Connect with us

Information

Mpsc Exam Information in Marathi | Mpsc परीक्षेची माहिती मराठीत, Mpsc चा अभ्यासक्रम, Mpsc चा full form

Published

on

Mpsc exam information in Marathi

Mpsc exam information in Marathi: महाराष्ट्र लोकसेवा आयोग हा एक संविधानात्मक आयोगातून राज्यांमधील अनेक भरती प्रक्रिया या आयोगाच्या माध्यमातून घेतल्या जातात.

मित्रांनो आपल्याला जर महाराष्ट्र शासनाच्या उच्च पदावर कार्य करायचे असेल तसेच सेवा द्यायचे असेल तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही परीक्षा पण नक्कीच पास केली पाहिजे.

आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा याबद्दल सर्व माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया एमपीएससी एक्झाम इन्फॉर्मशन.

Mpsc Exam information in Marathi

मित्रांनो, देशातील असणारी कोणत्याही राज्याची राज्यव्यवस्था सुरळीत चालण्यासाठी महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे सक्षम असणारे प्रशासन. त्याकरिता आपल्याला देशात केंद्र सरकारने तसेच राष्ट्रीय पातळीवर प्रशासकीय अधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना केलेली आहे.

त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारने राज्य पातळीवर प्रशासकीय अधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना केलेली आहे. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली.

Mpsc म्हणजे काय ?

मित्रांनो, एमपीसी म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशन यालाच मराठी मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग असे देखील बोलले जाते. मित्रांनो हे एक महाराष्ट्र शासनाची एक संस्था आहे जी महाराष्ट्रात शासनातील उच्च पदांसाठी परीक्षा आयोजित करत असते.

व विविध विभागातील रिक्त पदांवर अधिकाऱ्यांची नेमणूक देखील करत असते. महाराष्ट्र शासनातील प्रशासकीय अधिकाऱ्यांची निवड करणे हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे मुख्य कार्य आहे.

Mpsc मार्फत कोणत्या पदांसाठी परीक्षा घेतल्या जातात ?

Mpsc exam information in Marathi

1) तहसीलदार

2) उपजिल्हाधिकारी

3) पोलीस उप अधीक्षक

4) विक्रीकर सहाय्यक आयुक्त

5) नायब तहसीलदार

6) प्रादेशिक परिवहन अधिकारी

7) पोलीस उपनिरीक्षक

8) उपनिबंधक सहकारी संस्था

9) उपमुख्य कार्यकारी अधिकारी

10) गटविकास अधिकारी

यांसारखी पदेही महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतली जातात. वरील पदांकरिता राज्यसेवा पूर्व परीक्षा घेतली जाते. तसेच मुख्य परीक्षा घेतली जाते.

यानंतर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मुलाखती करिता बोलावण्यात येत असते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगासाठी जर विद्यार्थ्यांना अर्ज करायचा असेल तर ते ऑनलाईन देखील करू शकतात.

Mpsc चा अभ्यासक्रम काय आहे ?

मित्रांनो, एमपीएससी म्हणजे काय हे तुम्हाला आधीच माहिती आहे. आता आपण एमपीएससीच्या अभ्यासक्रमाविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

जेणेकरून भविष्यामध्ये तुम्ही जर एमपीएससीची परीक्षा देण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी अभ्यासक्रम माहिती असणे खूपच गरजेचे आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये मुख्य परीक्षेसाठी सहा पेपर असतात. दोन पेपर भाषेचे असतात इंग्रजी आणि मराठी हे असतात. तर चार पेपर हे सामान्य अध्ययनाच्या असतात याची माहिती जाणून घेऊया.

1) भारतीय संविधान आणि राजकारण.

2) इतिहास आणि भूगोल महाराष्ट्राच्या संदर्भात

3) अर्थव्यवस्था आणि नियोजन विकास तसेच कृषी आणि विज्ञान तंत्रज्ञानाचे विकासाचे अर्थशास्त्र.

4) मानव संसाधन विकास आणि मानवी हक्क

Mpsc चा full form काय आहे ?

मित्रांनो एमपीएससी चा फुल फॉर्म हा इंग्रजी तसेच मराठी आणि हिंदी भाषेमध्ये एकच आहे. इंग्रजीमध्ये महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशन तसेच मराठीमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग असा एमपीएससीचा फुल फॉर्म होत असतो.

Mpsc साठी पात्रता काय आहे ?

1) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा उमेदवार हा भारतीय नागरिक असणे खूपच गरजेचे आहे.

2) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देत असणाऱ्या उमेदवाराला मराठी भाषा बोलायला आणि लिहिता येत असावी.

3) उमेदवाराने आवश्यक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

4) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देत असलेल्या उमेदवारांचे घर हे महाराष्ट्र मध्ये असणे आवश्यक आहे.

5) एमपीसी परीक्षा देणाऱ्या उमेदवाराकडे मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी असणे गरजेचे आहे.

6) उमेदवाराला मराठी भाषा येणे गरजेचे आहे.

Mpsc exam information in Marathi

Mpsc साठी वयोमर्यादा ?

1) mpsc जास्तीत जास्त वयोमर्यादा ही सर्वसाधारण श्रेणीसाठी 38 वर्ष आहे.

2) एमपीएससी साठी किमान वयोमर्यादा 19 वर्ष आहे.

महाराष्ट्र सरकार हे एमपीसी च्या उमेदवाराला वयामध्ये सवलत देत असते जी उमेदवाराच्या श्रेणीनुसार बदलत असते.

Mpsc चा अभ्यास चांगल्या पद्धतीने कसा करता येतो ?

मित्रांनो, आपल्याला एमपीएससीचा अभ्यास कसा करायचा हे देखील माहीतच असणे खूपच आवश्यक आहे. कारण अनेकांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा द्यायची असते परंतु त्याचे तयारी कशी करावी हे माहीत नसते.

आज आपण एमपीएससीचा अभ्यास कसा करावा याची माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो एमपीएससी ही भारत देशामधील सर्वाधिक मागणी असलेल्या परीक्षण पैकी एक असल्यामुळे विद्यार्थ्यांना कोणते प्रतिष्ठित संस्थेतून एमपीएससी शिकवणी घेणे खूपच आवश्यक आहे.

परीक्षेमध्ये इंग्रजी आणि मराठी यांसारखे आवश्यक पेपरचा समावेश असल्यामुळे उमेदवारांनी त्यांचे लेखन कौशल्य वाढवले पाहिजे. दोन्ही प्रश्नपत्रिकांमध्ये व्यक्तिनिष्ठ प्रश्न देखील विचारले जातात.

तुमच्याकडे सुप्रसिद्ध लेखकांची पुस्तके असणे खूपच काळाची गरज आहे. तसेच मागील वर्षाच्या असणाऱ्या प्रश्नपत्रिका सामाविष्ट करणे तसेच त्या प्रश्नपत्रिका सोडवणे हे देखील गरजेचे आहे.

एमपीएससी साठी किती विषय असतात ?

मित्रांनो एमपीएससी साठी मुख्य परीक्षांमध्ये एकूण 26 वैकल्पित विषय असतात. प्रत्येक वैकल्प विषयाचे दोन पेपर असतात त्यात अडीचशे गुण असतात.

Mpsc परीक्षेची तयारी करण्यासाठी किती वेळ लागतो ?

मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा ही खूपच स्पर्धात्मक परीक्षा असल्यामुळे या परीक्षेची तयारी करण्यासाठी किमान आठ ते नऊ महिने लागत असतात.

Mpsc आणि Upsc परीक्षेची तयारी एकच वेळी करू शकतो का ?

होय मित्रांनो तुम्ही एकाच वेळी दोन्ही परीक्षा देऊ शकता.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा ही वर्षातून किती वेळा होते ?

महाराष्ट्र लोकसेवा आयोग हे तीन परीक्षा घेत असते प्रत्येक परीक्षा वर्षातून एकदा होत असते.

निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला जर प्रशासकीय सेवेमध्ये जायचे असेल तर आपल्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच mpsc परीक्षा खूपच महत्त्वाचे आहे.

मित्रांनो आपल्याला जर महाराष्ट्र लोकसेवा परीक्षेमध्ये उत्तीर्ण व्हायचे असेल तर वरील प्रमाणे दिलेली माहिती आपल्यासाठी खूपच उपयोगाची पडणार आहे.

मित्रांनो आपल्याला वरील प्रमाणे दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच आपल्याला आणखी कोणती माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की विचारा.

तसेच मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोग याबद्दल दिलेली माहिती आपण आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending