LLB course information in Marathi: मित्रांनो, बारावी झाल्यानंतर कशाला ऍडमिशन घ्यावे हा प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये चालवतो. मित्रांनो बारावीनंतर विद्यार्थ्यांसाठी इंजिनिअरिंग फार्मसी, बीएससी असे अनेक पर्याय डिग्री कोर्सेस उपलब्ध आहेत.
प्रत्येक जण आपल्या आवडीचा कोर्सला ऍडमिशन देखील घेत असतो. मित्रांनो आपल्यापैकी अनेक जणांची वकील बनण्याची इच्छा असते.
आज आपण एलएलबी कोर्स बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. या कोर्स साठी पात्रता काय आहे हे अनेकांना माहिती देखील नसते चला तर मित्रांनो कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया एलएलबी साठी काय पात्रता आहे.
अनुक्रमणिका
LLB course information in Marathi
एल एल बी म्हणजे नक्की काय
मित्रांनो, एल एल बी ला बॅचलर ऑफ लॉ असे देखील म्हटले जाते. मित्रांनो हा अभ्यासक्रम तीन वर्षाचा असतो. या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला राज्यघटना आणि विकसनशील कायदेशीर प्रणाली बद्दल सखोल माहिती मिळत असते. तसेच कॉर्पोरेट विधाई व्यवसाय याबद्दल देखील माहिती आपल्याला खूपच मूलभूत मिळत असते.
बी ए नंतर एलएलबी करता येते का
मित्रांनो, बी ए नंतर एलएलबी देखील करता येते. एलएलबी करण्यासाठी एस सी, एस टी आणि ओबीसी विद्यार्थ्यांना अनुक्रमे किमान 34 टक्के गुण असणे गरजेचे आहे.
दुसरीकडे जर तुम्ही परदेशामध्ये एलएलबी चा अभ्यास करण्याचा विचार करत असाल तर परदेशी law कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी तुमच्याकडे कमीत कमी 60 टक्के व त्याहून अधिक गुण असायला हवेत. तसेच परदेशी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला प्रवेश परीक्षा देखील द्याव्या लागतात.
एलएलबी चा फुल फॉर्म काय आहे
मित्रांनो, एल एल बी ला बॅचलर ऑफ लॉ असे देखील म्हणतात एलएलबी चा फुल फॉर्म हा बॅचलर ऑफ लॉ असा देखील होतो.
एलएलबी साठी पात्रता काय आहे
1) एलएलबी करण्यासाठी उमेदवार हा बारावी बोर्ड परीक्षेमध्ये पास झालेला असावा. उमेदवार बोर्ड परीक्षेत किमान 45 टक्के गुण उत्तीर्ण असणे देखील आवश्यक आहे.
2) एलएलबी साठी एंट्रन्स एक्झाम उमेदवारांनी दिलेले असावी महाराष्ट्र मध्ये एलएलबी प्रवेशासाठी एंट्रन्स एक्झाम घेतली जात आहे.
3) बारावी केल्यानंतर एलएलबी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पाच वर्षाची डिग्री असते. तर कोणतेही विषय मधून डिग्री केलेले विद्यार्थ्यांसाठी तीन वर्षाची एलएलबी असते.
4) भारत देशामध्ये एलएलबी करण्यासाठी वयाची कोणतीहि अट नाही.
एलएलबी कोर्स करत असताना लागणारी कौशल्य कोणते आहेत
1) संभाषण कौशल्य
2) आत्मविश्वास
3) व्यवसाय जागरूकता
4) वेळेचे व्यवस्थापन
5) शैक्षणिक क्षमता
6) कायदेशीर संशोधन आणि विश्लेषण

एलएलबी कोर्सची फी किती आहे
मित्रांनो, एलएलबी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाची माहिती घेतानाच llb करण्यासाठी किती पैसे लागतात. एलएलबी कोर्सची फी किती आहे याची माहिती विद्यार्थ्यांना मिळाली पाहिजे.
जेणेकरून नंतर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एलएलबी अभ्यासक्रमाच्या शुल्क व कोणताही दृष्टिकोन निर्माण होणार नाही. मित्रांनो तीन वर्षांनी पाच वर्षाच्या एलएलबी अभ्यासक्रमाचे शुल्क हे वेगवेगळे आहे. बारावीनंतर एलएलबी हा अभ्यासक्रम पाच वर्षाचा असल्यामुळे त्याची फी जास्त आहे.
कारण त्यात एलएलबी तसेच बीए, बी कॉम, बीएससी, बीसीए, इंटिग्रेटेड डिग्री आहेत. या कारणास्तव काळाबरोबर विषय देखील वाढत जात असतात. त्याचबरोबर तीन वर्षाच्या एलएलबी कोर्समध्ये फी कमी आहे. कारण त्यात फक्त एलएलबी विषय आहेत आणि वेळ मर्यादा कमी आहे.
मात्र यामध्ये विद्यार्थ्यांना पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे ज्याची फी वेगळी आहे. मित्रांनो तसेच प्रत्येक कॉलेजची फी वेगळी असते. तरीदेखील आज आपण सरासरी बद्दल बोललो तर पाच वर्षाच्या एलएलबी अभ्यासक्रमाची फी सुमारे चार लाख रुपये आहे. त्याच तीन वर्षाचे एलएलबी कोर्सची फी सुमारे अडीच लाख रुपये आहे.
खाजगी महाविद्यालयाच्या तुलनेमध्ये सरकारी महाविद्यालयातील शुल्क खूपच कमी आहे. सरकारी महाविद्यालयांमध्ये बोलायचे झाले तर एक ते दोन लाख पर्यंत शुल्क आहे.
एलएलबी केल्यानंतर नोकरीचे पर्याय कोणते आहेत
मित्रांनो, एलएलबी केल्यानंतर अनेक क्षेत्रांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध असतात. चला तर मग जाणून घेऊया आपण जर गेलेली केली तर आपल्याला कोणत्या क्षेत्रामध्ये नोकरी लागू शकते चला तर माहिती जाणून घेऊया.
1) एलएलबी झालेला विद्यार्थी हा वकील म्हणून नोकरी करू शकतो.
2) सरकारी वकील बनण्याची संधी देखील उपलब्ध होत असते.
3) एलएलबी झालेले विद्यार्थ्यांना खाजगी किंवा सरकारी संस्था तसेच बँक कायदेशीर विभाग कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये कायदेशीर सल्लागार म्हणून देखील नोकरी लागते.
4) तसेच कॉलेजमध्ये व्याख्याता म्हणून देखील नोकरी असते.
एल एल बी साठी कोणत्या प्रवेश परीक्षा घेतल्या जातात
- CLAT
- AIBE
- AILET
- DU
- CAT ILI
- LSAT
- ILSAT
- LNAT

एलएलबी मध्ये स्पेशल विषय कोर्स कोणते आहेत
मालमत्ता कायदा
परदेशी कायदा
कंपनी कायदा
कौटुंबिक न्यायालय
कामगार कायदे
मीडिया कायदा
बाजार चिन्ह
कॉपीराईट
पेंटंट कायदा
गुन्हा कायदा
कायदेशीर संशोधन
फेडरल कायदा
वरील प्रमाणे कौशल्याच्या आधारावर तुम्ही एलएलबी मध्ये पेशल विषय घेऊन पदवी मिळू शकतात.
निष्कर्ष
मित्रांनो, आपल्याला जर कायदेशीर बाबींमध्ये करिअर करायचे असेल तसेच आपले जर मन वकिली क्षेत्राकडे झुकत असेल तर आपण एलएलबी करिअर निवडावे.
हे करियर आपल्यासाठी खूपच चांगले आहे. या करिअर मधून आपण खूपच मोठ्या प्रमाणामध्ये पैसे देखील कमवू शकता. आणि लोकांना सेवा देखील देऊ शकता.
मित्रांनो आपल्याला वरील प्रमाणे दिलेले माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच आपल्याला आणखी कोणती माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा.
तसेच मित्रांनो एलएलबी याबद्दल दिलेली माहिती आपण आपले मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.