Connect with us

business ideas

रोपवाटिका व्यवस्थापन कसे करावे | Nursery Management in Marathi, रोपवाटिका माहिती

Published

on

रोपवाटिका व्यवस्थापन कसे करावे

रोपवाटिका व्यवस्थापन कसे करावे: मित्रांनो आज कालच्या काळामध्ये रोपवाटिका व्यवस्थापन करणे खूपच महत्वाचे झालेले आहे. आज आपण रोपवाटिका व्यवस्थापन कशाप्रकारे केले जाते याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो आजकालची रोपवाटिका ही काळाची गरज बनलेली आहे. चला तर आज आपण रोपवाटिकेचे व्यवस्थापन कशाप्रकारे अगदी नियोजनबद्ध केले जाईल याची माहिती जाणून घेऊया.

रोपवाटिकेचे व्यवस्थापन कसे करावे याबद्दलची अगदी सविस्तर माहिती

1) सर्वप्रथम आपण रोपवाटिकेमध्ये रोपे तयार करून मग ती शेतामध्ये लावणे ही पद्धत सध्या केवळ काही प्रकरण मध्येच आपल्याला आढळून येत आहे.

ज्यामध्ये भाज्या, फळे, फुले या पिकांमध्ये अवलंबिली जाते. पण इतरही पिकांमध्ये शेतामध्ये बी पेरण्याऐवजी रोपे लावून शेती करणे आजकालच्या काळामध्ये फायद्याचे ठरेल.

2) मित्रांनो, आपण शेतामध्ये बि न पेरता रोपवाटिकेमध्ये रोपे तयार करून ती रोपे शेतामध्ये लावायचे हा विचार नव्याने आहे. तसेच हे तंत्रज्ञानाचा उपयोग करून त्या ठिकाणी कृषी तज्ञांचा प्रयोग घेणे देखील आपल्यासाठी खूपच फायद्याचे ठरेल.

3) मित्रांनो, भारत देशामध्ये रोपवाटिका व्यवसाय हा फारच जुना असणारा व्यवसाय आहे. रोपवाटिका मधून जातिवंत रोपांची कलमांच्या आणि बियाण्यांची उत्पत्ती होते.

रोपाचे शास्त्र सकट पद्धतीने संगोपन व संवर्धन केल्यास निरनिराळ्या एकत्रित समूह केल्याने रोपवाटिका आपल्यासाठी खूपच फायद्याची ठरेल.

4) मित्रांनो, अलीकडच्या काळामध्ये फुल झाडांचा आणि फळझाडांचा व्यवसाय हा खूपच फायदेशीर होत आहे. त्यामुळे फळझाडांची मागणी देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे.

रोपवाटिकेमध्ये आपण रोपांचे शास्त्र पद्धतीने जर संगोपन केले तर त्या रोपांचे संवर्धन हे निरनिराळ्या पद्धतीने केले तर त्याचा उपयोग हा आपल्यासाठी खूपच चांगल्या प्रकारे होत असतो.

रोपवाटिकेचे असणारे प्रकार कोणते आहेत

1) ओलिताखालची रोपवाटिका

अशा रोपवाटिकांसाठी बारा महिने पाणी उपलब्ध असते त्यावर रोपांचे व कलमांचे उत्पादन व संगोपन केले जाते.

2) कोरडवाहू रोपवाटिका

मित्रांनो, ही रोपवाटिका पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारी रोपवाटिका असते. या रोपवाटिकांमध्ये रोपाचे उत्पादन व संगोपन करण्यात येत असते.

रोपवाटिकेचे महत्त्व काय आहे

1) सावकाश वाढ होणाऱ्या झाडांचे रोपवाटिकेमध्ये चांगले प्रकारे संगोपन करून ती लागवडीसाठी खूपच चांगल्या प्रकारे वापरता येतात.

2) मित्रांनो, रोपवाटिकेमध्ये कमी जागेमध्ये मोठ्या प्रमाणावर रोपे तयार करता येतात.

3) रोपवाटिकेमध्ये रोपांचे संगोपन हे चांगल्या प्रकारे होत असते.

4) रोपवाटिकेमध्ये रोपा वरील किडी व रोगांचे नियंत्रण करणे सोपे असते.

5) रोपवाटिकेमध्ये रोपांना पाणी खते वेळेवर देऊन रोपे चांगले वाढविता येतात.

रोपवाटिकेसाठी जागेची निवड कशी करावी

रोपवाटिका काही वाहतुकीसाठी रोड पासून अगदी जवळ असावी. जेणेकरून फळझाडे सहज रित्या बागायतदारांना नेहमी नेणे सोपे पडेल.
पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन रोपवाटिका करिता निवडावी.

रोपवाटिकेसाठी बारमाही पाण्याची सोय असावी पाटाच्या पाण्यापेक्षा विहीर बागायतीस प्राधान्य द्यावे.

ऊस रोपवाटिका

पश्चिम महाराष्ट्र मध्ये जुलै ऑगस्ट मध्ये ऊस लावण्याची सर्वोत्तम वेळ असते. पण अनेक शेतकऱ्यांना ही वेळ साधता येत नाही आणि त्यांचा ऊस लागतो ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये लागण उशिरा झाल्याने उत्पन्न हे कमी प्रमाणामध्ये मिळत असते.

काही भागात यासाठी उसाची रोपवाटिका हा एक नवा धंदा महाराष्ट्र मध्ये सुरू झालेला आहे. जुलै, ऑक्टोंबर मध्ये रोपवाटिकेत उसाचे डोळे लावून तयार केलेली रोपे जर ऑक्टोंबर, नोव्हेंबर मध्ये शेतामध्ये लावली तर उसाच्या उत्पन्नात अजिबात घट येत नाही.

सध्या बहुतेक ग्रामीण उद्योजक उसाची रोपे तयार करून ती विकण्याचा व्यवसाय देखील करत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये.

निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला रोपवाटिका व्यवस्थापन कसे करावे याबद्दलची दिलेली माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.

मित्रांनो आपल्याला रोपवाटिकेचे व्यवस्थापन कसे करावे याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच आपल्याला आणखी कोणतीही माहिती हवी असल्यास ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच वरील प्रमाणे दिलेली माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका .

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending