Connect with us

Farmers Guide

Kanda Lagwad Information in Marathi । कांदा लागवड माहिती मराठी

Published

on

कांदा लागवड माहिती

कांदा लागवड माहिती: मित्रांनो कधीतरी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणारा तर कधीतरी ग्राहकांच्या डोळ्यांमध्ये पाणी आणणारा कांदा हा कांदा संपूर्ण भारत देशामध्ये तसेच दररोज आहारामध्ये वापरला जातो.

त्यामुळेच मित्रांनो कांद्याची मागणी ही वर्षभर मोठ्या प्रमाणामध्ये असते. आज आपण मित्रांनो कांदा लागवड याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया कांदा लागवड याबद्दल माहिती.

कांदा लागवड माहिती Onion Cultivation Information in Marathi

मित्रांनो, आजकालच्या काळामध्ये बऱ्याच वेळा मागणी आणि पुरवठ्यामध्ये तफावत झाल्यामुळे कांद्याचे भाव बाजारामध्ये नेहमी अस्थिर असतात.

महाराष्ट्र राज्य हे भारतात कांदा उत्पादनात पहिल्या क्रमांकावर येत असते. परंतु हवामानांमधील असणारे बदल आणि शेतकऱ्यांकडे कांदा साठवण्याची नसलेली सोय यामुळे बऱ्याच वेळा कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत नेहमी सापडत असतात.

कांदा लागवडीसाठी हवामान कसे असावे

मित्रांनो, रब्बी हंगामामध्ये कांद्याची लागवड करणे हे खूपच जास्त फायद्याचे ठरते. कांदा लावल्यापासून काही दिवस कांद्याला थंड हवामान हवे असते तर त्यानंतर कांद्याची वाढ होताना हवामानातील तापमान हे थोडे जास्त असेल तर कांद्याच्या वाढीला त्याचा फायदा होत असतो.

त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात तसेच नोव्हेंबर महिन्याच्या आसपास कांदा लागवड केली तर त्या वेळेच्या थंडीचा उपयोग होतो आणि जानेवारी महिन्यातील स्वच्छ सूर्यप्रकाशामुळे कांदा हा चांगला पोसला जातो.

महाराष्ट्र मध्ये खरीप हंगामामध्ये तसेच कांदा लागवड केली जाते खरीप हंगामामध्ये लागवड करताना जून जुलै महिन्यातच करावी लागत असते.

उन्हाळ्यामध्ये लागवड करताना जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये कांदा लागवड करावी लागत असते अशा प्रकारे कांदा लागवड केल्याने कांद्याच्या उत्पादनामध्ये खूपच चांगल्या प्रकारे फायदा होत असतो.

कांदा लागवडीसाठी जमीन कशी असावी

मित्रांनो, कांदा लागवडीसाठी मध्यम ते कसदार जमीन नेहमी आवश्यक ठरत असते ही जमीन पाण्याचा निचरा करणारे तसेच भुसभुशीत असणारी असावी जमिनीमध्ये सेंद्रिय घटक चांगल्या प्रमाणामध्ये असावे त्यामुळे कांदा पिकाची उत्तम वाढ देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होत असते.

लागवडीसाठी जमीन तयार करत असताना जमिनीची उभी आडवी नागरणी करून कुळवाच्या साह्याने ढेकळे फोडून घ्यावीत आणि जमीन भुजबुशीत करून घ्यावी.

जमिनीमध्ये एकरी पंधरा टन शेणखत देखील टाकावे त्यामुळे कांद्याला आवश्यक असलेले सेंद्रिय घटक जमिनीमध्ये उपलब्ध होत असतात.

कांदा लागवड करत असताना कोणते बियाणे वापरावे

बसवंत 780: मित्रांनो, खरीप आणि रब्बी हंगामासाठी ी जात योग्य असून या जातीचा रंग हा गडद लाल असतो. तसेच कांदे देखील आकाराने मोठे असतात ही जात शंभर ते 110 दिवसांमध्ये तयार होत असते हेक्‍टरी उत्पादन अडीचशे ते तीनशे क्विंटल मिळत असते.

एन 53: मित्रांनो, ही जात खरीप हंगामासाठी योग्य आहे शंभर ते दीडशे दिवसांमध्ये ी जात तयार होत असते तसेच या जातीचा रंग हा लाल भडक असतो हेक्‍टरी उत्पादन 200 ते 250 क्विंटल मिळत असते.

पुसा रेड: मित्रांनो, या जातीचे कांदे हे मध्यम आकाराचे विटकरी लाल गोलाकार मध्यम तिखट असतात लागवडीपासून 120 दिवसांमध्ये तयार हे कांदे होत असतात. तसेच हेक्टरी उत्पादन हे अडीशे ते तीनशे क्विंटल होत असते. तसेच लागवडीसाठी एकरी कांद्याचे बियाणे हे चार ते साडेचार किलो लागत असते.

कांदा लागवड कशी केली जाते

मित्रांनो, कांदा लागवड ही वाफा पद्धतीने किंवा सरी पद्धतीने केली जाते पण त्याआधी कांद्याची रोपे तयार करणे खूपच महत्त्वाचे असते.

गादीवाफे तयार करून त्यामध्ये कांद्याचे रोपे तयार करणे खूपच गरजेचे असते. जेथे गादीवाफे तयार करायचे आहेत तिथे जमीन व्यवस्थित नांगरून व कुळवून घ्यावी मग तिथे एक मीटर रुंद व तीन मीटर लांब पंधरा सेंटीमीटर वर उंच वाफे बनवावेत.

ह्या वाफेच्या रुंदीशी समांतर अशा पाच सेंटीमीटर बोटाने रेषा पाडावेत आणि यामध्ये बी ओळीत पातळ पेरावे व नंतर मातीने झाकून टाकावे बी उगवून येईपर्यंत झारणीने पाणी घालावे उगवल्यानंतर गरजेप्रमाणे पाटाने पाणी द्यावे.

कांदा लागवड माहिती

कांद्यासाठी खते व पाणी व्यवस्थापन कसे करावे

मित्रांनो, कांदा पिकास हेक्टरी 50 किलो नत्र पन्नास किलो स्फुरद पन्नास किलो पालाश लागवडीच्या वेळी द्यावी त्यानंतर एक महिन्याने पन्नास किलो नंतर प्रत्येक हेक्टरी द्यावे कांदा पिकाला नियमितपणे पाणी देणे खूपच महत्त्वाचे असते.

खरीप हंगामामध्ये दहा ते बारा दिवसाच्या अंतराने तर उन्हाळी रब्बी हंगामामध्ये सहा ते आठ दिवसांनी गरजेनुसार पाणी द्यावे.

कांद्याची आंतरमशागत कशी करावी

मित्रांनो, रोपांच्या लागवडीनंतर शेतामध्ये तन दिसल्यास हलकी खुरपणी करावी कारणीपूर्वी तीन आठवड्या अगोदर पाणी बंद करावे म्हणजे पानातील रस onion मध्ये लवकर उतरत असतो आणि माना पडून कांदा काढणीस तयार होत असतो.

कांद्यावर कोणते रोग येत असतात

मित्रांनो, कांद्यावर करपा फुल किडे अशा रोगांचा तसेच किडीचा प्रादुर्भाव आढळत असतो करपा रोगामुळे कांदा पातिवर लांबट गोल तांबूस चट्टे देखील पडत असतात.

शेंड्यापासून पाणी जळाल्यासारखी दिसत असतात फुल किडे कांदापातीवर तेलकट पृष्ठभागाव मध्ये खरडत असतात त्यामुळे त्यात श्रावणारा रस शोषत असतात त्यामुळे पातीवर पांढरे ठिपके पडत असतात.

कांद्याची काढणी कशी करावी

मित्रांनो, लागवडीनंतर तीन ते साडेचार महिन्यांमध्ये कांदा काढणीस तयार होत असतो कांद्याची पात पिवळी पडून कांदा माने मधून पिवळा पडत असतो पात आडवी पडत असते.

60 ते 70 टक्के पीक अशा अवस्थेत आले की कांदा काढणीस तयार झाला आहे हे ओळखायला मग कुदळीच्या मदतीने आजूबाजूची जमीन सैल करून कांदा उपटून घ्यावेत. काढणीनंतर चार ते पाच दिवसांनी कांदा पातीसकट शेतातून लहान लहान ढिगार्‍यामध्ये ठेवावा.

नंतर कांद्याची पात व मुळे कापताना तीन ते चार सेंटीमीटर लांबीचा देठ ठेवून पात कापावे नंतर कांदा चार ते पाच दिवस सावलीमध्ये सुकवावा हेक्टरी उत्पादन हे अडीचशे ते तीनशे क्विंटल मिळत असते.

निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला वरील प्रमाणे दिलेली माहिती कांदा लागवड ही माहिती आपल्याला नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.

मित्रांनो आपल्याला वरील प्रमाणे दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच आपल्याला आणखी कोणत्याही पिकाची माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा.

तसेच मित्रांनो वरील प्रमाणे दिलेली माहिती आपण आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending