Connect with us

Farmers Guide

सेंद्रिय शेती कशी करावी | Organic Farming in Marathi, तुलनात्मक अभ्यास

Published

on

सेंद्रिय शेती कशी करावी

सेंद्रिय शेती कशी करावी मित्रांनो, आज कालच्या काळामध्ये सेंद्रिय शेतीला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये महत्त्व दिले जात आहे. तसेच मित्रांनो सेंद्रिय शेतीला येणाऱ्या काळामध्ये देखील महत्त्व वाढणार आहे. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत की सेंद्रिय शेती कशी करावी तसेच सेंद्रिय शेतीचे फायदे काय आहेत हे देखील आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया सेंद्रिय शेती कशी करावी ते.

सेंद्रिय शेती म्हणजे नक्की काय

मित्रांनो, सेंद्रिय शेती म्हणजे सजीव तसेच पर्यावरणीय रचना आणि जीवनचक्र समजून घेऊन व रसायनांचा वापर टाळून केलेली एकात्मिक शेती पद्धती याला सेंद्रिय शेती असे बोलले जाते.

तसेच शेती करत असताना कोणते रासायनिक खते अथवा रसायनाचा वापर न करता त्याच बरोबर शेती सभोवतालचा पालापाचोळा, कापणी झाल्यानंतर उरलेले शेतातील पिकांचे अवशेष, कोंबडीखत, गोमूत्र इत्यादी नैसर्गिक साधनांचा वापर करून केल्या जाणाऱ्या शेतीला सेंद्रिय शेती असे बोलले जाते .

सेंद्रिय शेतीचे असणारी वैशिष्ट्ये

  • सेंद्रिय शेतीमुळे मातीचा कस सुधारत असतो मातीचे आरोग्य हे चांगले राहत असते.
  • सेंद्रिय शेतीमुळे नैसर्गिक संतुलन कायम राखण्यासाठी मदत होत असते.
  • सेंद्रिय पद्धतीने शेती केल्याने रासायनिक खतांचा व औषधांवर होणारा खर्च वाचू शकतो. तसेच याचा परिणाम म्हणून शेती ही आर्थिक दृष्ट्या देखील सामान्य शेतकऱ्यांना परवडत असते.
  • सेंद्रिय शेतीमध्ये पारंपरिक पद्धतीचा वापर खूपच मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. तसेच पाळीव प्राण्यांचा देखील प्रामुख्याने वापर केला जातो. यामुळे इतर अवजारे अथवा मशीन घेऊन काम करण्याचा खर्च देखील कमी होत असतो.

सेंद्रिय शेतीमधील असणारे जैविक उपाय

सेंद्रिय शेती कशी करावी

मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करण्याची नेहमीच असते परंतु असे अनेक शेतकरी विविध पिकांवरील रोग आणि किडे यामुळे त्रस्त असतात. त्यामुळे ते रासायनिक शेती कडे नेहमी वळत असतात. अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी सेंद्रिय शेती ही जैविक उपाययोजना म्हणून जाणून घेणे गरजेचे आहे.

1) कडूनिंब

मित्रांनो, अनेक वनस्पती ह्या कीडनाशक असतात ज्यामध्ये कडूलिंबाचा वापर कीड घालवण्यासाठी सर्वात प्रभावी मानला जातो. कडुनिंबाच्या अर्काचा वापर हा कीटक नियंत्रण करण्यासाठी खूपच महत्त्वाचा घटक आहे. मित्रांनो तुम्ही कडुनिंबाचा अर्क हा कीडनाशक म्हणून पिकांवर फवारू शकता.

2) गोमूत्र

मित्रांनो, तुम्ही कडूनिंब बरोबरच देशी गायीचे गोमूत्र देखील कीडनाशक म्हणून वापर करू शकता. मित्रांनो ज्या पिकावर कीड पडली असेल किंवा कीड तुम्हाला आढळत असेल तर याच्यावर तुम्ही गोमूत्र टाकून गोमूत्र मिश्रणामध्ये कडूनिंब घेऊन फवरू शकता.

सेंद्रिय खतांचे प्रकार

  • शेणखत
  • कंपोस्ट खत
  • हिरवळीची खते
  • गांडूळ खत
  • माशाचे खत
  • खाटीक खाण्याचे खत

वरील प्रमाणे सेंद्रिय खतांचे प्रकार आहेत. मित्रांनो आपल्याला या सेंद्रिय खतांची सविस्तर माहिती हवी असल्यास आपण आम्हाला कमेंट द्वारे कळवा.

सेंद्रिय शेती कोणत्या मुद्द्यांवर अवलंबून आहे

  1. मातीचे संवर्धन
  2. तापमानाचे व्यवस्थापन
  3. पावसाच्या पाण्याचे नियोजन
  4. सौर ऊर्जेचा वापर
  5. नैसर्गिक कर्म चक्र
  6. जनावरांची एकीकृत

सेंद्रिय शेती कशी करावी याबद्दल शेवटचे शब्द

मित्रांनो, आपल्याला सेंद्रिय शेती कशी करावी याबद्दल दिलेली माहिती आपल्या जीवनामध्ये खूपच उपयोगी पडणार आहे. तसेच आपल्याला सेंद्रिय शेती कशी करावी याबद्दल दिलेली माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे. मित्रांनो आपल्याला सेंद्रिय शेती बद्दल आणखी माहिती हवी असल्यास आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्कीच कळवा. तसेच सेंद्रिय शेती कशी करावी या बद्दल दिलेली माहिती आपल्या मित्रांसमवेत शेअर करण्यास कधीही विसरू नका.

1 Comment

1 Comment

  1. Pingback: बैला विषयी माहिती Ox Information in Marathi [नवीन माहिती]

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending