Connect with us

Schemes

Kukut Palan Loan Information in Marathi | कुकुट पालन कर्ज, कुक्कुट पालन कर्ज योजना महाराष्ट्र

Published

on

Kukut palan loan information in Marathi

Kukut palan loan information in Marathi: मित्रांनो, आपल्याला जर कुक्कुटपालन सुरू करायचे असेल तर यासाठी आपल्याला पैशाची गरज भासत असते.

म्हणूनच मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये कुक्कुटपालनासाठी कर्ज कशाप्रकारे मिळते याची माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो कोणताही न वेळ वाया घालवतात जाणून घेऊया कुक्कुटपालन कर्ज माहिती याबद्दल अगदी सविस्तर माहिती.

Kukut Palan Loan Information in Marathi कुकुट पालन कर्जाची माहिती मराठीत

मित्रांनो, राज्य सरकारचा कुक्कुटपालन योजना सुरू करण्याचा उद्देश असा आहे की राज्यामध्ये व्यवसाय वाढवणे तसेच लोकांना रोजगार संधी उपलब्ध करून देणे.

तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी कुटुंबामध्ये कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करणे हा उद्देश आहे. यासाठी आपल्याला सरकार देखील खूपच मोठ्या स्वरूपामध्ये कर्ज देत आहे.

आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचणी येणार नाही. हे देखील सरकार दरबारी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये दक्षता घेतली जात आहे.

कुक्कुटपालन योजना काय आहे

मित्रांनो, कुक्कुटपालन योजना ही महाराष्ट्र राज्यात सुरू करण्यात आलेली योजना आहे. कुक्कुटपालन योजना भारतामध्ये नाबार्ड नॅशनल बँक ऑफ अग्रिकल्चर डेव्हलपमेंट द्वारा कर्ज भेटत असते.

या योजनेच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना कुक्कुटपालनासाठी नेहमी कर्ज देत आहे. मित्रांनो आपल्याला व्यवसाय सुरू करण्यापूर्वी आपल्याला या व्यवसायाची माहिती असणे खूपच गरजेचे आहे. या योजनेतून प्रत्येक शेतकऱ्याला आत्मनिर्भर करायचे आहे.

कुक्कुटपालन योजनेचा उद्देश नक्की काय आहे

1) महाराष्ट्र मधील असणारा कोणताही व्यक्ती कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करून आपली आर्थिक परिस्थिती चांगली करू शकतो.

2) कुक्कुटपालन सुरू करण्यासाठी बँक तुम्हाला लोन देत असते. यामुळे तुमचा व्यवसाय हा खूपच जलद गतीने सुरू होत असतो.

3) ज्या शेतकऱ्यांकडे कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसा नाही ते शेतकरी कुक्कुटपालन योजनेमार्फत आपला व्यवसाय सुरू करू शकतात.

4) कुक्कुटपालन या योजने माध्यमातून सरकारला शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवायचे आहे.

कुकुट पालन योजनेचे फायदे काय काय आहेत

1) कुक्कुटपालन हा व्यवसाय कमीत कमी पैशांमध्ये सुरू होणारा व्यवसाय आहे.

2) कुक्कुटपालन व्यवसाय मधून दोन पद्धतीने पैसे कमावले जातात.

3) कुक्कुटपालन व्यवसाय मध्ये पोल्ट्री शेड बांधण्यासाठी तसेच feedroom बनवण्यासाठी सरकारचे सहकार्य लाभत असते.

कुकुट पालन योजनेसाठी पात्रता काय आहे

1) अर्जदार हा शेतकरी असला पाहिजे.

2) अर्जदार हा महाराष्ट्रातील रहिवासी असला पाहिजे.

3) व्यवसाय सुरू करणाऱ्या व्यक्तीला व्यवसायाचा अनुभव देखील पाहिजे.

4) व्यवसाय सुरू करण्यासाठी पुरेशी जमीन देखील असायला हवी.

कुकुट पालन लोन योजनेसाठी लागणारी कागदपत्रे कोणती आहेत

1) बँक पासबुक झेरॉक्स लागत असते.

2) आधार कार्ड.

3) पासपोर्ट फोटो.

4) मतदान कार्ड.

5) रहिवासी प्रमाणपत्र.

6) रेशन कार्ड.

कुकुट पालन योजनेसाठी अर्ज कोठे करावा

1) सहकारी बँकेमध्ये आपण कुक्कुटपालन योजनेसाठी अर्ज करू शकता.

2) वाणिज्य बँकेमध्ये देखील आपण कुक्कुटपालन योजनेसाठी अर्ज करू शकता.

3) क्षेत्रीय ग्रामीण बँकेमध्ये देखील आपण कुकुट पालन योजनेसाठी अर्ज करू शकता.

4) सहकारी कृषी आणि विकास ग्रामीण बँकेमध्ये देखील आपण कुक्कुटपालन योजनेसाठी अर्ज करू शकता.

5) व्यावसायिक बँकांमध्ये देखील आपण कुक्कुटपालन योजनेसाठी अर्ज करू शकता.

कुक्कुटपालनासाठी अनुदान किती असते

मित्रांनो, सध्याच्या काळामध्ये कुक्कुटपालन करण्यासाठी शासनाकडून 25 टक्के अनुदान दिले जात आहे. तसेच अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील लोकांना कुक्कुटपालन सुरू करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून 35 टक्के अनुदान दिले जात आहे.

निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला कुक्कुटपालन सुरू करण्यासाठी वरील प्रमाणे दिलेले माहिती नक्कीच उपयोगी पडणार आहे. आणि आपला व्यवसाय वाढण्यासाठी देखील उपयोगी पडणार आहे.

मित्रांनो आपल्याला कुक्कुटपालन लोन या संदर्भात दिलेली माहिती आपल्याला कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच मित्रांनो आपल्याला आणखी कोणतीही माहिती हवी असल्यास कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच वरील प्रमाणे दिलेली माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरु नका .

Trending