Connect with us

business ideas

मधमाशी पालन माहिती | Madhmashi Palan Mahiti in Marathi, Beekeeping Information in Marathi

Published

on

मधमाशी पालन माहिती

मधमाशी पालन माहिती: मित्रांनो, शेतकऱ्यांना नेहमी निसर्गाशी सतत झगडावे लागत असते. तसेच सातत्याने प्रतिकूल परिस्थितीला आणि आर्थिक परिस्थितीला तोंड द्यावे लागते.

तसेच पैशाच्या अडचणी देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना वाढत असतात. म्हणूनच मित्रांनो आपण जर शेतीबरोबरच जोडधंदा करायचा विचार करत असाल तर आज आम्ही आपल्यासाठी मधमाशी पालन माहिती घेऊन आलेलो आहोत.

हा व्यवसाय करून तुम्ही तुमच्या अडचणीवर मात करू शकता तसेच स्वाभिमानी जीवन जगू शकता. मित्रांनो जोडधंदे मध्ये अलीकडच्या काळामध्ये खूपच चांगल्या प्रकारे विकसित झालेला चांगला जोडधंदा म्हणून मधमाशी पालन हा ओळखला जातो. चला तर मित्रांनो कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया मधमाशी पालन माहिती अगदी सविस्तर रित्या.

मधमाशी पालन माहिती मराठी PDF | Beekeeping Information in Marathi

मित्रांनो, आपण शेती सोबतच मधमाशी पालन हा व्यवसाय देखील करू शकता या व्यवसायाच्या मदतीने आपण जोडधंदा खूपच चांगल्या प्रकारे करू शकता.

तसेच चांगल्या प्रकारे नफा देखील कमवू शकता. मित्रांनो तुम्हाला हवे असल्यास मधमाशी पालन हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्ही सरकारकडून आर्थिक मदत देखील मिळू शकता.

मित्रांनो मधमाशी पालनातून आपण चांगला नफा कमवू शकतो. मित्रांनो आपल्याला हा व्यवसाय सुरू करण्यासाठी नवीन मधमाशा पुन्हा हा व्यवसाय सुरू करण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत करत असतात.

मधमाशांच्या असणाऱ्या जाती कोणकोणत्या आहेत

मधमाशी पालन माहिती

1) कामगार मधमाशी

कामगार मधमाशी या मधमाशी कडून सर्व प्रकारचे काम केले जाते. त्यामध्ये मध गोळा करणे, अंड्यांची काळजी घेणे शत्रूपासून त्याचे संरक्षण करणे असे सर्व कामे कामगार मधमाशा करत असतात.

या मधमाशीच्या आयुष्य हे दोन ते तीन महिन्यांचे असते. कामगार मधमाशा या आकाराने सर्वात लहान असतात त्यांची संख्या हजारोंच्या घरामध्ये असते.

2) राणी मधमाशी

मित्रांनो, राणी मधमाशी ही कीटकांच्या थव्याची प्रबळ असे असणारी मादी असते. ही मधमाशी इतर सर्व मधमाशांपेक्षा आकाराने मोठी असते.

मधमाशांची संख्या वाढवणे हे तिचे प्रमुख काम असते. राणी मधमाशीची अंडी घालण्याची क्षमता ही तिच्या प्रजातींवर देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये अवलंबून असते.

परदेशी प्रजातीची राणी एका दिवसामध्ये दीड हजार ते दोन हजार अंडी घालत असते. भारतीय मधमाशांच्या प्रजातीमध्ये ही संख्या एक हजार ते बाराशे पर्यंत आहे. या मधमाशीचे वय हे आयुष्य दोन ते तीन वर्षाचे असते.

3) नर मधमाशी

या मधमाशीचा आकार हा राणी मधमाशी पेक्षा थोड्या प्रमाणामध्ये लहान असतो.

मधमाशांसाठी असणारे योग्य वातावरण कोणते असते

मित्रांनो, आज कालच्या काळामध्ये मधमाशी पालनासाठी विशेष पात्रतेची गरज नसते. अल्पशिक्षित व्यक्ती ही या व्यवसायाचे प्रशिक्षण घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतो.

मधमाशीसाठी सर्वात योग्य वातावरण आहे ते म्हणजे बागेमध्ये ज्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये झाडे आहेत अशा ठिकाणी मधमाशी पालन करणे सोपे जाते.

तसेच मधमाशी पालन हे फुल शेती बरोबरच अगदी आणि अतिशय अधिक फायदेशीर ठरत असते. मधमाशा पिकांच्या परागीकरणांमध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत करत असतात.

यामुळे पिकाच्या उत्पादनामध्ये 20 ते 80 टक्के वाढ होऊन पीक चांगल्या प्रकारे येत असते. यामध्ये सूर्यफूल, गाजर, मिरची, सोयाबीन, खसखस, मसूर, हरभरा, लिंबू, आवळा, पपई, पेरू, आंबा, संत्री, मोसंबी, द्राक्षे, निलगिरी आणि गुलमोहर यांसारखी असणारी फळझाडांच्या बागेमध्ये मधमाशी पालन सहज करता येत असते.

मधमाशी पालन करण्यासाठी प्लांटची काय किंमत असते

मधमाशी पालन करण्यासाठी प्लांटची एकूण किंमत सुमारे वीस लाखांपर्यंत येत असते. आपण एवढी जर गुंतवणूक केली तर या मदतीने आपण दररोज शंभर किलोपर्यंत देखील मध तयार करू शकतो.

मधमाशी पालन करण्यासाठी पात्रता काय आहे

मित्रांनो, आजकालच्या काळामध्ये मधमाशी पालन करण्यासाठी विशेष पात्रतेची गरज देखील नाही. अल्पशिक्षित व्यक्ती देखील या व्यवसायाचे प्रशिक्षण घेऊन खूपच चांगले हा व्यवसाय सुरू करू शकतो.

या व्यवसायाचे प्रशिक्षण घेण्यासाठी प्रशिक्षण शुल्क देखील जास्त प्रमाणामध्ये नसते. मित्रांनो तुम्ही कोणत्याही संस्थेतून केवळ 500 ते हजार रुपयांमध्ये प्रशिक्षण घेऊ शकता. आणि तुम्हाला कृषी विज्ञान केंद्र तसेच कृषी विभागामार्फत मोफत प्रशिक्षण देखील मिळत असते.

या प्रशिक्षण शिबिरामध्ये तुम्हाला मध उत्पादनासाठी योग्य वातावरण नवीन उपकरणे आणि व्यवस्थापन नवीन तंत्र विषयी योग्य माहिती अधिक मध उत्पादन करणाऱ्या मधमाशांच्या प्रजाती तसेच त्यांच्या विविध असणाऱ्या जातींमधील सुधारणा आणि रोगप्रतिबंधक आणि शास्त्रीय पद्धतीची माहिती योग्य पद्धतीने मिळेल.

अशा ठिकाणी आपण प्रशिक्षण घेतले पाहिजे.आपण सर्व अशा प्रकारे ज्ञान घेतले तर आपला व्यवसाय हा खूपच चांगल्या प्रकारे वाढू शकतो.

मधमाशी पालनातून होणारे फायदे

1) मित्रांनो, आपण मधमाशी पालन व्यवसाय सुरू केल्यानंतर आपण कमी वेळेमध्ये अधिक मोठ्या प्रमाणामध्ये नफा मिळवू शकता.

2) मित्रांनो, मधमाशी पालन हे कमी उत्पन्न देणाऱ्या शेतामध्ये देखील केले जाऊ शकते. जेथे मेनाचे मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन होऊ शकते.

3) मित्रांनो, मधमाशी पालन हे समूह किंवा व्यक्तीद्वारे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये सुरू करता येते. बाजारामध्ये मध आणि मेणाची मागणी ही खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आहे.

4) मधमाशी पालन सोबतच तसेच मधमाशी पालन केल्याने याचा पर्यावरणावर देखील सकारात्मक परिणाम होत असतो.

5) सूर्यफूल पिकाचे उत्पादन वाढवण्यात मधमाशा खूपच महत्त्वाची भूमिका बजावत असतात.

मधमाशी पालन माहिती

मध खाण्याचे फायदे शरीरासाठी काय आहेत

1) मित्रांनो, मधामुळे आपल्या शरीराला चांगल्या प्रकारे ऊर्जा मिळत असते.

2) मित्रांनो, आपल्या शरीरामधील रक्त स्वच्छ करण्यासाठी मध हा खूपच चांगल्या प्रकारे मदत करत असतो.

3) घशाच्या संसर्गासाठी मध आपल्याला खूपच चांगले वरदान आहे.

4) मित्रांनो, आपल्याला जर ताप येत असेल तर आपण एक चमचा मधासोबत लोणी खाल्ल्याने आपल्याला ताप येणार नाही.

5) मित्रांनो, मधाचा उपयोग हा खोकला, सर्दी, पचन संस्था, डोळ्यांचे विकार, सौंदर्यप्रसाधने यामध्ये देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो.

6) मधामुळे शरीरातील थकवा दूर होण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते.

7) लिंबू पाण्यामध्ये मध मिसळून सेवन केल्याने लठ्ठपणा देखील कमी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो.

मधमाशी पालन करण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात

साधारणपणे मधमाशांना मित्रांनो कोणतेही प्रकारचा रोग होत नाही. परंतु काही वेळा या पाळलेल्या मधमाशांना माइल नावाचा रोग हा होत असतो.

तथापि त्यांचे सोपे आणि अचूक उपचार देखील आजकालच्या काळामध्ये अस्तित्वात आहेत. प्रत्येक मधमाशीच्या पालनाच्या पेटीमध्ये लसणाच्या दोन पाकळ्या टाकल्यास हा आजार होत नाही.

मधमाशी पालन करण्यासाठी शासनाकडून मिळणारी मदत कोणती आहे

मित्रांनो, भारत सरकारच्या एमएसएमई या विभागाद्वारे तुम्हाला या व्यवसायासाठी मदत होत असते. तसेच खादी आणि ग्रामोद्योग आयोग अंतर्गत देखील अनेक योजना राबवल्या जातात. या योजनेअंतर्गत मधमाशी पालन व्यवसायाला प्रोत्साहन देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये दिले जाते.

1) मधमाशी पालन हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार मध प्रक्रिया केंद्राच्या स्थापनेसाठी खूपच चांगल्या प्रकारे मदत करत असते. या प्लांटच्या स्थापनेसाठी एकूण खर्चाच्या 65 टक्के रक्कम कर्ज म्हणून सरकार देत असते.

2) तसेच कर्जाशिवाय सरकारकडून 25 टक्के सबसिडी देखील दिली जाते. एकूण खर्चाच्या फक्त मित्रांनो आपल्याला दहा टक्के रक्कम स्वतः गुंतवावी लागते.

निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला वरील प्रमाणे मधमाशी पालन याबद्दलची दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला नक्कीच सांगा. मित्रांनो आम्हाला अशी आशा आहे की मधमाशी पालन याबद्दलची दिलेली माहिती आपल्याला नक्कीच आवडलेली असेल.

मित्रांनो वरील प्रमाणे आपल्याला जर मधमाशी पालन करण्यासाठी कोणते कर्ज प्रक्रियेमध्ये अडचणी येत असेल तरी देखील आपण आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा.

मित्रांनो वरील प्रमाणे दिलेली माहिती आपण आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करण्यास कदापिहि विसरू नका.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending