करण्यात आला होता.

निष्कर्ष

वरील प्रमाणे लोह पोलाद उद्योग याबद्दल दिलेले माहिती आपल्याला मित्रांनो नक्कीच आवडलेले असेल अशी मला आशा आहे. मित्रांनो आपल्याला लोह पोलाद उद्योग माहिती बद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच आपल्याला आणखी कोणती माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच वरील प्रमाणे दिलेली माहिती आपण आपल्या मित्रपरिवार सोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending