Connect with us

business ideas

महिला बचत गटाचे फायदे Mahila Bachat Gat Benefits in Marathi

Published

on

महिला बचत गटाचे फायदे

महिला बचत गटाचे फायदे : काय मित्रांनो तुम्ही एक बचत गट सुरू करत आहात आणि तुम्हाला महिला बचत गटाचे फायदे काय काय आहेत हे माहिती नाहीत तसेच तुम्हाला बचत गटाचे फायदे कोण कोणते आहेत हे जाणून घ्यायचे आहेत.

आज आम्ही मित्रांनो आपल्याला बचत गटाचे फायदे कोण कोणते आहेत हे अगदी सविस्तर रीत्या सांगणार आहेत तसेच बचत गट योजना कोणकोणत्या आहेत. याबद्दल देखील आपल्याला आम्ही आज माहिती देणार आहोत.

त्याचप्रमाणे आपल्या भारत देशामध्ये बचत गटाची स्थापना कधी झाली हे देखील आम्ही आपल्याला या लेखांमधून सांगणार आहे. त्याचप्रमाणे आपण जर बचतगट सुरू करत असाल

तर आपल्याला त्या बचत गटासाठी काही नियम व अटी असतात महिला बचत गटाच्या नियम व अटी आम्ही आपल्याला या लेखांमधून देखील आपल्याला सांगणार आहे.

त्याचप्रमाणे मित्रांनो आपण जर महिला बचत गट सुरू केला तर आपल्याला त्या बचत गटा मधून कोणकोणते व्यवसाय करू शकतात हे देखील आज आम्ही आपल्यासाठी सांगणार आहोत तसेच महिला बचत गट व्यवसाय कल्पना देखील आम्ही आपल्यासाठी आज घेऊन आलेलो आहोत.

महिला बचत गटाचे फायदे Mahila Bachat Gat Benefits in Marathi

(स्वयंसहाय्यता) महिला बचत गटाचे फायदे कोणकोणते आहेत

मित्रांनो चला तर मग जाणून घेऊया महिला बचत गटाचे फायदे काय काय आहेत महिलांसाठी तसेच त्यांच्या कुटुंबांसाठी.

  • महिला बचत गट सुरू केल्यानंतर महिलांना पैसे वाचवण्याची आणि बँकेच्या व्यवहारांची परिचित होण्याची सवय ही खूपच मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होत असते.
  • महिला बचत गट स्थापन केल्याने बचत गटांमधील असणारे सदस्य हे आपापसात मध्ये परस्पर सहकार्य करत असतात, तसेच त्यांच्यामध्ये परस्पर विश्वास हा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होत असतो.
  • मित्रांनो, महिला बचत गटांना नेहमी कमी व्याजदरावर आर्थिक मदत ही खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मिळत असते.
  • महिला नेहमी महिला बचत गटांमध्ये काम करत असताना त्या स्वावलंबी बनत असतात.
  • महिला बचत गटामध्ये महिला स्वावलंबी बनल्यामुळे त्यांना आर्थिक व्यवहाराची जाणीव होत असते. त्यामध्ये ज्यामध्ये त्यांना बचत कर्ज घेणे आणि पैसे परत देण्यास सर्व महिलांचा आत्मविश्वास हा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असतो.
  • महिला बचत गटामुळे महिलांना घराबाहेर पडून नेहमी नवीन गोष्टी शिकायला मिळत असतात.
  • महिला बचत गटामुळे महिलांच्या आर्थिक समस्या अगदी सहज सुटल्या जातात. कारण बँकांकडून सहज त्यांना आर्थिक मदत केली जाते.
  • महिला बचत गटाच्या सदस्यांना नेहमी सरकारकडून लोक कल्याणकारी योजनांची माहिती मिळत जाते, तसेच त्यांना त्या योजनांचा लाभ देखील मिळत जातो तसेच महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना परतफेड करण्याची सवय खूपच मोठ्या प्रमाणामध्ये विकसित होत असते.
महिला बचत गटाचे फायदे

मित्रांनो वरील प्रमाणे दिलेले फायदे हे महिला बचत गटासाठी खूपच महत्वपूर्ण आहे तसेच हे फायदे आपण जर नवीन महिला बचत गट सुरू करत असाल तर आपल्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आणि फायदेशीर आहेत.

बचत गटाची स्थापना कधी झाली

मित्रांनो सावकार हा व्याज खूप घेत असतो त्याचप्रमाणे गरीब माणूस हा व्याज देतच राहतो त्यामध्ये रक्कम तशीच राहते आणि त्यामधून गरीब माणसाचे ही लूट खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होत असते.

ही लूट थांबविण्यासाठी महिला बचत गट आणि पुरुष बचत गट स्थापना झाली. बचत गटाची स्थापना ही बांगलादेशमधील प्राचार्य डॉक्टर मोहम्मद युनुस यांनी 1976 मध्ये केली.

महिला बचत गटाच्या नियम व अटी काय आहेत

1) महिला बचत गटासाठी असणारे नियम

  1. महिला बचत गटातील सभासद महिला ही गावाबाहेरील नसावी.
  2. महिला बचत गटामध्ये सर्वांना समान बचत असावी.
  3. महिला बचत गटाच्या बैठकीला सर्व सभासदांनी नियमितपणे हजर राहावे.
  4. महिला सभासदाने नियमित रक्कम जमा केली नाही तर त्यास दंड ठेवावा.
  5. महिला बचत गटाच्या सभासदांना कर्जफेडीसाठी ठराविक कालावधीमध्ये योग्य ते हप्ते ठरवून द्यावेत.
  6. महिला बचत गटाच्या बाहेरील व्यक्तीस कर्ज देऊ नये पण गावांमधील असणाऱ्या दुसऱ्या बचत गटास कर्ज देण्यास काही हरकत नाही.
  7. महिला बचत गटामध्ये पुरुषांना सहभागी होता येणार नाही तसेच निर्णय प्रक्रियेमध्ये त्याचप्रमाणे कर्ज घेण्यासाठी त्यांना आपल्या पत्नीच्या वतीने देखील सहभाग घेता येणार नाही.
  8. महिला सभासदाने प्रथम घेतलेल्या कर्जाची परतफेड केल्या शिवाय दुसरे कर्ज देऊ नये.
  9. जेव्हा एखाद्या सभासदाला बँकेकडून कर्ज घ्यायचे असल्यास तेव्हा बचत गटांमधील महिलांची 75 टक्के सभासदांची त्यास मान्यता असावी, हा निर्णय लिखित स्वरूपात असावा.

वरील प्रमाणे महिला बचत गटाच्या साठी असणारे नियम आहेत. खाली आपण महिला बचत गटासाठी असणाऱ्या अटी कोणते आहेत हे जाणून घेणार आहोत.

महिला बचत गटाचे फायदे

2) महिला बचत गटासाठी असणाऱ्या अटी

  1. महिला बचत गटामध्ये कमीत कमी 10 व जास्तीत जास्त 20 सभासद नेहमी असावेत.
  2. महिला बचत गटांमध्ये सभासदाचे वय हे 18 पेक्षा जास्त असावे तसेच महिला विवाहित असावी.
  3. महिला बचत गट सुरू झाल्यानंतर काही महिन्यांनी एखादी महिला महिला बचत गटा मध्ये येण्यास तयार असेल तर तिला गटातील सर्व सभासदांच्या सहमतीने गटामध्ये घ्यावे. तसेच गटातील सदस्य संख्या पाहून तसेच गटामध्ये सामील करून घ्यावे त्याचप्रमाणे नवीन सभासदाने पूर्वीचे इतर सभासदांनी इतके पैसे भरावे लागतात.
  4. महिला बचत गट सुरू झाल्यानंतर सहा महिन्याच्या आत मध्ये गटांमधील असणाऱ्या सर्व तरुण महिलांना सही करता आली पाहिजे. फक्त वयस्कर महिलांना अंगठा देण्याची परवानगी असावी.

महिला बचत गट योजना

महिला बचत गटासाठी योजना ह्या खूपच फायदेशीर आणि महत्वपूर्ण आहेत भारत सरकार मध्ये तसेच महाराष्ट्र सरकार मध्ये महिला बचत गटासाठी खूप काही योजना आहेत.

आज आम्ही आपल्याला योजना महिला बचत गटासाठी कोणकोणत्या आहेत तसेच या योजनेचा उद्देश काय आहे त्याचप्रमाणे त्या योजनेच्या अंमलबजावणी झालेली आहे का हे सांगणार आहे.

1) महिला बचत गट योजनेचा उद्देश

महिला बचत गट योजनेचा उद्देश म्हणजे अल्पसंख्यांक समाजातील महिलांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना सक्षम बनवणे.

2) महिला बचत गट योजनेची अंमलबजावणी

महिला आर्थिक विकास महामंडळ मुंबई यांच्या मार्फत राज्यातील अकरा विभागांमध्ये ही योजना राबवण्यात येत आहे. त्यामध्ये मुंबई, मुंबई उपनगर, नांदेड, मालेगाव, कारंजा, परभणी, पुणे, नागपूर, औरंगाबाद, भिवंडी, मुंब्रा-कौसा व मिरज या शहरांमधून ही योजना राबवण्यात येत आहे.

महिला बचत गटाचे फायदे

3) महिला बचत गट योजना निधी वितरण

या योजनेसाठी शासनामार्फत महिला आर्थिक विकास महामंडळाने नेहमी निधी दिला जातो.

महिला बचत गटासाठी असणाऱ्या व्यवसाय कल्पना

मित्रांनो आपण महिला बचत गट स्थापन केला असाल तर आपल्याला महिला बचत गटांमध्ये व्यवसाय कल्पना ह्या आज आम्ही आपल्यासाठी सांगणार आहोत.

महिला बचत गटाचे फायदे
  • पाळणाघर चालू करणे.
  • किराणा मालाचे दुकान टाकणे.
  • कृषी पर्यटन तयार करणे.
  • मेणबत्ती अगरबत्ती पत्रावळी तयार करणे.
  • डाळ तयार करून विकणे.
  • सौंदर्यप्रसाधने तयार करणे.
  • वाचनालय चालू करणे.
  • हॉटेल खानावळ चालू करणे.
  • विमा प्रतिनिधी बनणे.
  • मोबाईल फोनचे दुरुस्ती आणि विक्री करणे.
  • शिवणकाम घेणे, स्कूल चे ड्रेस शिवणे.
  • सेंद्रिय खत तयार करणे.
  • नर्सरी तयार करून रोपे विकणे.
  • शेती अवजारे भाड्याने देणे.
  • म्हशी, गाई घेऊन दूध व्यवसाय सुरू करणे.
  • कुकुट पालन करणे.
  • शेळी पालन करणे.
  • दुधापासून खवा, पनीर तयार करून विकणे.
  • शेती बियाणे तयार करून विकणे.
  • पापड लोणचे मसाले तयार करून विकणे.
  • रसवंती गृह चालविणे.
  • भाजीपाला विकणे.
  • तेल घाणा उद्योग माहिती
  • रोपवाटिका माहिती । रोपांची नावे । रोपवाटिका चे प्रकार

महिला बचत गटाचे फायदे Mahila Bachat Gat Benefits in Marathi Conclusion

मित्रांनो, आम्ही आपल्यासाठी बचत गटाचे फायदे कोणकोणते आहेत हे देखील आपल्याला वरील प्रमाणे सांगितलेले आहे. त्याचप्रमाणे आपल्याला आम्ही बरीच माहिती बचत गटा संदर्भात दिलेल्या आहेत.

त्याचप्रमाणे बचत गटाची स्थापना कधी झाली हे देखील आम्ही आपल्याला सांगितलेले आहे, त्याचप्रमाणे बचत गटांमध्ये सर्वप्रथम नियम व अटी काय काय आहेत या देखील आपल्याला अगदी सविस्तर रीत्या सांगितलेले आहेत.

त्याचप्रमाणे आपण जर बचत गट सुरू करत असाल तर आपल्याला बचत गटासाठी योजना कोणकोणत्या आहेत हे देखील आम्ही सांगितलेल्या आहेत. तसेच आपण जर बचत गट सुरू केला असेल तर आपल्याला बचत गटा मधून व्यवसाय करण्यासाठी आम्ही बचत गट व्यवसाय कल्पना या देखिल सांगितलेल्या आहेत.

मित्रांनो, आपल्याला वरील प्रमाणे दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला नक्कीच सांगा. मित्रांनो आम्हाला अशी आशा आहे की आपल्याला महिला बचत गटाचे फायदे याबद्दल दिलेली माहिती नक्कीच आवडले असेल तसेच आपल्याला जर काही माहितीसंदर्भात अडचण असेल तर आपण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.

आम्ही आपल्यासाठी नेहमी प्रयत्न करत असतो तसेच आपल्याला आणखी माहिती हवी असल्यास आपण ते देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आम्ही आपल्यासाठी नेहमी नवनवीन माहिती घेऊन येत असतो.

4 Comments

Trending