सेंद्रिय शेती माहिती: मित्रांनो, आज कालच्या काळामध्ये सेंद्रिय शेती हा शब्द आपल्याला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये ऐकण्यास मिळत आहे. मित्रांनो आज आपण सेंद्रिय शेती काय असते.
तसेच सेंद्रिय शेती म्हणजे काय याबद्दलची अगदी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया सेंद्रिय शेती म्हणजे काय तसेच सेंद्रिय शेती बद्दल अगदी सविस्तर माहिती.
अनुक्रमणिका
सेंद्रिय शेती म्हणजे काय सेंद्रिय शेती माहिती Sendriya Sheti Mahiti Marathi
मित्रांनो, विसाव्या शतकापासून पर्यावरणाचे रक्षण करणे तसेच नैसर्गिक संसाधनाचे रक्षण करणे आणि नैसर्गिक संसाधने नष्ट न करता भविष्यातील येणाऱ्या पिढीसाठी एक स्वच्छ जग निर्माण करणे हे उद्दिष्ट खूपच उदयस आलेले आहे.
मित्रांनो खत व कृत्रिम रसायनचा वापर जसा जसा वाढत आहे तसेच सेंद्रिय शेतीचे महत्व देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे.
मित्रांनो नवीन प्रणाली म्हणून जरी सेंद्रिय शेतीकडे पाहिले जात असले तरी सेंद्रिय शेती जगातील सर्वात प्राचीन अशी असणारी कृषी मॉडेल आहे. मित्रांनो चुकीचा आणि सर्वात जास्त रासायनिक खताचा वापर हा दुसऱ्या महायुद्धानंतर सुरू झालेला आहे.
मित्रांनो, अलीकडच्या काळामध्ये शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे. याशिवाय रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे.
त्यामुळे उत्पादनांमध्ये खूपच मोठ्या प्रमाणे वाढ झालेली असली तरी मिळणारे उत्पादनही रासायन युक्त मिळत आहे. त्यामुळे मानवामध्ये विविध आजारांमध्ये वाढ होत चाललेले आहे.
यामुळे विषमुक्त व रसायनिक विरहित अन्नधान्य भाजीपाला आणि फळ पिके घेणे आजच्या काळामध्ये आवश्यक झालेले आहे. मित्रांनो यासाठी सेंद्रिय शेती हा एकमेव पर्याय उरलेला आहे. सेंद्रिय शेती निसर्गास आणि पर्यावरणास अनुकूल अशी उत्पादन प्रक्रिया आहे जी लहान शेतकऱ्यांसाठी खूपच फायदेशीर आहे.
सेंद्रिय शेतीची वैशिष्ट्ये काय आहेत
1) पावसाच्या पाण्याचे संवर्धन
पाझर तलाव खोदणे, शेततळे खोदणे उताराच्या जमिनीला मोठ्या प्रमाणामध्ये बांध घालून बांधावर कमी उंचीचे वृक्षारोपण करणे असे केल्याने पावसाच्या पाण्याचे संवर्धन हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होत असते.
2) मृदा संवर्धन
मातीचे संवर्धन करायचे असेल तर रसायनांचा वापर थांबवावा तसेच पिकांचे अवशेष उपयोगात आणणे जैविक आणि सेंद्रिय खतांचा उपयोग करणे तसेच बहुतेक आणि आंतरपीक पीक पद्धतीचा अवलंब करणे.
त्याचप्रमाणे जमिनीचे जास्त प्रमाणामध्ये नांगरणी न करणे जमिनीचे तापमान नियंत्रित राहण्यासाठी जमीन सतत हिरव्या किंवा ओल्या गवताने अच्छादित राहिल्याची काळजी घेणे.
3) पशुपालन
मित्रांनो, जनावर ही सेंद्रिय व्यवस्थापनाचे महत्त्वपूर्ण घटक आहेत. जनावरांपासून दूध व्यतिरिक्त शेण आणि मूत्र मिळत असते जे सेंद्रिय शेतीसाठी साठी खूपच महत्त्वाचे मानले जाते.
सेंद्रिय शेतीचे उद्दिष्टे काय आहेत
1) पीक उत्पादनामध्ये खर्च कमी करणे तसेच उत्पादन जास्त आणण्यावर भर देणे हे देखील सेंद्रिय शेतीचे मुख्य उद्दिष्ट आहे.
2) सेंद्रिय शेती पद्धती सेंद्रिय पदार्थांचा वापर वाढवणे तसेच अन्नद्रव्य व्यवस्थापनात नैसर्गिक समतोल राखणे हे देखील सेंद्रिय शेतीचे मुख्य वैशिष्ट्य आहे.
3) विष मुक्त अन्नाची निर्मिती करणे.
4) सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये निसर्गाचा तसेच पर्यावरणाचा समतोल राखणे.
5) मिश्र शेती पद्धतीतून जैविक विविधता टिकवणे हे देखील सेंद्रिय शेतीचे मुख्य उद्दिष्ट आहे.
निष्कर्ष
मित्रांनो, आपल्याला वरील प्रमाणे दिलेली सेंद्रिय शेती याबद्दलची माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे. मित्रांनो आपल्याला सेंद्रिय शेती याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.
तसेच आपल्याला सेंद्रिय शेती बद्दल आणखी माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की विचारा. तसेच मित्रांनो सेंद्रिय शेती याबद्दल दिलेली माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.