Connect with us

Information

Nursing Course Information in Marathi | नर्सिंग कोर्सची मराठीत माहिती

Published

on

Nursing course information in Marathi

Nursing course information in Marathi: विद्यार्थी मित्रांनो दहावी बारावीची परीक्षा झाली पण तुम्हाला वाटत आहे की आता काय करावे तर हा जर प्रश्न आपल्याला पडला असेल तर मित्रांनो आज तुम्ही योग्य ठिकाणी आहात.

मित्रांनो आज आम्ही तुम्हाला नर्सिंग कोर्स बद्दल माहिती सांगणार आहोत. हा कोर्स तुम्हाला तुमचे करिअर निवडण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये उपयोगी पडणार आहे. चला तर मित्रांनो कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया नर्सिंग कोर्स बद्दल सर्व माहिती.

Nursing Course Information in Marathi Language

मित्रांनो नर्सिंग कोर्स मुलं आणि मुले दोघे देखील करू शकता. नर्सिंग कोर्स करणाऱ्यांना परिचारिका असे देखील बोलले जाते. रुग्णालयामध्ये रुग्णांच्या सेवेकरिता डॉक्टरांबरोबर परिचारिका काम करत असतात त्यांना आपण नर्स असे देखील म्हणतो. रुग्णांची सेवा करणे तसेच रुग्णांची काळजी घेणे व डॉक्टरांची मदत करणे हे नर्स चे काम असते.

आजकालच्या कोरोनाच्या काळामध्ये नर्सच्या नोकरीला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये महत्त्व देखील आलेले आहे. मित्रांनो कोरोनामुळे रुग्णांची संख्या देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे.

तसेच त्यामध्ये लागणाऱ्या परिचारकांची गरज देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे. त्यामुळे आजच्या परिस्थितीमध्ये नर्सिंग खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मागणी देखील आहे.

वैद्यकीय अभ्यासक्रमातील सर्वात प्रसिद्ध व लोकप्रिय अभ्यासक्रम म्हणून नर्सिंग कोर्स हा प्रसिद्ध आहे. परदेशात देखील नर्सिंग क्षेत्रामध्ये नोकरीच्या संधी देखील आपल्याला मिळू शकतात.

मित्रांनो नर्सिंग हा एक आरोग्य सेवेचा एक महत्त्वपूर्ण असा असणारा कणा आहे. डॉक्टर आणी याच्यातील दुवा म्हणजे नर्सिंग कोर्स आहे.

बारावी झाल्यानंतर नर्सिंग कोर्स करता येतो का ?

मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी बारावी दरम्यान विज्ञान शाखा निवडलेली असेल ते विद्यार्थी नर्सिंग कोर्स करू शकतात. बारावी मध्ये विद्यार्थ्यांना फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे विषय घेणे आवश्यक असते. मित्रांनो नर्सिंग बीएससी नर्सिंग हा कोर्स चार वर्षांमध्ये पूर्ण होत असतो.

बीएससी नर्सिंग कोर्स साठी पात्रता काय आहे ?

मित्रांनो, बीएससी नर्सिंग कोर्स साठी खालील प्रमाणे दिलेली पात्रता आहे.

1) उमेदवार बारावी उत्तीर्ण झालेला असावा.

2) उमेदवाराने बारावी मध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र हे इंग्रजी विषय घेणे आवश्यक आहे.

3) बारावी सायन्स पात्र असणे आवश्यक आहे.

दहावी पास झाल्यानंतर नर्सिंग कोर्स करता येतो का ?

मित्रांनो, दहावीनंतरचे नर्सिंग कोर्स हे शॉर्ट टर्म सर्टिफिकेट प्रोग्रॅम आहे. जे हायस्कूल म्हणजे इयत्ता दहावी नंतर केले जात असतात.

हे कोर्स मित्रांनो प्राथमिक आरोग्य सुविधांवर लक्ष केंद्रित करत असतात. जसे की प्रथमोपचार, पर्यवेक्षक, परिचारिका डॉक्टर किंवा आरोग्य सेवा व्यवसाय आणि घर आधारित आरोग्यसेवा. मित्रांनो भारत देशामध्ये फक्त काही संस्था दहावीनंतर नर्सिंग कोर्स देत असतात.

पॅरामेडिकल कॉलेज यामध्ये लोकप्रिय आहेत. मित्रांनो आजकालच्या काळामध्ये सर्व जग हे ऑनलाईन झालेले आहेत म्हणूनच काही विद्यार्थी विविध नर्सिंग कोर्स ऑनलाईन देखील शोधू शकतात.

दहावीनंतर नर्सिंग कोर्स करण्यासाठी कोणती पात्रता लागते ?

मित्रांनो दहावीनंतर नर्सिंग कोर्स करण्यासाठी कोणते पात्रतेची आवश्यकता लागत नाही.

नर्सिंग कोर्स असणारे प्रकार कोणते आहेत ?

मित्रांनो, नर्सिंग मध्ये अनेक कोर्स देखील आहेत त्यापैकी आपण एक कोर्स करून नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करू शकता. मित्रांनो नर्सिंग क्षेत्रामधील असणारे मुख्य अभ्यासक्रम खालील प्रमाणे दिलेले आहेत.

  • ANM COURSE
  • GNM COURSE
  • BSC NURSING

सर्व नर्सिंग कोर्स साठी लागणारे पात्रता काय आहे ?

1) मित्रांनो, नर्सिंग अभ्यासक्रमामध्ये आपल्याला परीक्षा देण्यासाठी आपले वय किमान सतरा ते 35 असणे गरजेचे असते.

2) मित्रांनो, या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी उमेदवाराला कोणत्याही परीक्षेमधून तसेच संस्थेमधून कला किंवा विज्ञान शाखेमधून बारावी उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे.

3) विद्यार्थ्यांसाठी 40 ते 50 टक्के गुणांची मर्यादा वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे आहे.

Nursing course information in Marathi FAQ

1) कला आणि वाणिज्य शाखेचे विद्यार्थी नर्सिंग कोर्स करू शकतात का ?

होय, कला आणि वाणिज्य शाखेचे विद्यार्थी नर्सिंग कोर्स करू शकतात.

2) नर्सिंग कोर्स केल्यावर पगार किती मिळतो ?

नर्सिंग कोर्स केल्यानंतर आपल्याला दहा ते बारा हजार ते साठ हजार पर्यंत पगार मिळू शकतो.

निष्कर्ष

मित्रांनो, वरील प्रमाणे दिलेला आपल्याला नर्सिंग कोर्स बद्दल माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे. मित्रांनो आपल्याला नर्सिंग कोर्स बद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

मित्रांनो आपल्याला आणखी कोणत्याही कोर्स बद्दल माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला सांगा. तसेच मित्रांनो नर्सिंग कोर्स बद्दल दिलेली माहिती आपण आपल्या मित्रपरिवार सोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending