Connect with us

business ideas

दूध डेअरी व्यवसाय माहिती Milk Dairy Business Information in Marathi, डेअरी व्यवसाय बद्दल सर्व माहिती

Published

on

दूध डेअरी व्यवसाय माहिती

दूध डेअरी व्यवसाय माहिती: काय मित्रांनो आपण व्यवसाय करायचा विचार करत आहात आणि आपल्याला डेरी व्यवसाय बद्दल कल्पना समजलेले आहे. आज आपण डेरी व्यवसाय कसा करायचा याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो व्यवसाय योजना म्हणजे कोणतेही विशिष्ट व्यवसायासाठी एक संपूर्ण ध्येय आणि योजना विकसित करणे होय. तसेच डेरी व्यवसायासाठी कोणकोणते अनुदान आहेत

तसेच सबसिडी आहेत याचा देखील आज आपण तपशीलवार माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न वाया घालवता जाणून घेऊया दूध डेअरी व्यवसाय माहिती.

दूध डेअरी व्यवसाय माहिती Milk Dairy Business Information in Marathi

मित्रांनो, डेअरी व्यवसाय हा आजकालच्या काळामध्ये खूपच ट्रेंडिंग मध्ये चालणारा व्यवसाय आहे.

1) शेड

ज्या ठिकाणी आपली जमीन आहे त्या ठिकाणी शेतामध्ये किंवा घराशेजारी शेड बांधणे खूपच गरजेचे असते. जेणेकरून गुरांना चारापाणी वेळेवर भेटेल.

2) जमीन

मित्रांनो, आपल्याकडे जर शेतजमीन असेल तर गुरांसाठी चारा उत्पन्न करण्यासाठी आपण जमीन राखीव ठेवली पाहिजे. जेणेकरून जनावरांना चांगला चारा भेटेल साधारणपणे दहा ते अकरा गाईंसाठी एक एकर जमीन पुरेशी आहे.

3) गुरांच्या जाती आणि लसीकरण

मित्रांनो, अधिक दुधासाठी गुरांच्या जाती चांगल्या प्रकारे निवडणे खूपच गरजेचे आहे. गुरांच्या रोग नियंत्रणासाठी तसेच त्यांचे आरोग्याचे रक्षण करण्यासाठी लसीकरणाचे योग्य वेळापत्रक पाहणे देखील आवश्यक आहे.

दूध डेअरी व्यवसायाचे फायदे Advantages of Milk Dairy Business Information in Marathi

1) मित्रांनो, दूध व्यवसाय मध्ये दुसऱ्या व्यवसायापेक्षा दूध व्यवसाय मध्ये सुरुवातीला कमी गुंतवणूक लागत असते.

2) मित्रांनो, जगामध्ये दुधाची आणि दूध उत्पादनाची मागणी कधीही कमी होणार नाही कारण शाकाहारी आणि मांसाहारी लोकांना देखील दुधाची गरज लागत असते.

3) मित्रांनो, आपण दूध उत्पादन व्यवसाय सुरू केल्यानंतर आपल्याला त्या व्यवसायाची मार्केटिंगची गरज लागणार नाही कारण हा एक पारंपारिक व्यवसाय आहे म्हणूनच आपण दूध उत्पादने सहजपणे विकू शकतो.

4) दूध व्यवसाय हा पर्यावरण पूरक असा असणारा व्यवसाय आहे.

5) यांत्रिकीकरणाद्वारे दूध उत्पादन वाढवली जाऊ शकते.

6) मित्रांनो, आपण जर दूध व्यवसायामध्ये योग्य नियोजन आणि व्यवस्थापन केले तर आपल्याला जास्तीत जास्त नफा मिळेल आणि आपल्याला उत्पन्नाचे उत्तम स्रोत देखील मिळत राहतील.

दूध व्यवसाय सुरू करण्यासाठी दूध कुठून मिळेल

मित्रांनो, आपण जर दूध डेरीचे दुकान उघडण्याचा विचार करत असाल तर आपल्याला ही समस्या सर्वप्रथम मिळत राहील दूध डेरी साठी दूध कुठून आणावे हे आपल्याला सर्वप्रथम समस्या डोळ्यासमोर येते.

मित्रांनो आपण ज्या गावांमध्ये राहतो त्या गावांमध्ये आपण दूध डेरी व्यवसाय करतो की शहरामध्ये करतो याचा देखील सर्वप्रथम आपण विचार करणे गरजेचे आहे.

मित्रांनो दूध नेहमीच गावांमधून येत असते जे गावांमध्ये दूध उत्पादन करत आहेत त्यांच्याशी आपल्याला बोलावे लागेल यावरून ते तुम्हाला दूध द्यायला तयार होतील कारण दुधाला विकण्यासाठी इतर ठिकाणी त्यांना जावे लागणार नाही.

दुधाची क्वालिटी चेक करण्यासाठी फॅट मशीन खरेदी केले पाहिजे

मित्रांनो, आपण दूध विकत घेण्यासाठी दूध वाल्यांशी बोलला आहात पण तुम्हाला एक समस्या येत आहे की दुधापासून दूध कोणत्या दराने खरेदी करायचे, तसेच दुधाची क्वालिटी कशी चेक करायची यासाठी आपले आपण फॅट मशीन खरेदी करावी लागते.

फॅट मशीनद्वारे आपण दुधाची किंमत निश्चित करू शकतो. फॅट मशीनद्वारे दुधामध्ये पाणी किती मिसळले आहे हे देखील आपल्याला लगेच कळून जाते.

कुलर मशीन खरेदी करणे

मित्रांनो, दूध खरेदी केल्यानंतर ते साठवून ठेवण्यासाठी योग्य सोय असावी यासाठी आपल्याला थंड वातावरण शोधावी लागते. परंतु अशी कोणतीच जागा नाही या कारणासाठी तुम्हाला कूलर खरेदी करावा लागतो. कूलर सेकंड हॅन्ड देखील बाजारामध्ये मिळतात.

दूध डेरी व्यवसाय मध्ये किती गुंतवणूक करावी लागते

मित्रांनो, दूध डेरी व्यवसाय मध्ये असणारे गुंतवणूक पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे. मित्रांनो तुम्हाला हवे असल्यास तुम्ही या व्यवसायामधून 15 लाख रुपये देखील गुंतवणूक शकता करू शकता. तसेच तुम्हाला जर या व्यवसायात दोन लाख रुपये गुंतवणूक करून देखील हा व्यवसाय सुरू करू शकता.

दूध व्यवसाय सुरू करण्यासाठी परवाना काय लागत असतो

मित्रांनो, आपण जर दूध व्यवसाय सुरू करत असाल तर आपल्याला दूध व्यवसायासाठी परवाना आवश्यक लागत असतो. भारतीय अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरणाकडून डेरी नोंदणी फॉर्म भरून उपलब्ध करून आपण याचा परवाना घेऊ शकता.

डेअरी व्यवसायामध्ये प्रॉफिट किती राहते

मित्रांनो, दूध व्यवसाय बद्दल नफ्याबद्दल पाहिजे तर दूध व्यवसाय मध्ये वीस ते तीस टक्के नफा राहत असतो. जर तुमच्याकडे काहीतरी वेगळे करण्याचे कला असेल तर तुम्ही या व्यवसायामध्ये 35 टक्के पर्यंत नफा घेऊ शकता. त्यामुळे दूध व्यवसाय नफा हा खूप जास्त प्रमाणामध्ये आहे.

दूध डेअरी व्यवसाय माहिती

दूध डेरी व्यवसाय मध्ये नफा कसा वाढवायचा

1) मित्रांनो, आपण जर फॅट मशीन खरेदी केली तर आपल्याला या मशीनद्वारे कमी किमतीमध्ये उच्च दर्जाचे दूध मिळत असते.

2) ग्राहक नेहमी सवलतींसाठी भुकेलेले असतात त्यामुळे ग्राहकांना नेहमी ऑफर दिली पाहिजे.

3) मित्रांनो, तुमच्या दुकानासाठी योग्य जागा निवडा.

4) दूध दुकानांमध्ये सकाळ-संध्याकाळ अधिक मागणी असते. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी दुकान लवकर उघडा.

5) मित्रांनो नेहमी महिला ग्राहकांशी संपर्क वाढवा ज्यामुळे आपल्याला दूध व्यवसाय मध्ये अधिक फायदा होईल.

6) नेहमी आपल्या भागातील हॉटेल किंवा मिठाईच्या दुकानांशी संपर्क ठेवा जेणेकरून तुमचे नेहमी दूध विक्री चालू राहील आणि जास्त प्रमाणामध्ये नफा मिळत राहील.

7) मित्रांनो, तुम्ही नेहमी दुधाची गुणवत्ता चांगली ठेवा दुधाची गुणवत्ता चांगले असेल तर त्यामुळे नफा देखील चांगला होईल.

8) मित्रांनो, तुम्ही तुमच्या ग्राहकाला कधीही निराश करू नका.

डेरी व्यवसायासाठी नाबार्ड कर्ज योजना काय आहे NABARD Loan Scheme for Dairy Business?

नाबार्ड योजनेमध्ये डेरी फार्म उघडण्यासाठी सात लाखावर ते 30 टक्के सबसिडी दिली जाते. मित्रांनो आपण ग्रामीण बँकांना भेट देऊन या योजनेसंदर्भात माहिती घेऊ शकतात.

तसेच आपल्याला नाबार्ड कर्ज योजना याबद्दल माहिती नसेल तर आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की विचारा. आम्ही आपल्यासाठी नाबार्ड दूध डेरी याबद्दल जी योजना आहे. त्याची संपूर्णपणे माहिती आपल्यासाठी घेऊन येऊ.

निष्कर्ष

मित्रांनो, वरील प्रमाणे दिलेल्या दूध डेरी व्यवसाय माहिती याबद्दल आपल्याला माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे. मित्रांनो आपण जर दूध डेरी व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर वरील प्रमाणे दिलेली माहिती आपल्याला खूपच उपयोगी पडणार आहे.

तसेच मित्रांनो आपल्याला जर नाबार्ड भारत कर्ज योजना याबद्दल माहिती नसेल तर आपण कमेंट द्वारे आम्हाला नक्की कळवा. आम्ही आपल्यासाठी नाबार्ड कर्ज योजना दूध डेअरी सुरू करण्यासाठी काय आहे याबद्दल नक्कीच माहिती अगदी सविस्तर देऊ.

तसेच मित्रांनो आपल्या दूध डेरी व्यवसाय माहिती याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि वरील प्रमाणे दिलेली माहिती आपण आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करण्यास कदापि विसरू नका जेणेकरून ते देखील उद्योजक बनतील.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending