Connect with us

business ideas

मेहंदी काढणे व्यवसाय माहिती | Mehndi Business Information in Marathi

Published

on

मेहंदी काढणे व्यवसाय माहिती

मेहंदी काढणे व्यवसाय माहिती: मित्रांनो, लग्नाच्या वेळी तसेच अनेक कार्यक्रमाप्रसंगी मेहंदी काढली जाते. आपल्या असणाऱ्या कार्यक्रमा वेळी तसेच सण आणि फंक्शनच्या दरम्यामध्ये स्त्रिया ह्या व्यावसायिक मेहंदी डिझायनर ला कॉल करून बोलवत असतात.

आणि जास्तीत जास्त शुल्क भरून सर्वोत्तम मेहंदी डिझाईन करून घेत असतात. जर मित्रांनो आपल्या भागामध्ये मेहंदी लावण्याची कला असेल तर तुमच्याकडे उद्योग साठी खूपच मोठी संधी आहे.

आज आपण हेच जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया मेहंदी काढणे उद्योग व्यवसायाबद्दल अगदी सविस्तर माहिती.

अनुक्रमणिका

मेहंदी काढणे उद्योग व्यवसाय याबद्दल माहिती

मित्रांनो, तुम्ही तुमच्या घरामधून मेहंदी लावण्याचा व्यवसाय देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये करू शकता. मित्रांनो तुम्हाला जर हा व्यवसाय खूपच मोठ्या आणि व्यावसायिक पातळीवर करायचा असेल तर तुम्ही त्यासाठी तुम्हाला एका चांगल्या पार्लरचे देखील आवश्यकता भासत असते.

यासाठी तुम्ही चांगल्या जागेची निवड करण्यात येणे खूपच गरजेचे आहे. तसेच जागेचे विश्लेषण करून आणि इंटेरियर डिझायनर कडे लक्ष द्यावे लागते मित्रांनो हा व्यवसाय मधून आपल्याला पैसे खूपच कमावता येतात.

मेहंदी लावण्याच्या व्यवसायासाठी नेहमी मार्केट संशोधन केले पाहिजे

मेहंदी पार्लर उघडण्यासाठी तुम्हाला नेहमी चांगल्या ठिकाणी जागा निवडावी लागेल. मित्रांनो तुम्हाला कोणत्या भागांमध्ये मेहंदी पार्लर उघडायचे आहे तसेच आजूबाजूच्या परिसरामध्ये राहणाऱ्या महिलांना देखील मेहंदी लावण्यात रस आहे का हे पाहण्यासाठी आपण आजूबाजूच्या परिसराचे नेहमी विश्लेषण केले पाहिजे.

कारण मित्रांनो ग्रामीण भागामध्ये जर आपण मेहंदी पार्लर उघडले तर ते अजिबात चालणार नाही. मेहंदी पार्लरमध्ये सर्वाधिक कमाई ही शहरी भागातच असते.

याशिवाय तुमच्या आजूबाजूला आधीच किती मेहंदी पार्लर आहेत याची देखील आपण विश्लेषण केले पाहिजे. तसेच मित्रांनो मेहंदी पार्लर हे वेगवेगळे डिझाईन साठी किती शुल्क आकारतात हे देखील आपण जाणून घेतले पाहिजे.

जेणेकरून तुम्हाला ग्राहकांकडून त्यांच्यापेक्षा कमी शुल्क आकारू शकता आणि तुम्ही ग्राहकांना काही ऑफर देऊन त्यांना तुमच्या पार्लरकडे नेहमी आकर्षित देखील करू शकता.

मेहंदी व्यवसायासाठी जागेची निवड कशी करावी

मित्रांनो, तुम्ही मेहंदी पार्लर साठी जागा निवडल्यानंतर त्याला मेहंदी पार्लर हे किती जागेवर लावावे लागेल याचा देखील आपण विचार करणे गरजेचे असते.

तसेच तुमच्याकडे जास्त प्रमाणामध्ये गुंतवणूक असेल तर तुम्ही पार्लरचे अधिक जागेमध्ये देखील निर्माण करू शकता. जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला त्यात आणखी काही गोष्टी जोडता येतील.

मित्रांनो तुम्ही तुमच्या गुंतवणुकीनुसार तुमच्या पार्लरच्या असणारे ठिकाण देखील निवडू शकता. जेव्हा तुम्ही पार्लर उघडाल तेव्हा तुम्हाला तिथे रिसेप्शन काउंटर बनवण्यासाठी जागा देखील लागणार आहे.

तुम्हाला बसण्यासाठी सोपा देखील लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला चांगली जागा देखील लागणार मेहंदी लावण्यासाठी जागा देखील लागणार आहे हे लक्षात घेता तुम्ही 1000 ते 1100 चौरस फूट जागा असणे आपल्या पार्लर साठी खूपच आवश्यक आहे.

पार्लरचे इंटेरियर डिझाईन कशी असावी

मित्रांनो, मेहंदी पार्लरची आतील रचना ही खूपच आकर्षक असावे. जेणेकरून महिलांना दुरूनच पाहून तुमच्याकडे पार्लरकडे आकर्षित होता येईल.

तुमच्या पार्लरमध्ये मेहंदीचे चांगले डिझाईन लावावे तुमच्या पार्लरमध्ये बाहेर आकर्षक पाट्या आपण लावल्या पाहिजेत. पार्लरमध्ये अधिकाधिक ग्लास बसवली पाहिजे.

तसेच मित्रांनो रिसेप्शन काउंटर अधिक आकर्षक बनवला पाहिजे. तेथे वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन चे फोटो देखील आपण ठेवले पाहिजे. जेणेकरून महिला त्या डिझाईन पाहून शकतील आणि कोणते एका डिझाईनला त्या आपल्या हातावर मेहंदी काढण्यासाठी योग्य करतील.

तसेच मित्रांनो आपण काउंटरवर वेगवेगळ्या मेहंदी डिझाईन साठी शुल्काचा बोर्ड देखील लावू शकता. तसेच महिलांना थांबवण्यासाठी सोपा देखील ठेवू शकता. पार्लरचा लोक ब्युटी पार्लर सारखा दिसावा सुंदर असा दिसावा मेहंदी लावण्यासाठी वापरण्यात येणारा सोपा देखील चांगल्या दर्जाचा असावा.

मेहंदी पार्लर चे नाव कसे ठेवावे

मित्रांनो, मेहंदी पार्लरचा व्यवसाय वाढवण्यासाठी मेहंदी पार्लरच्या नावानं खूपच मोठ्या प्रमाणामध्ये जास्त महत्त्व असते. आजकालच्या काळामध्ये बहुतेक लोक ट्रेंडिंग नावाकडे अधिक आकर्षित होत असतात. म्हणून आपण आपल्या पार्लरचे नाव नवीन आणि ट्रेडिंग मध्ये ठेवावे.

मेहंदी काढणे उद्योग व्यवसायासाठी मार्केटिंग कशी करावी

मित्रांनो, आजकालच्या काळामध्ये व्यवसाय कोणताही असो त्याचे मार्केटिंग जर व्यवस्थित केले तर व्यवसाय मधून खूपच चांगल्या प्रकारे कमाई करता येऊ शकते.

जेव्हा तुम्ही मित्रांनो मेहंदी लावण्याचा व्यवसाय सुरू करत असाल तेव्हा तुमच्या मेहंदी पार्लरची प्रसिद्धी करावी जेणेकरून तुमच्या पार्लरची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत नेहमी पोहोचू शकेल.

1) मित्रांनो, तुम्ही तुमच्या पार्लरच्या मार्केटिंग साठी टेम्प्लेट तसेच बॅनर देखील बनवू शकता.

2) मित्रांनो, आपण आपल्या पार्लरची जाहिराती वर्तमानपत्रांमध्ये देखील देऊ शकता. जेव्हा मित्रांनो तुमच्या परिसरामध्ये विवाह कार्यालय असतील तसेच पार्टी हॉल असतील तर तुम्ही त्या हॉलच्या बाहेर पार्लरचे बॅनर देखील लावू शकता.

3) तसेच मित्रांनो तुम्ही तुमच्या पार्लरचे व्हिजिटिंग कार्ड देखील पार्टीमध्ये येणाऱ्या प्रत्येक महिलांना तसेच लग्नात तुमच्या पार्लरची जाहिरात करण्यासाठी त्या लोकांना देखील देऊ शकतात. ज्यामध्ये तुम्ही काही डिस्काउंट देखील जोडू शकतात जेणेकरून महिला तुमच्या पार्लरकडे आकर्षित होतील.

4) तसेच मित्रांनो आपण सोशल मीडियाचा वापर करून देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये व्यवसायाचे मार्केटिंग करू शकतो. व्यवसायाचे मार्केटिंग करण्याचा सोशल मीडिया आहे एक चांगला अतिशय चांगला मार्ग आहे.

तुम्ही तुमच्या मेंदी डिझाइनचे फोटो देखील शेअर करू शकता . आणि इंस्टाग्राम, फेसबुक, व्हाट्सअप सारख्या अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुमच्या पार्लरची माहिती देखील शेअर करू शकता.

मेहंदी काढणे व्यवसाय मध्ये किती गुंतवणूक करावी लागते

मेहंदी लावण्याचे व्यवसाय मध्ये मित्रांनो गुंतवणूक ही तुमच्या व्यवसायाच्या आकारावर नेहमी अवलंबून असते. हा व्यवसाय तुम्ही घरबसल्या छोट्या प्रमाणावर देखील सुरू करू शकता. तसेच 30 ते 40 हजारांच्या खर्चात देखील तुम्ही हा व्यवसाय खूपच चांगल्या प्रकारे सुरू करू शकता.

मेहंदी काढणे व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यासाठी किती गुंतवणूक लागते

मित्रांनो, तुम्ही मेहंदी लावण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला पार्लरचे देखील आवश्यकता लागत असेल त्यासाठी तुम्हाला जागा देखील लागत असेल जर तुम्हाला जागा तुमची स्वतःची असेल तर तुमची गुंतवणूक वाचेल मात्र जागा विकत घेतल्यास तुम्हाला चार ते पाच लाखांचा खर्च देखील येऊ शकतो. ही किंमत स्थानानुसार देखील बदलू शकते.

मित्रांनो, पार्लरच्या इंटिरियर डिझायनर साठी एक ते दीड लाख रुपये खर्च येऊ शकतो. व्यवसाय हाताळण्यासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या संख्येमध्ये देखील काही प्रमाणामध्ये खर्च देखील येऊ शकतो. मेहंदी खरेदी करण्यासाठी तुम्हाला खर्च हा येत असतो.

मेहंदी लावण्याचे व्यवसायाची नोंदणी कोठे करावी

मित्रांनो, मेहंदी लावण्याचा व्यवसाय सुरू केल्यानंतर तुम्हाला उद्योग आधार याची देखील आवश्यकता लागणार आहे. उद्योग आधार बरोबर पॅन कार्ड देखील लागणार आहे.

मेहंदी लावण्याचे व्यवसाय मधून कमाई किती होत असते

मित्रांनो, आजकालच्या काळामध्ये महिला आहे प्रत्येक सणाला हाताला मेहंदी नक्कीच लावत असतात. हळूहळू हा ट्रेंड देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे.

ज्यामुळे मित्रांनो आपण भरपूर प्रमाणामध्ये पैसे मिळू शकतात. मित्रांनो आजकालच्या काळामध्ये बहुतेक मेहंदी पार्लरमध्ये साधी मेहंदी काढण्यासाठी एका हातासाठी 200 ते 400 रुपये घेत असतात.

तर लग्नाच्या वेळी पाचशे ते अकराशे रुपये आकरात असतात. लग्न आणि इतर महिलांच्या सणाचे वेळी या व्यवसायामधून अधिक कमाई होत असते. जर तुम्ही दररोज पाच ते सहा लोकांना मेहंदी लावले तर तुम्ही एका महिन्यासाठी 30 ते 40 हजार देखील सहज कमवू शकता.

मेहंदी लावण्याचे व्यवसायामध्ये कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत

1) मित्रांनो, मेहंदी लावण्याचे काम इतके दिसते तसे सोपे नाही. ही एक कला आहे आणि त्यामध्ये आपण अग्रेसर असणे खूपच गरजेचे आहे. मित्रांनो हा व्यवसाय सुरू करताना आपण आपल्या ग्राहकांची नेहमी चांगले वागले पाहिजे.

2) ग्राहकांना नेहमी जास्तीत जास्त मेहंदी डिझाईन चा पर्याय द्या.

3) मित्रांनो, तुम्ही मेहंदीच्या वेगवेगळ्या डिझाईनच्या शुल्का विषयी आधीच बोलून घ्या जेणेकरून नंतर पैसे देताना कोणताही वाद निर्माण होणार नाही.

4) जेव्हा मित्रांनो तुम्ही लग्नाच्या वेळी मेहंदी लावण्यासाठी एखाद्या ठिकाणी जात असतात. तेव्हा वधूच्या संपूर्ण सदस्यांना तिथे मेहंदी लावावी लागत असते अशा परिस्थितीमध्ये सर्वांसाठी समान शुल्क आपण आकरू नका.

उदाहरणार्थ लोक नववधूसाठी अधीक शुल्क आकारतात. कारण त्यांना लागू केलेली मेहंदी डिजाइन अधिक दाट असते. म्हणून वेळ आणि मेहंदी डिजाइनर शुल्क आकारले पाहिजे.

5) घाई घाई मध्ये कधीही ग्राहकांना मेहंदी लावू नये.

निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला मेहंदी काढणे उद्योग व्यवसाय याबद्दल दिलेली माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.

मित्रांनो आपल्याला मेहंदी काढणे याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच मित्रांनो आपल्याला आणखी कोणतेही व्यवसाय बद्दल माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच मित्रांनो मेहंदी काढणे उद्योग याबद्दल दिलेली माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

Trending