Connect with us

business ideas

रोपवाटिका माहिती Nursery Information in Marathi

Published

on

रोपवाटिका माहिती : काय मित्रांनो आपल्याला रोपवाटिका उद्योग सुरू करायचा आहे आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत रोपवाटिका माहिती. मित्रांनो आजकालच्या काळामध्ये रोपवाटिकेची गरज हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे.

त्याचप्रमाणे रोपवाटिका उद्योगांमध्ये संधी देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये येत आहेत. तसेच रोपवाटिकेचे फायदे देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. त्याच प्रमाणे आपल्या भारत देशामध्ये तसेच अनेक इतर देशांमध्ये रोपवाटिकेचे प्रकार देखील विविध प्रकार आहेत.

आज आपण रोपवाटिका ही कोणत्या पद्धतीने आपण सुरू करू शकतो. तसेच रोपवाटिका सुरू केल्याने आपल्याला कोण कोणते फायदे होतात हे आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया Nursery Information in Marathi याबद्दल अगदी सविस्तर रित्या.

रोपवाटिका माहिती Nursery Information in Marathi

नर्सरी (रोपवाटिका) म्हणजे काय

नर्सरी म्हणजे असे ठिकाण ज्या ठिकाणी निरोगी आणि उच्च दर्जाच्या रोपांची लागवड केली जाते. तसेच त्यामध्ये फळे-भाजीपाला या रोपांची निर्मिती केली जाते काळजीपूर्वक ती रोपे वाढवली जातात.

आणि ती रोपे लागवड योग्य केली जातात 15 ते 45 दिवसांमध्ये ही रोपे लागवडीयोग्य केली जातात तसेच त्या रोपांना शेतामध्ये नेऊन त्या ठिकाणी त्या रोपांची लागवड केली जाते यालाच नर्सरी (रोपवाटिका) असे म्हणतात.

रोपवाटिकेचे काय महत्त्व आहे

मित्रांनो फलोत्पादन म्हणजे निश्चित प्रमाणे व शाश्‍वत उत्पादन देणारे क्षेत्र आहे . म्हणूनच शेतकऱ्यांचा दृष्टिकोन हा या व्यवसायाकडे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आहे. कोरडवाहू क्षेत्रात तृणधान्य पिकांच्या उत्पादनात याची शाश्वती राहत नाही.

अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना हमखास उत्पादन मिळवून देण्याच्या त्यांच्या आर्थिक धैर्य निर्माण करणारे फलोत्पादन हे यामुळे शक्य झालेले आहे.

महाराष्ट्र मधील असणारे विविध प्रकारच्या जमिनी व हवामानाची विविधता आहे यामुळे फळबागांसाठी अत्यंत पोषक वातावरण आजकालच्या काळामध्ये निर्माण झालेले आहे.

ज्या भागामध्ये महाराष्ट्र मध्ये तसेच भारत देशामध्ये ज्या भागांमध्ये फळपिकांना वाव आहे त्या भागात या फळपिकांच्या रोपवाटीकांची निर्माण करणे आजकालच्या काळामध्ये अत्यंत गरजेचे बनले आहे. मित्रांनो आजकालच्या काळामध्ये फळबागा या यशस्वी सगळे जातिवंत कलमे आणि रोपे यांच्यात दडलेले आहे.

म्हणूनच विविध प्रकारचे शुद्ध व जातिवंत कलमे रोपवाटिकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे हे आजकालच्या काळामध्ये खूपच महत्त्वाचे असल्याने रोपवाटीका तयार करणे आजकालच्या काळामध्ये खूपच गरजेचे आहे हे देखील रोपवाटिकेचे महत्त्व आहे.

रोपवाटिका माहिती


रोपवाटिकेची सुरुवात कशी करावी

मित्रांनो फळबागांच्या विकासामध्ये रोपवाटिकेचा आजकालच्या काळामध्ये खूपच महत्त्वाचा वाटा असतो. यशस्वीपणे रोपवाटिका उभारण्यासाठी त्याचे योग्य नियोजन आपल्याला करावे लागते. रोपवाटिकेची उभारणी करताना तिचा प्रकार देखील आपण ओळखावा.

सर्वप्रथम तसेच आपण रोपवाटिका कोणत्या ठिकाणी उभारणी करायची आहे या गोष्टीदेखील आजकालच्या काळामध्ये खूपच महत्त्वाचे असतात. प्रथम रोपवाटिका उभारण्याचे अगोदर रोपवाटिकेचे प्रकार आपण निश्चित केले पाहिजेत.

तसेच मित्रांनो शासन मान्यताप्राप्त रोपवाटिका की खाजगी रोपवाटिका तसेच कोणत्या प्रकारची कलमे किंवा रोपे तयार करायचे आहेत हेदेखील आपण सर्वप्रथम ठरवले पाहिजे.

या भागांमध्ये रोपवाटिका सुरू करायचे आहे मित्रांनो आपल्या भागामध्ये भौगोलिक परिस्थितीत पीक पद्धती, दळणवळणाच्या सोयी, कच्चामाल, मजूर यासंबंधी देखील आपण सर्वप्रथम माहिती घेतलेली पाहिजे. तसेच मित्रांनो वरील प्रमाणे सर्व गोष्टीचा आपण सर्वप्रथम व्यवस्थित अभ्यास करणे गरजेचे आहे.

त्याच प्रमाणे आपण आपल्या भागामध्ये असणाऱ्या इतर रोपवाटिका यांचा व्यवस्थित सर्वे करावा. तसेच रोपवाटिका बद्दल असलेले सर्व नियम व ते त्यांच्या मध्ये असणारे आर्थिक गुपिते यांचा बारकाईने अभ्यास करावा. हे मित्रांनो आपण रोपवाटीका सुरुवात करताना काळजी घ्यावी.

रोपवाटिकेमध्ये असणारी गरज व संधी

मित्रांनो रोपवाटिका या व्यवसायामध्ये योग्य जातींची असणारे बी आणून त्याची रोपे योग्य रित्या तयार केले जातात. तसेच त्या रोपांना चांगली किंमत देखील मिळत असते मात्र या रोपांसाठी रोप निर्मिती यांची विश्वासार्हता आजकालच्या काळामध्ये खूपच महत्त्वाचे असते.

विश्वासाहर्ता सातत्यपूर्ण गुणवत्ता मिळवणे आणि टिकवणे आतून येत असते उत्तम दर्जाच्या चांगले पीक आणि उत्तम उत्पादन नेहमी मिळत असते िश्‍वासार्हता असलेल्या रोपवाटिकेतून शेतकरी चार पैसे अधिक देऊन रोपे खरेदी करत असतात

हा देखील मित्रांनो अनुभव आहे. रोपवाटिका चालकांचा अलीकडच्या काळामध्ये फळबाग ला देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मागणी वाढलेले आहे.

तसेच फळबाग खालील क्षेत्रामध्ये देखील खूपच भारत देशामध्ये वाढ झालेले आहे. त्यामुळे आजकाल च्या काळामध्ये नवीन फळझाडांची रोपे बनवणे शक्य आहे.

त्याचप्रमाणे फळझाडांची रोपांना देखील महाराष्ट्रामध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मागण्या आहेत. यामध्ये घरगुती शोभीकरणसाठी करण्यासाठी आणि व्यवसायिक लागवडीची असे दोन प्रकार पडतात यामध्ये दोन्ही चांगल्या संधी आहेत.उलट भाजीपाल्यांच्या रोपं पेक्षा फळांची आणि फुलांची रोपे कलमे रोपे अधिक किमतीने विकली जातात त्यातून अधिक मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होत असतो.

महाराष्ट्र आणि अन्य राज्यातूनदेखील फळबाग लागवडीच्या विविध योजना राज्य सरकार तसेच केंद्र सरकार खूपच मोठ्या प्रमाणामध्ये राबवत असते.

अन्य विविध योजनांमध्ये देखील झाडांचा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये सामावेश असतो. उदाहरणात रोजगार हमी योजना, फळबाग लागवड योजना, वृक्ष लागवड योजना, औषधी वनस्पती वृद्धी योजना, यांसारख्या योजना केंद्र सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने खूपच मोठ्या प्रमाणामध्ये राबवले आहेत.

त्याच प्रमाणे आपण कोणत्या निकषानुसार रोपे बनवणे शक्य आहे हे देखील आपण जाणून घेतले पाहिजे आजकालच्या काळामध्ये रोपवाटिकेला सातत्याने खूपच मोठ्या प्रमाणामध्ये चांगली मागणी आहे.

रोपवाटिका माहिती

रोपवाटिकेचे कोणकोणते फायदे आहेत

मित्रांनो आपण खालील प्रमाणे रोपवाटिकेचे कोणकोणते फायदे आपल्यासाठी आहेत हे जाणून घेणार आहोत.

 • रोपांच्या गुणवत्तेची खात्री नेहमी रोपवाटिकांमध्ये घेता येते.
 • रोपवाटिकेमध्ये दर्जेदार रोपे उपलब्ध होतात, तसेच तयार करता येतात.
 • रोपवाटिकेमध्ये वेळ पैसा व श्रम वाचत असते.
 • कलमे तयार करून त्वरित फळबाग लावता येते.
 • दुर्मिळ कलमे देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होत असतात.
रोपवाटिका माहिती


रोपवाटिकेमध्ये असणारे विविध प्रकार

मित्रांनो आपण खालील प्रमाणे रोपवाटिकेमध्ये असणारे कोणकोणते प्रकार आहेत तसेच रोपवाटिका आपण कोणकोणत्या प्रकारांमध्ये सुरू करू शकतो याची यादी आपण पाहणार आहोत.

 1. कृषी विद्यापीठाच्या असणाऱ्या रोपवाटिका
 2. मान्यताप्राप्त असणाऱ्या संस्थेच्या रोपवाटिका
 3. शासकीय असणारे रोपवाटिका
 4. मान्यताप्राप्त असणाऱ्या तसेच खाजगी रोपवाटिका

रोपवाटिका प्रस्थापित करताना कोणती काळजी घ्यावी

मित्रांनो आपण जर रोपवाटिका सुरू करण्याचा विचार करत असाल तर आपल्याला खालील प्रमाणे दिलेली यादी लक्षात ठेवणे खूपच गरजेचे आहे. आणि याची काळजी देखील घेणे खूपच महत्त्वाचे आहे आपल्याला जर रोपवाटिका व्यवसाय मध्ये यशस्वी व्हायचे असेल तर.

 • रोपवाटिकेचा कालावधी किती आहे हे देखील आपण पाहिले पाहिजे.
 • कोणते प्रकारचे आपण रोपवाटिका प्रस्थापित करणार आहे हे देखील आपण जाणून घेतले पाहिजे.
 • आपण रोपवाटिका सुरू करत असल्यास आपल्याला आवश्यक जमीन आहे का हे देखील आपण जाणून घेतले पाहिजे.
 • कलमे रोपांची संख्या किती आहे हे देखील आपण पाहिले पाहिजे.
 • सिंचनासाठी आपल्याकडे पुरेसे पाणी आहे का हेदेखील आपण जाणून घेतले पाहिजे.
 • कुशल मजुरांची उपलब्धता आपल्याकडे आहे का हेदेखील आपण जाणून घेतले पाहिजे.
 • कलमे रोपे तयार करण्यासाठी आपल्याकडे आवश्यक निवारा आहे का हे देखील आपण पाहिले पाहिजे.
 • रोपे वाढवण्यासाठी आपल्याकडे जागा उपलब्ध आहे का हे देखील आपण जाणून घेतले पाहिजे.

रोपवाटिकेचे प्रकार कोणकोणते आहेत

कोरडवाहू रोपवाटिका

पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या रोपवाटिकेला कोरडवाहू रोपवाटिका असे म्हणतात यावरच रोपांचे उत्पादन व संगोपन करण्यात येते.

ओलिताखालील ची रोपवाटिका

ज्या ठिकाणी बारमाही पाणी उपलब्ध असते त्या ठिकाणी ओलिताखाली ची रोपवाटिका असे म्हणतात तसेच यावर रोपांचे व कलमांचे उत्पादन व संगोपन केले जाते.

पिकांच्या वर्गीकरणानुसार असणारे रोपवाटिकेचे प्रकार

 • भाजीपाल्याची रोपवाटिका
 • फळझाडांची रोपवाटिका
 • शेती पिकांची रोपवाटिका
 • औषधी वनस्पतींची रोपवाटिका
 • फक्त कलमांची रोपवाटिका
 • फक्त रोपांची रोपवाटिका

रोपांची असणारी नावे

 1. सर्पगंधा
 2. सोनचाफा
 3. शिवन
 4. सोनामुखी
 5. मालकांगणी
 6. जेष्ठमध
 7. पिंपळी
 8. गुळवेल
 9. खाजकुहिली
 10. शतावरी
 11. कोरफड
 12. सफेद मुसळी
 13. तुळस
 14. काळमेघ
 15. आश्वगंधा
 16. बेल

रोपवाटिका माहिती Nursery Information in Marathi Conclusion

मित्रांनो आपल्याला वरील प्रमाणे दिलेली रोपवाटिकेची माहिती आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपण जर रोपवाटिका सुरू करण्याचा विचार करत असाल तर ही माहिती खूपच उपयोगी आपल्याला पडणार आहेत. त्याप्रमाणे आजकालच्या काळामध्ये रोपवाटिकेमध्ये असणारी गरज व रोपवाटिका व्यवसाय मध्ये असणारे संधी देखील खूपच महत्वाची आणि निर्माण झालेले आहेत.

त्याचप्रमाणे आम्ही आपल्यासाठी रोपवाटिकेचे फायदे कोणकोणते आहेत हे देखील आम्ही वरील प्रमाणे आपल्याला सांगितलेले आहेत. त्याचप्रमाणे रोपवाटिकेचे प्रकार देखील आपल्याला वरील प्रमाणे सांगितले तसेच रोपांची नावे देखील आम्ही आपल्याला सांगितलेली आहेत.

मित्रांनो Nursery Information in Marathi वरील प्रमाणे दिलेली माहिती आपल्याला कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आम्ही आपल्यासाठी नेहमी नवनवीन माहिती घेऊन येत असतो.

Trending