Connect with us

business ideas

लघु उद्योग माहिती प्रकल्प मराठी Laghu Udyog Project Information in Marathi

Published

on

लघु उद्योग माहिती प्रकल्प मराठी

लघु उद्योग माहिती प्रकल्प मराठी नमस्कार मित्रांनो आज आपण लघु उद्योग माहिती प्रकल्प मराठी याबद्दल अगदी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो आपल्याला जर उद्योगधंदा करायचा विचार करत असाल तर आपण आज योग्य ठिकाणी आहात आज आपण लघु उद्योग कोणकोणते आहेत त्याप्रमाणे लघु उद्योग कसा केला जातो याची माहिती जाणून घेणार आहोत.

आजकालच्या काळामध्ये उद्योग करणे हे प्रत्येकालाच गरजेचे झालेले आहे कारण की प्रत्येकालाच नोकरी लागेल ही कोणालाही गॅरंटी नाही म्हणूनच आज पासूनच आपण उद्योगांच्या पाठीमागे लागले पाहिजे. चला तर मग जाणून घेऊया लघु उद्योग माहिती प्रकल्प माहिती मराठी याबद्दल अगदी सविस्तर रीत्या.

लघु उद्योग माहिती प्रकल्प मराठी Laghu Udyog Project Information in Marathi

सर्वप्रथम आपण लघु उद्योगाची माहिती जाणून घेऊ आजकालच्या काळामध्ये प्रत्येक व्यक्तीने छोटा का होईना लघु उद्योग सुरू केला पाहिजे चला तर मग जाणून घेऊया लघुउद्योग हे कोणकोणते आहेत तसेच लघु उद्योग म्हणजे नक्की काय.

लघु उद्योग म्हणजे काय

लघु उद्योग म्हणजे असे उद्योग जे सेवांचे उत्पादन तसेच सेवांचे उत्पादन करून त्याचप्रमाणे उत्पादन आणि प्रस्तुतीकरण लहान किंवा सूक्ष्म प्रमाणामध्ये केले जाते. त्याचप्रमाणे उद्योग मशनरी प्लांट उपकरणांमध्ये एक वेळेची गुंतवणूक करतात यालाच लघुउद्योग असे म्हटले जाते.

आजकालच्या काळामध्ये लघुउद्योग हे महत्त्वाचे आहेत कारण की लघुउद्योग हे रोजगार वाढविण्यास तसेच भारताचे आर्थिक विकास यंत्रणा वाढवण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत करत असतात.

त्याच प्रमाणे लघुउद्योग आणि मध्यम उद्योगांची भूमिका ही नेहमी पायाभूत सुविधा तसेच उत्पादन वाढवणे प्रदूषण झोपडपट्टी दारिद्र्य आणि अनेक विकास कृती यांसारख्या समस्या कमी करण्यात सरकारला देखील मदत करत असतात.

लघुउद्योग हे भारत देशांमधील असणारे अर्थव्यवस्थेची जीवन रेखा आहे. विशेष म्हणजे भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये उद्योग सामान्यत श्रमप्रधान असतात आणि म्हणूनच ते रोजगार निर्मितीमध्ये खूपच महत्त्वाची भूमिका बजावत असतात.

लघुउद्योग आर्थिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून अर्थव्यवस्थेचे एक महत्त्वाचे असे चित्र निर्माण करत असतात. लघुउद्योग हे अर्थव्यवस्थेतील दरडोई उत्पादन आणि स्त्रोत वाढवण्यास नेहमी मदत करत असतात.

लघु उद्योग माहिती प्रकल्प मराठी

भारत देशामध्ये लघुउद्योग उघडण्याचे फायदे

मित्रांनो, लघुउद्योग उघडण्यासाठी आपल्याला कमीत कमी भांडवलाची आवश्यकता असते म्हणजे आपण कमीत कमी पैसे गुंतवून लहान उद्योग सुरू करू शकतो. त्याचप्रमाणे भारत सरकार तसेच महाराष्ट्र सरकार देखील आपल्याला लघुउद्योग सुरू करण्यासाठी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत करत आहे तसेच प्रेरणा देत आहे.

त्याचप्रमाणे आपल्याला लघुउद्योग सुरू करण्यासाठी आपल्याला सरकारी समर्थन देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मिळत आहे. तसेच बांधकाम क्षेत्रामध्ये जर आपण लहान उद्योग लघुउद्योग सुरू करू शकत असाल तर आपल्याला महाराष्ट्र सरकार तसेच भारत सरकार करून आरक्षण अस्तित्वात देखील मिळत आहे.

त्याचप्रमाणे लघुउद्योग सुरू करण्यासाठी आपल्याला भारत सरकारकडून आणि महाराष्ट्र सरकार कडून खूपच मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणि सबसिडी देखील उपलब्ध होत आहे.

लघु उद्योग सुरू झाल्यानंतर भारत देशांमध्ये बाजारपेठेत मध्ये उत्पादनांना खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मागणी वाढत आहे. लघु उद्योग सुरू करणे हे कच्चामाल कामगार स्वस्त उत्पादन यावरदेखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये लघुउद्योगांची भविष्यवाणी ठरत असते.

लघुउद्योग कशावर अवलंबून असतो

लघु उद्योग हा उद्योगासाठी लागणाऱ्या मशीन्स, कच्चामाल, कामगार, स्थानिक वाहतूक संस्था यावर देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये अवलंबून असतो.

लघु उद्योगांची यादी

1) मोबाईल दुरुस्ती

मित्रांनो, मोबाइल हे घराघरांमध्ये वापरले जाणारे वस्तू आहे मित्रांनो तुम्ही मोबाईल दुरुस्तीचा व्यवसाय हा कमी पैशांमध्ये सुरू करू शकता. तसेच आपण मोबाईल चे काही भाग होलसेल मार्केटमधून खरेदी करू शकता.

त्याचप्रमाणे आपल्याला जर मोबाईल दुरुस्तीचा कोर्स करायचा असेल तर आपण युट्युब वर व्हिडिओ पाहून देखील आपल्याला मोबाईल दुरुस्ती कशी करावी हे माहीत होऊ शकते.

2) चहाचे दुकान Tea shop

मित्रांनो, चहा आणि कॉफी हा एक शहरांमधील आणि ग्रामीण भागांमधील खूपच चांगला व्यवसाय आहे कमी भांडवलामध्ये हा व्यवसाय सुरू करू शकतो. यासाठी आपल्याला आपला कॉफी आणि चहा फक्त चांगले असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आपण छान वातावरण देखील आपल्या त्याच्या दुकानापाशी असणे आवश्यक आहे.

त्याच प्रमाणे आपण जर चहाचे दुकान सुरू करत असाल तर हे दुकान सुरू करण्यासाठी आपल्याला चांगले स्थान देखील चांगले असणे आवश्यक आहे.

तसेच आपल्याला विशिष्ट जागी हे दुकान असणे देखील आवश्यक आहे. तेथे लोकांची वर्दळ योग्य असेल या ठिकाणी आपण बहुतांश लोक चहा पिण्यासाठी येत असतात. यामुळे आपण योग्य जागा निवडली तर आपल्याला चहाच्या दुकानासाठी ग्राहक हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये येत राहतील.

लघु उद्योग माहिती प्रकल्प मराठी

3) खेळण्यांचे दुकान

मित्रांनो, लहान मुलांना नेहमी खेळणे आवडत असतात तसेच लहान मुले खेळणी आवडीने आणि हटाने खरेदी करत असतात. पालक हे मुलांच्या आनंदासाठी महागडी खेळणी खरेदी करत असतात त्याच प्रमाणे आपण आपल्या क्षेत्रामध्ये लहान मुलांच्या खेळण्याचे दुकान सुरू करू शकता आपण आपल्या दुकानांमध्ये अनुकूल फॅन्सी खेळणे ठेवू शकता.

4) सुरक्षा एजन्सी

आजकाल प्रत्येकाला प्रत्येकाची सुरक्षा आवश्यक आहे. आपण सिक्युरिटी गार्ड सुरक्षारक्षक अशी सेवा आपल्या जवळच्या सोसायटीमध्ये तसेच कंपन्यांना पुरवू शकता.

यासाठी आपल्याला सुरक्षा एजन्सी खरोखरच चांगला व्यवसाय आहे. यासाठी आपल्याला सुरक्षा एजन्सीची लायसन असणे गरजेचे असते यासाठी आपल्याला सुरक्षा करण्यासाठी चांगला मनुष्यबळ आवश्यक असतो.

लघु उद्योग लिस्ट (लघु उद्योग माहिती प्रकल्प मराठी)

 • कृषी सल्ला व सेवा केंद्र
 • पिण्याच्या पाण्याचे जार पुरवठा करणे
 • फळ रसवंती गृह
 • कच-यापासून बगीचा
 • आय. क्यू. एफ. प्रकल्प
 • एम.सी.आर. टाईल्स
 • पी.व्ही.सी. केबल
 • चहा स्टॉल
 • मृद व जल चाचणी प्रयोगशाळा
 • वडा पाव
 • शटल कॉक
 • कुक्कुट पालन
 • शेळी पालन
 • खवा तयार करणे
 • हात कागद तयार करणे
 • चार चाकी वाहनांसाठी सेवा केंद्र
 • आटा चक्की
 • पान दुकान
 • भात खरेदी करणे
 • ऑटो लॉक्स कास्टिंग
 • जॉब वर्क्स
 • रीळ मेकिंग
 • सौर उपकरणे विक्री दुकान
 • ऑटो टयूब्ज फ्लॅप्स
 • खडू उत्पादन
 • रबर गास्केट
 • वीट उत्पादन
 • केश कर्तनालय
 • दोर निर्मिती
 • रबर स्टॅम्प्स
 • सौर कूकरमध्ये खारवलेले शेंगदाणे
 • कमी अंतराकरीता कुरीअर सेवा
 • वेब डेव्हलपमेंट
 • माल वाहतूकीसाठी स्वयंचलित वाहन
 • इडली
 • चकली
 • ढाबा
 • साइल व वाटर टेस्टिंग लॅब
 • केबल टी.व्ही.
 • आवळा चहा
 • पिको फॉल
 • सोया दूध पनीर उत्पादन
 • मिनी कॉल सेंटर
 • आवळा सरबत
 • काजू सरबत
 • कोकम सरबत
 • धोबी सेवा
 • मंडप सेवा
 • शेळी पालन
 • वराह पालन
 • तयार कपडे व गांधी टोप्या
 • गादी तयार करणे
 • मोजे तयार करणे
 • सोलर वॉटर हिटर
 • मिनी डेअरी
 • कृषि बाजार व माहिती केंद्र
 • चिंच पावडर तयार करणे
 • मँगो ज्यूस तयार करणे
 • सुके अंजीर तयार करणे
 • कॉइन बॉक्स टेलिफोन बूथ
 • ऑफीस फाईल्स
 • पापड बनविणे
 • वॉटर फिल्टर कम कूलर
 • चिकन विक्री केंद्र
 • वॉटर फिल्टर कॅंडल्स
 • पोहे प्रकल्प
 • झिंक फास्फेट
 • विमा व्यवसाय सेवा
 • कॉईल वाईंडींग
 • जनरल इंजिनियर
 • टॉफी निर्मिती
 • मिनी लायब्ररी
 • एग्ज अल्बुमीन फेल्क्स
 • काजू प्रक्रीया
 • शुगर ग्लोब्युल्स
 • अल्प गुंतवणुकीतून नॅडेप सेंद्रिय खत
 • ब्लो-मोल्डींग प्लास्टीक वस्तू
 • आमचूर
 • फरसाण
 • बिंदी
 • बेकरी
 • हॅचरी
 • फॅक्स व ई-मेल प्रक्षेपण
 • आळंबी व नॅडेप सेंद्रिय खत
 • डोअरी व नॅडेप सेंद्रिय खत
 • ऊसाचे गु-हाळ
 • कापूर वडी
 • ब्रास बँड
 • हरभरा डाळ
 • सुरभी बॅग व इतर वस्तू तयार करणे
 • आमलेट पाव गाडी
 • क्रेन सेवा
 • लिंबू सरबत
 • सायबर ढाबा
 • फिरते कापड व कपडे विक्री दुकान
 • मसाले तयार करणे
 • लोणचे तयार करणे
 • ब्रेक ड्रम कास्टिंग
 • कच्चा चिवडा
 • कांडी कोळसा

लघु उद्योग माहिती प्रकल्प मराठी Laghu Udyog Project Information in Marathi निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला लघु उद्योग माहिती प्रकल्प मराठी याबद्दल दिलेली माहिती आवडली तर असेल अशी आम्हाला आशा आहे. मित्रांनो आपल्याला जर लघु उद्योग सुरू करायचा असेल तर आपण वरील दिलेल्या लघुउद्योग यादी या मधील कोणताही उद्योग सुरू करू शकता.

वरील दिलेले उद्योग हे खूपच कमीत कमी भांडवलामध्ये आपण सुरु करू शकता येणाऱ्या काळामध्ये लघुउद्योग आला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये महत्त्व येणार आहे याचाच विचार करून आपण जर सध्याच्या काळामध्ये लघुउद्योग सुरू करण्याचा विचार करत असाल तर आपला विचार हा येणाऱ्या काळासाठी खूपच महत्वपूर्ण आणि फायद्याचा ठरणार आहे.

मित्रांनो आपल्याला लघु उद्योग प्रकल्प माहिती मराठी याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की सांगा. आम्ही आपल्यासाठी नेहमी नवनवीन माहिती घेऊन येत असतो.

2 Comments

2 Comments

 1. Pingback: ग्रामपंचायत निधी माहिती । Gram Panchayat Fund Information [New]

 2. Pingback: रेशन कार्ड माहिती मराठी Ration card information in Marathi (New)

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending