Connect with us

Information

Nmms Exam Information in Marathi | Nmms परीक्षेची माहिती मराठीत

Published

on

Nmms exam information in Marathi

Nmms exam information in Marathi: नमस्कार मित्रांनो आज आपण अशा परीक्षा बद्दल जाणून घेणार आहोत जी विद्यार्थ्यांना आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळवण्याच्या दृष्टीने त्यांना नेहमी आर्थिक सहाय्य करत असते.

अशा परीक्षा बद्दल आज आपण सर्व माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो कोणता वेळ न वाया घालवता जाणून घेऊया एन एम एम एस परीक्षा बद्दल सर्व माहिती एकाच ठिकाणी.

Nmms Exam information in Marathi 

मित्रांनो, nmms ही राष्ट्रीय स्तरावरील असणारे शालेय विद्यार्थ्यांसाठी आठवी मध्ये शिकत असलेल्या मुलांसाठी केंद्र शासनाने सुरू केलेली शिष्यवृत्ती योजना आहे. या योजनेला मराठी मध्ये आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना परीक्षा असे देखील बोलले जाते.

Nmms परीक्षेचा उद्देश काय आहे आणि शिष्यवृत्ती परीक्षेचे महत्त्व काय आहे

मित्रांनो, या परीक्षेचा उद्देश म्हणजे आठवीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील हुशार विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना नेहमी सर्वोत्तम शिक्षण मिळवण्याच्या दृष्टीने त्यांना हार्दिक साहाय्य करणे खूपच गरजेचे असते.

विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक स्तरांपर्यंत शिक्षण घेण्यास मदत होईल आणि आर्थिक दुर्बलतेमुळे प्रज्ञावंत विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिक स्थळांपर्यंत होणारे गळती रोखावे हे या परीक्षेचे खूपच महत्त्वपूर्ण असे असणारे उद्दिष्ट आहे.

Nmms शिष्यवृत्ती किती मिळत असते

मित्रांनो, या योजनेमध्ये शिष्यवृत्ती पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांसाठी पाच वर्षासाठी दरमहा १००० व वार्षिक 12 हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना नववी, दहावी, अकरावी, बारावी मध्ये प्रथम संधीमध्ये पास होणे आवश्यक असते. तसेच दहावी मध्ये कमीत कमी 60 टक्के गुण मिळणे आवश्यक असते. विद्यार्थ्यांसाठी किमान 55 टक्के गुणाची आवश्यकता असते.

Nmms परीक्षेचे आयोजन कोण करत असते

मानव संसाधन विकास मंत्रालयाद्वारे आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती परीक्षा सुरू केलेली आहे. महाराष्ट्र राज्यासाठी ही परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत जिल्ह्यातील विविध केंद्रांवर परीक्षेचे आयोजन केले जाते.

Nmms शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आवश्यक पात्रता काय आहे ?

या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्यातील असणाऱ्या कोणत्याही शासकीय तसेच शासनमान्य अनुदानित तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये शिकत असलेले आठवी शिकत असलेले विद्यार्थी व विद्यार्थिनी या परीक्षेसाठी पात्र असतात.

Nmms exam information in Marathi

Nmms परीक्षेसाठी कोणते विद्यार्थी अपात्र असतात ?

1) केंद्रीय विद्यालय मध्ये शिकत असणारे विद्यार्थी

2) जवाहर नवोदय विद्यालय मध्ये शिकणारे विद्यार्थी

3) विनाअनुदानित शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी

4) सैनिकी शाळेमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी

5) शासकीय वस्तीगृहामध्ये भोजन व्यवस्था तसेच शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी यासाठी अपात्र असतात

Nmms शिष्यवृत्ती परीक्षेसाठी लागणारी कागदपत्रे

1) विद्यार्थ्यांच्या वयाचा पुरावा

2) आधार कार्ड

3) आठवीची गुणपत्रिका

4) शाळेतून बोनाफाईड विद्यार्थी प्रमाणपत्र

5) कायमस्वरूपी वास्तव्याचा पुरावा

6) बँक खाते तपशील

7) शैक्षणिक कागदपत्रे

Nmms परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची निवड कशी केली जाते

मित्रांनो, विद्यार्थ्यांची निवड ही लेखी परीक्षा मधून करण्यात येत असते. संबंधित लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे राज्याने निश्चित केलेल्या मागासवर्गीयांसाठीच्या आरक्षणा नुसार विद्यार्थ्यांची निवड करण्यात येत असते.

Nmms परीक्षेसाठी अभ्यासक्रम काय असतो

Nmms परीक्षेसाठी दोन विषय असतात यामध्ये बौद्धिक क्षमता चाचणी मित्रांनो ही एक मानसशास्त्रीय चाचणी असून त्यामध्ये कार्यभाव विश्लेषण संकलन इत्यादी संकल्पना वर आधारित ९० बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतात.

दुसरी शालेय क्षमता चाचणी ही सामान्यपणे येतो आठवीपर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित चाचणी असते. यामध्ये सामान्य विज्ञान समाजशास्त्र गणित असे तीन विषय असतात या तीन विषयांचे एकूण 90 प्रश्न सोडवायचे असतात.

Nmms Exam information in Marathi

Nmms परीक्षेसाठी फायनल विद्यार्थ्यांची निवड कशा प्रकारे केली जाते

मित्रांनो, विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या उत्तर पत्रिकांची तपासणी ही संगणकामार्फत करण्यात येत असते. उत्तर पत्रिकांचे मूल्यांकन करत असताना निगेटिव्ह मार्किंग पद्धतीचा अवलंब केला जात नाही. खबरदारीचे सर्व उपाययोजनांचा याचा विचार करून बिनचूक गुण यादी तयार करण्यात येत असते.

त्यामध्ये अनुसूचित जातींच्या तसेच अनुसूचित जमातींच्या विमुक्त व भटक्या जमाती इतर मागासवर्ग विशेष मागासवर्गीय दिव्यांग विद्यार्थी तसेच आरक्षणातील केंद्र शासनाने निश्चित केलेल्या कोट्यानुसार जिल्ह्यांनिहाय्यक सर्वांगनिहाय विद्यार्थ्यांची निवड करण्यात येत असते.

निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला वरील प्रमाणे दिलेली माहिती nmms परीक्षेसाठी नक्कीच उपयोगी पडणार आहे. तसेच आपल्याला वरील प्रमाणे दिलेली माहिती ही नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे. मित्रांनो आपल्याला वरील प्रमाणे दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच मित्रांनो आपल्याला कोणतेही आणखी माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच एन एम एम एस या परीक्षेबद्दल दिलेली माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

Trending