Connect with us

Farmers Guide

सेंद्रिय शेती कार्यपद्धती Organic Farming Practices in Marathi

Published

on

सेंद्रिय शेती कार्यपद्धती

सेंद्रिय शेती कार्यपद्धती: मित्रांनो, सेंद्रिय शेती म्हणजे परंपरागत शेती होय. मित्रांनो शेती करत असताना रसायनाचा वापर न करता शेतामध्ये पिकांचे अवशेष जसे की नैसर्गिक साधनांचा वापर करून सेंद्रिय शेती केली जाते अशा शेती सेंद्रिय शेती असे देखील बोलले जाते.

चला तर मित्रांनो आज आपण सेंद्रिय शेतीची कार्यपद्धती कोणकोणत्या आहेत याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. चला तर कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया सेंद्रिय शेती बद्दल असणारे कार्यपद्धती कोणकोणते आहेत ते.

सेंद्रिय शेती कार्यपद्धती कोणकोणते आहेत

मित्रांनो, शेती हा लोकांच्या उपजीविकेचा असणारे साधन आहे. प्रमुख साधन असल्यामुळे शेती हा भारताचा आत्मा आहे. मित्रांनो शेती टिकवण्यासाठी सेंद्रिय पद्धतीचा वापर केल्यास रासायनिक खतांवर व औषधांवर होणारे खर्च वाचू शकतो.

कारण सेंद्रिय शेतीमध्ये खते व औषध नैसर्गिक साधनांचा वापर करून तयार करतात. त्यामुळे यावर खर्च अल्पशा कमी प्रमाणामध्ये होत असतो.

सेंद्रिय शेती पद्धतीनुसार पारंपारिक बी बियाणे वापरणे, जमिनीचे धूप थांबवणे, त्यासाठी योग्य ठिकाणी बांध करणे, मशागत करणे, शेण गोमुत्राचा जास्तीत जास्त वापर करणे यामुळे वाफेमध्ये पाणी टिकून राहते.

बैलाच्या मशागतीने जमिनीची नांगरणी उत्तम होत असते. नांगरणी उत्तम झाल्यामुळे पिकांची वाढ देखील चांगल्या प्रकारे होत असते.

तसेच रासायनिक खतांचे दर दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. रासायनिक खतांचा वापर केल्याने जमिनीचा कस देखील कमी होत चाललेला आहे त्यावर उपाययोजना म्हणजे सेंद्रिय शेती होय.

सेंद्रिय शेतीमधील असणारे जैविक उपाय कोणकोणते आहेत

मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांना नेहमी सेंद्रिय शेती करण्याची इच्छा असते परंतु असे शेतकरी विविध पिकांवरील रोग कीड याने त्रस्त देखील असतात.

आणि त्यामुळेच ते रासायनिक शेतीकडे नेहमी ओळतात. अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी सेंद्रिय शेतीमधील जैविक म्हणून उपाय जाणून घेणे खूपच गरजेचे असते.

1) गोमूत्र

मित्रांनो, आपण कडुनिंबाबरोबरच देशी गाईचे गोमूत्र देखील कीडनाशक म्हणून देखील वापरू शकता. ज्या पिकावर कीड पडले असेल किंवा ते पीक तसेच कीड तुम्हाला आढळत असेल तर त्याच्यावर पाण्यामध्ये गोमूत्र टाकून त्या मिश्रणाचे फवारणी केल्यास ते कीड नाहीशी होण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते. साधारणपणे मित्रांनो 1:2 अशा प्रमाणामध्ये गोमूत्र पाणी मध्ये मिसळ आणि त्याची फवारणी पिकांवर करावी.

2) कडुलिंब

मित्रांनो, अनेक वनस्पती ह्या कीडनाशक असतात त्यातल्या त्यात कडुनिंबाचा वापर कीड घालवण्यासाठी सर्वात प्रभावी देखील मानला जातो.

तसेच मित्रांनो कडुनिंबाच्या अर्काच वापर हा कीटक नियंत्रण एक महत्त्वाचा घटक असून कीटक नियंत्रणामध्ये एक महत्त्वाचा घटक देखील आहे. म्हणून मित्रांनो तुम्ही कडुनिंबाचा अर्क हा कीडनाशक म्हणून देखील फवारू शकता.

3) आरोग्याचे तत्व

मित्रांनो, सेंद्रिय शेतीचा मुख्य उद्देश म्हणजे हवा, माती, धान्याची रोपे ,पशु प्राणी, पक्षी, मनुष्य प्राणी व निसर्गचक्र यांचे चांगले आरोग्य राखणे हा सेंद्रिय शेतीचा मुख्य असा असणारा उद्देश आहे.

मित्रांनो सेंद्रिय शेतीचा अवलंब केल्यास सेंद्रिय शेती पद्धतीने पिकवलेल्या फळभाज्या दाणे खाल्ल्याने माणसाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवून माणसाचे आरोग्य अधिक चांगले राहण्यास नेहमी मदत होत असते.

सेंद्रिय शेती बद्दल पर्यावरणीय तत्व

सेंद्रिय पद्धतीने शेती ही निसर्गाच्या जीवन चक्रावर अवलंबून आणि अनुरूप असायला हवी. ती जीवसृष्टीला धरून नेहमी असायला परिणामी कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही आणि पर्यावरणाचा देखील त्रास होणार नाही याची काळजी घ्यायला हवी.

निष्कर्ष

मित्रांनो, सेंद्रिय शेती कार्यपद्धती याबद्दल दिलेली माहिती आपल्याला नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे. मित्रांनो आपल्याला सेंद्रिय शेती कार्यपद्धती याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच सेंद्रिय शेती बद्दल आणखी आपल्याला माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच मित्रांनो सेंद्रिय शेती कार्यपद्धती याबद्दल दिलेली माहिती आपण आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

Trending