Connect with us

business ideas

महिला गृह उद्योग माहिती । Mahila Griha Udyog information in Marathi, महिला गृह उद्योग यादी

Published

on

महिला गृह उद्योग माहिती

महिला गृह उद्योग माहिती: मित्रांनो, आजकालच्या काळामध्ये जगभरामध्ये महिला पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत.

पण तरी मित्रांनो भारत देशाचा विचार केला तर आजही लाखो महिला केवळ गृहिणी म्हणून जगत आहेत. वाढत्या आजकालच्या महागाईमुळे घर खर्च चालवण्यासाठी महिला पुरुष दोघांनाही नोकरी करावी लागत आहे.

मात्र अनेक महिला घरातील जबाबदारीमुळे घराबाहेर पडून नोकरी व उद्योग व्यवसाय करू शकत नाहीत. घरातील खर्चाला देखील हातभार लावावा आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावे अशी अनेक महिलांची इच्छा असते.

म्हणूनच मित्रांनो आज आपण महिला गृह उद्योग माहिती याबद्दलची माहिती घेऊन आलेलो आहोत. चला तर कोणताही वेळ न वाया घालवतात जाणून घेऊया महिला गृह उद्योग माहिती.

महिला गृह उद्योग माहिती आणि महिला गृह उद्योग कोणकोणते आहेत

1) शिवणकाम

मित्रांनो, शिवणकाम ही एक कला आहे पूर्वी महिला घरीच शिवणकाम करत असायच्या त्यातील घरातील मुली आणि महिलांना शिवणकाम करण्याचे नियम असायचे.

मात्र आजकालचे शिवणकाम हे फक्त घरातील लोकांचे कपडे शिवणे अथवा फाटलेले कपडे दुरुस्त करणे इतकेच मर्यादित राहिलेले नाही. शिवणकामातील कौशल्य प्राप्त करण्यासाठी प्रशिक्षण घ्यावे देखील लागत असते.

यात बेसिक आणि ॲडव्हान्स असे अनेक कोर्स आजकालच्या काळामध्ये उपलब्ध आहेत. जर मित्रांनो तुम्हाला शिवणकामात रस असेल तर तुम्ही शिवणकामाचा व्यवसाय देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये करू शकता आणि यामधून देखील आपण खूपच चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता.

2) मेहंदी काढणे

मेहंदी काढणे ही एक कला आहे. मित्रांनो घरामध्ये कोणताही कार्यक्रम असो तसेच कोणताही सण असो तसेच लग्न सोहळ्यामध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मेहंदी काढली जाते.

त्यामुळे अनेक महिलांना मेहंदी काढण्याचा सराव देखील असतो. जर तुमच्याकडे मेहंदी काढण्याचे कौशल्य असेल तर त्याचा वापर तुम्ही व्यवसायासाठी देखील करू शकता.

लग्न कार्यामध्ये अथवा अनेक कार्यक्रमांसाठी मेहंदी काढणे तसेच मेहंदीचे कोण करून विकणे, मेहंदी शिकवण्याचे क्लासेस घेणे असे अनेक विविध व्यवसाय तुम्ही या कलेमधून करू शकता. आणि यामधून खूपच चांगल्या प्रकारे पैसे देखील कमवू शकता.

3) कोचिंग क्लास

मित्रांनो, आपण जर चांगल्या प्रकारे शिक्षित असाल तर आपण घरी राहून काही वर्गाच्या शिकवणी क्लास देखील घेऊ शकता. महिलांसाठी हा देखील एक उत्तम असा असणारा घरगुती व्यवसाय आहे.

कारण यातून तुम्हाला ज्ञानदानाचे पुण्य आणि पैसे कमवण्याचे साधन देखील घरबसल्या मिळू शकते. मित्रांनो आजकाल काही मुलांना घरी येऊन शिकवणारे शिक्षक देखील हवे असतात. त्यामुळे मुलांवर नीट लक्ष दिले जात असते. आपण हा व्यवसाय सुरू करून देखील खूपच चांगल्या प्रकारे प्रॉफिट कमवू शकता.

4) अगरबत्ती बनवणे

मित्रांनो, घरामध्ये धार्मिक विधींसाठी अगरबत्ती ही खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आजकालच्या काळामध्ये वापरली जात आहे. साहजिकच भारत देशामध्ये सण उत्सवामध्ये अगरबत्तीचा वापर हा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो.

अगरबत्ती ही दररोज लागणारी गोष्ट असल्याने अगरबत्ती बनवण्याचा व्यवसाय देखील आपण सुरू करू शकतो. यासाठी महिलांनी अगरबत्ती बनवण्याच्या कार्यशाळेमध्ये सहभागी व्हावी लागेल त्याचे रीतसर प्रशिक्षण देखील घ्यावी लागेल.

अगरबत्ती साठी लागणारा कच्चामाल तुम्हाला सहज उपलब्ध होऊ शकतो. ज्यामुळे महिलांनी घरच्या घरी करण्यासाठी हा व्यवसाय खूपच चांगला आहे. यामधून आपण खूपच चांगल्या प्रकारे पैसे देखील कमवू शकता.

5) मेणबत्ती बनवणे

मित्रांनो, आजही भारत देशामध्ये काही ठिकाणी विजेची कमतरता ही खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्याचबरोबर लोड शेडिंग देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये केले जाते.

अशा ठिकाणी मेणबत्ती ची गरज ही नियमितपणे लागत असते. दिवाळी अथवा एखाद्या खास सणाच्या वेळी देखील शहरांमध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये रोषनाई केली जाते घरामध्ये मनमोहक आणि सुगंधित मेणबत्तीने सजावट देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते.

त्याचबरोबर वाढदिवसाच्या केक साठी मेणबत्ती वापरली जाते. आपण मेणबत्ती बनवण्याचा व्यवसाय देखील खूपच चांगल्या प्रकारे करू शकता या व्यवसायामधून आपण खूपच मोठ्या प्रमाणामध्ये पैसे कमवू शकता.

6) टिफिन बनवण्याचा उद्योग

मित्रांनो, आजकालच्या काळामध्ये उच्च शिक्षणासाठी विद्यार्थी हे शहरी भागांमध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये राहत असतात. तसेच रोजगाराच्या शोधामध्ये आलेले विद्यार्थी देखील अशाच परिस्थितीमध्ये असतात अशा परिस्थितीत त्यांना टिफिन घेण्याची गरज खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असते.

याचाच विचार करून आपण जर टिफिन बनवण्याचा उद्योग सुरू केला तर आपल्यासाठी ही एक खूपच फायद्याची गोष्ट आहे. यामधून देखील आपण खूपच मोठ्या प्रमाणामध्ये पैसे कमवू शकतो.

7) केक बनवण्याचा उद्योग

मित्रांनो, प्रत्येकाच्या वाढदिवसाला केक हा लागत असतो. म्हणून मित्रांनो पैसे कमवण्याचा हा एक देखील खूपच सोपा मार्ग आहे. मित्रांनो केक बनवण्याचे प्रशिक्षण आपण सर्वप्रथम घेतले पाहिजे हा व्यवसाय आपण करून खूपच चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकतो.

8) साबण बनवण्याचा उद्योग

मित्रांनो, महिलांसाठी साबण बनवण्याचा उद्योग हा एक खूपच चांगला असा असणारा उद्योग आहे. साबण उद्योगांमध्ये तेल, कॉस्टिक सोडा, पीठ इत्यादी घटकांची आवश्यकता असते आणि हे बाजारामध्ये सहज आपल्याला उपलब्ध असतात.

मित्रांनो साबण बनवण्याचा उद्योग सुरू करण्यासाठी आपल्याला जिल्हा उद्योग केंद्र मार्फत तीन ते सहा महिन्यांचे प्रशिक्षण देखील दिले जाते.

मित्रांनो हे प्रशिक्षण घेण्यासाठी आपण दहावी उत्तीर्ण असणे खूपच आवश्यक आहे. मित्रांनो हा उद्योग विकसित करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राकडून 25 लाखांपर्यंत कर्ज देखील मिळू शकते. हा व्यवसाय सुरू करून आपण खूपच चांगल्या प्रकारे पैसे देखील कमवू शकतो.

निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला महिला गृह उद्योग याबद्दल दिलेले माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.

मित्रांनो आपल्याला महिला गृह उद्योग याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच महिला गृह उद्योग याबद्दल दिलेली माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending