Connect with us

Information

जमीन मोजणीसाठी लागणारी कागदपत्रे | Land Survey Documents in Marathi, जमिनीची मोजनी करण्यासाठी लागणारे कागदपत्रे कोणती

Published

on

जमीन मोजणी साठी लागणारे कागदपत्रे

जमीन मोजणीसाठी लागणारी कागदपत्रे: काय मित्रांनो आपल्याला जमिनीचा शेजारीपाजाऱ्यांकडून त्रास होत आहे तसेच आपल्याला जमीन कमी आलेले आहे तसेच आपले बांधकारी आपल्याला त्रास देत असेल तर आपण जमीन सरकारी मोजणी करावी यासाठी आपल्याला कोणकोणती जमीन मोजणी साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे आहेत याबद्दल आज आम्ही माहिती घेऊन आलेलो आहोत. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया कोणताही वेळ न वाया घालवता जमीन मोजणी साठी आवश्यक असणारे कागदपत्रे कोणकोणते आहेत ती.

जमीन मोजणीसाठी असणारे आवश्यक कागदपत्रे

1) मोजणी करायच्या जमिनीचा अंदाजे नकाशा हा लागत असतो.

2) ज्या गटाची शेतजमीन मोजणी करायचे आहे त्या गटाचा सातबारा उतारा लागत असतो.

3) मोजणी फी भरण्याबाबतचे चलन देखील लागत असते.

4) आपल्याला आपल्या जमिनीमध्ये कोणत्या बाजूची तसेच कोणत्या हद्दीची तक्रार आहे तसेच कोणत्या बाजूची हद्द काय आहे तसेच काय करून पाहिजे याबद्दलचा तपशील हा द्यावा लागत असतो.

5) आपल्या जमिनीच्या लगतच्या खातेदाराचे नाव व पत्ता द्यावा लागत असतो.

6) अर्ज फी तसेच कोर्ट फी स्टॅम्पसह द्यावी लागत असते.

जमीन मोजणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

जमीन मोजणी करताना घ्यायच्या आवश्यक सूचना

1) आपली जमीन किंवा प्लॉट मोजणी झाल्यानंतर आपल्या हद्दीमध्ये आपण सर्वप्रथम कुंपण टाकून घ्यावे.

2) आपण जर शासकीय जमीन मोजणी करत असाल तर शासकीय जमीन मोजणी करतेवेळी आपण त्याची चित्रफीत काढून घेणे गरजेचे असते.

3) काही कालांतराने हद्दीसंबंधीत वाद निर्माण झाल्यानंतर आपण काढलेले चित्रफीत तसेच व्हिडिओ शूटिंग महत्त्वाचा पुरावा म्हणून देखील मांडता येतो.

4) सरकारी मोजणी मध्ये साधी मोजणीसाठी 180 दिवस लागतात, तसेच तातडीची मोजणीसाठी 80 दिवस लागत असतात, त्याचबरोबर आपल्याला जर अति तातडीची मोजणी मागवायची असेल तर आपल्याला साठ दिवस लागत असतात. असा कालावधी जमीन मोजणी सरकारी करण्यासाठी लागत असतो.

5) मित्रांनो आपण जर नवीन जमीन तसेच प्लॉट खरेदी करत असाल तर शासकीय जमीन मोजणी करूनच ते विकत घ्यावे कारण की पुढे शेजारील व्यक्तीचा किंवा त्यापूर्वीच्या जमिनीच्या वारसांचा आपल्याला त्रास होणार नाही.

जमीन मोजणी साठी लागणारे कागदपत्रे याबद्दलचा निष्कर्ष

मित्रांनो, अलीकडच्या काळामध्ये जमीन मोजणी करणे खूपच गरजेचे बनलेले आहे. मित्रांनो जमिनीमुळे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाद निर्माण होत आहेत म्हणूनच आपण शासकीय जमीन मोजणी करणे खूपच गरजेचे आहे.

मित्रांनो आपल्याला जर शासकीय जमीन मोजणी करण्यासाठी वरील प्रमाणे कागदपत्राची आवश्यकता असते. मित्रांनो वरील प्रमाणे जमीन मोजणीसाठी लागणारे कागदपत्रे याबद्दलची दिलेली माहिती आपल्याला कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा.

तसेच आपण आपल्या मित्रपरिवारासोबत जमीन मोजणी साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे याबद्दल दिलेली माहिती नक्की शेअर करा.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending