Connect with us

Information

मुलींसाठी पोलीस भरती माहिती। Girls Police Recruitment Details in Marathi, महिला पोलीस भरती माहिती

Published

on

मुलींसाठी पोलीस भरती माहिती

मुलींसाठी पोलीस भरती माहिती: मित्रांनो, आजकालच्या काळामध्ये मुलींसाठी पोलीस भरती हा खूपच गाजलेला असणारा विषय आहे. मित्रांनो आजकालच्या काळामध्ये तरुणींना या क्षेत्रांमध्ये करिअर करायचे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्यांना आपली सेवा द्यायची देखील आहे.

आपण आज या लेखांमध्ये मुलींसाठी पोलीस भरती संबंधी सर्व माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो सर्वप्रथम पहिली गोष्ट म्हणजे मुलींसाठी बारावी पास असणे खूपच गरजेचे आहे.

तसेच उमेदवारांनी वयोमर्यादा देखील ओलांडू नये हे देखील खूपच गरजेचे आहे. चला तर मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घेऊया पोलीस भरती मुलींसाठी सर्व माहिती.

Girls Police Recruitment Information in Marathi (महिला पोलीस) मुलींसाठी पोलीस भरती माहिती

मित्रांनो, मुलींसाठी पोलीस भरतीचा अभ्यासक्रम हा नेहमी खूपच विस्तृत आहे. आणि त्यामध्ये सामान्य ज्ञान, गणित, विज्ञान, भूगोल, इतिहास आणि राजकीय विषयांचा देखील समावेश आहे.

मित्रांनो आजकालच्या काळामध्ये उमेदवारांना दैनंदिन वृत्त मानपत्रे आणि राजकीय बातम्यांचे किमान ज्ञान असणे खूपच गरजेचे आहे.

मित्रांनो, भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांना लेखी चाचणीमध्ये शारीरिक चाचणी त्याचप्रमाणे वैद्यकीय चाचणी आणि नंतर अंतिम निवड प्रक्रिया पार पाडावी लागत असते.

मित्रांनो शारीरिक चाचणीमध्ये उमेदवाराचे शारीरिक कार्यक्षमता आणि सहनशक्तीचे मूल्यांकन केले जाते धावणे लांब उडी वजन उचलणे अशाप्रकारे अनेक प्रकारचे मूल्यांकन केले जाते.

वैद्यकीय चाचणीमध्ये उमेदवाराच्या अंतर्गत आणि बाह्य आरोग्य स्थितीचे मूल्यांकन केले जाते. तसेच यामध्ये उमेदवारांची आतडे, किडनी, डोळे, दात, श्वसन संस्था आणि मेंदू इत्यादींची अंतर्गत आणि बाह्य आरोग्य स्थिती देखील तपासली जाते.

मित्रांनो, अंतिम निवड प्रक्रियेमध्ये उमेदवारांचे मूल्यांकन त्यांच्या लेखीच्या शारीरिक चाचणी आणि वैद्यकीय चाचणी मधील गुणांच्या आधारे केले जाते. यामध्ये सामान्य ज्ञान सामाजिक संवाद आणि उमेदवारांची वैयक्तिक वाढ यांसारखे देखील गुणांचे मूल्यांकन केले जाते.

मुलींसाठी पोलीस भरती माहिती

महिला पोलीस भरतीसाठी ग्राउंड

1) गोळा फेक(चार किलोचा गोळा)

सहा मीटर किंवा त्यापेक्षा कमी 15 गुण साडेचार मीटर ते पाच मीटर पाच गुण चार मीटर ते साडेचार मीटर पेक्षा कमी तीन गुण तसेच चार मीटर पेक्षा कमी गोळा पडल्यास काहीच गुण मिळत नाहीत

100 मीटर धावणे महिला पोलीस भरती ग्राउंड

चौदा सेकंद तसेच त्यापेक्षा कमी 15 गुण १४ ते १५ सेकंद बारा गुण पंधरा ते सोळा सेकंद दहा गुण १६ ते १७ सेकंद आठ गुण 17 ते 18 सेकंद सहा गुण १८ ते १९ सेकंद चार गुण आणि 19 ते 20 सेकंद वेळ लागल्यास केवळ एक गुण मिळेल

महिला पोलीस भरती कागदपत्रे

1) बारावीचे गुणपत्रिका व प्रमाणपत्र लागत असते.

2) डोमासाईल प्रमाणपत्र लागत असते.

3) शाळा सोडल्याचा दाखला लागत असतो.

4) आधार लागत असते.

5) जातीचा दाखला लागत असतो.

6) लग्न झालेले असल्यास नावाचे गॅझेट कॉपी लागत असते.

7) नॉन क्रिमिनल दाखला लागत असतो.

8) आयकार्ड साईज फोटो लागत असतात.

9) चारित्र्य प्रमाणपत्र प्रमाणपत्र लागत असते.

मुलींसाठी पोलीस भरती माहिती

महिला पोलीस भरती पात्रता काय आहे

1) महिला पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता

मित्रांनो, पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही विशिष्ट पदावर असणाऱ्या तसेच पोलीस विभाग किंवा भरती आयोजित करणाऱ्या संस्थेनुसार नेहमी बदलत असते.

साधारणपणे महाराष्ट्र मध्ये पोलीस भरतीसाठी आवश्यक असलेले शैक्षणिक पात्रता ही बारावी कमीत कमी बारावी लागत असते.

2) महिला पोलीस भरतीसाठी शारीरिक पात्रता

उंची

उंची ही कमीत कमी 155 सेंटीमीटर असावी लागते.

वजन

मित्रांनो, वजन हे उमेदवाराच्या शारीरिक तसेच वैद्यकीय मानांकन असावे लागते सामान्य पात्रता आवश्यकता मध्ये नमूद केलेली कोणतेही विशिष्ट वजन निकष नसतात.

शारीरिक तंदुरुस्ती

मित्रांनो, भरती प्रक्रिया दरम्यान धावणे लांब उडी विविध शारीरिक कार्य करण्यासाठी उमेदवारांना चांगली शारीरिक क्षमता असणे खूपच गरजेचे असते.

महिला पोलीस भरतीसाठी अभ्यासक्रम काय आहे

  • सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी
  • गणित
  • इंग्रजी भाषा आणि आकलन
  • मराठी भाषा राज्यस्तरीय परीक्षांसाठी लागते

निष्कर्ष

मित्रांनो, वरील प्रमाणे दिली महिला पोलीस भरतीसाठी लागणारी कागदपत्रे तसेच महिला पोलीस भरती माहिती याबद्दल दिलेली माहिती आपल्याला नक्कीच आवडलेली असेल असे आम्हाला आशा आहे.

मित्रांनो आपल्याला वरील प्रमाणे दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच आपल्या आणखी कोणती माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच महिला पोलीस भरती याबद्दल दिलेली माहिती आपण आपले मित्र परिवार सोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending