उस्मानाबादी शेळी पालन नमस्कार मित्रांनो आज आपण उस्मानाबादी शेळी पालन याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो शेळीपालन हा व्यवसाय येणाऱ्या काळामध्ये खूपच फायद्याचा असा असणारा व्यवसाय आहे. आजकालच्या काळामध्ये शेळीपालनातून काही लोक लाखोंचे उत्पादन घेत आहेत.
तसेच शेळी पालन साठी कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त खर्च हा मोठ्या प्रमाणामध्ये येत नाही. म्हणूनच ग्रामीण भागामध्ये या व्यवसायाला सर्वात जास्त पसंती लोक देत आहेत. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया उस्मानाबादी शेळी पालन कसे करायचे ते.
अनुक्रमणिका
उस्मानाबादी शेळी पालन कसे करायचे
मित्रांनो, उस्मानाबादी शेळी ही दुहेरी उपयोगाची म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्र मधील असणाऱ्या उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, अहमदनगर, सोलापूर इत्यादी भागांमध्ये या शेळ्या खूपच मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत असतात.
मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील शेळ्यांच्या जातींचा विचार करता महाराष्ट्र मध्ये उपलब्ध असणारी उस्मानाबादी शेळी उत्पादनाला खूपच फायदेशीर असल्याचे असे वेगवेगळे अभ्यासून दिसून आलेले आहे.
मित्रांनो महाराष्ट्र शासन नेहमी या जातीच्या उस्मानाबादी जातीच्या शेळ्या पाळण्याचा सल्ला देत असते. मित्रांनो उस्मानाबादी शेळ्यांची वाढ ही अतिशय जलद गतीने होत असते.
वर्षभरामध्ये 40 ते 50 किलोच्या या शेळ्या होत असतात. साधारण या शेळ्यांचे नर हे उंच असतात. आणि नरांची वजनाची क्षमता ही सरासरी 35 ते 40 किलो पर्यंत असते.
मित्रांनो उस्मानाबादी शेळ्या या ८० टक्के शेळ्या रंगाने काळया दिसून येतात. तर काही पांढऱ्या ठिपकेदार सुद्धा उस्मानाबादी शेळ्या दिसून येत असतात.
उस्मानाबादी शेळ्या प्रत्येक एका वेतांमध्ये तीन ते चार पिल्ले देत असतात. आणि हे एक उस्मानाबादी शेळ्यांचे खूपच मोठे वैशिष्ट्य आहे.
उस्मानाबादी शेळीपालनासाठी शेळ्यांच्या विचारात घेण्याच्या काही महत्त्वपूर्ण गोष्टी
- उस्मानाबादी शेळ्यांचा रंग हा बहुतेक काळा असतो. तसेच काही शेळ्यांचा रंग पांढरा तसेच ठिपकेदार असतो.
- उस्मानाबादी शेळ्यांचे कान हे लोंबकळत असतात.
- उस्मानाबादी शेळीची शिंगे ही पाठीमागे वळलेली असतात.

उस्मानाबादी शेळीची वजने
1) उस्मानाबादी शेळीच्या करडाचे वजन हे सरासरी अडीच किलोपर्यंत असते.
2) उस्मानाबादी शेळीचे पूर्ण वाढ झालेले वजन हे 35 ते 37 किलो पर्यंत असते.
3) उस्मानाबादी नराचे पूर्ण वाढ झाल्यास वजन हे 40 ते 50 किलो पर्यंत असते.
उस्मानाबादी शेळीच्या पैदाशीचे गुणवैशिष्ट्ये
1) उस्मानाबादी शेळीचे वय हे वयात येण्याचे आठ ते नऊ महिने आहे.
2) उस्मानाबादी शेळी हे दहा ते अकरा महिन्यांमध्ये पहिल्यांदा गाभण राहत असते.
3) उस्मानाबादी शेळीचे पहिल्यांदा विण्याचे वय हे 14 ते 16 महिने आहे.
4) उस्मानाबादी शेळीचे दोन वेतांमधील अंतर हे नऊ महिने आहे.
5) उस्मानाबादी शेळी पुन्हा माजावर येण्याचा काळ हा 21 दिवसानंतरचा आहे.
उस्मानाबादी शेळी पालन व्यवसायाचे स्वरूप आणि विस्तार कसा करावा
उस्मानाबादी शेळ्यांचे खाद्य व्यवस्थापन कसे करावे
मित्रांनो, शेळ्यांसाठी नेहमी सकस आहार लागत असतो. शेळ्यांना दिवसामधून तीन ते चार वेळा खाद्य दिले पाहिजे. या खाद्यामध्ये पौष्टिक आहार मध्ये भरडलेला मका, शेंगदाण्याची पेंड, हरभरा व तुरीचा भुसा व खनिज मिश्रण दिवसातून एक वेळा दिले पाहिजे.
तसेच सकाळी हिरवा चारा ,दुपारी विशिष्ट पौष्टिक खाद्य त्याचप्रमाणे सायंकाळी वाळलेला चारा आणि रात्री नंतर हिरवा चारा असे खाद्य शेळ्यांना दिले पाहिजे.
उस्मानाबादी शेळी पालन मध्ये औषध उपचार
- उस्मानाबादी शेळ्यांना वर्षातून एक वेळा लाळ्या, खुरकत, घटसर्प या रोगांचे लसीकरण केले पाहिजे.
- उस्मानाबादी शेळ्यांना पोटामधील असणारी जंतुनाशके वर्षा मधून दोन वेळा पाजली पाहिजेत.
- शेळ्यांना हवे त्यावेळी पाणी पिता आले पाहिजे.
- थंडी आणि पावसाळ्यामध्ये शेळ्यांचे विशेष संरक्षण केले पाहिजे.
उस्मानाबादी शेळीपालनासाठी काही महत्त्वपूर्ण टिप्स
मित्रांनो, आपण आपल्याकडे अस्तित्वात असलेल्या काही स्थानिक शेळ्यांपासून नेहमी सुरुवात करणे फायद्याचे ठरते. तसेच हे कमी खर्चामधील आणि सहज उपलब्ध होत असलेल्या शेळ्यांमध्ये हे आपल्याला फायदेशीर ठरत असते.
सुरुवातीला मित्रांनो आपल्याकडील शेळीला आपण उस्मानाबादी बोकड वापरला पाहिजे. त्याच्या संकरातून तयार होणाऱ्या शेळीला सिरोही किंवा जमनापुरी सारखे बोकड आपण वापरले पाहिजेत.
याचा फायदा हा असा होईल की करडे जन्मताच मध्ये चांगल्या वजनाची आणि वजन वाढणारी असतील. अशा पद्धतीने मित्रांनो आपण उस्मानाबादी शेळी पालन सुरू केले पाहिजे.
उस्मानाबादी शेळी पालन याबद्दल शेवटचे शब्द
मित्रांनो, आपल्याला वरील प्रमाणे वरील लेखांमध्ये उस्मानाबादी शेळी पालन कसे करायचे याबद्दल अगदी सविस्तर माहिती दिलेली आहे.
मित्रांनो आपल्याला उस्मानाबादी शेळी पालन यामध्ये कोणतेही प्रकारची शेळीपालन करण्यासाठी अडचण आली तर आपण आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा.
तसेच मित्रांनो आपण उस्मानाबादी शेळी पालन केल्यानंतर त्या शेळ्या पुढे मार्केटमध्ये कसे विकावे याचा विचार करत असाल ते देखील आम्ही आपल्यासाठी माहिती घेऊन येऊ आपण आम्हाला कमेंट करावी.
मित्रांनो आपल्याला उस्मानाबादी शेळी पालन याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला नक्की कमेंट द्वारे कळवा. तसेच उस्मानाबादी शेळी पालन याबद्दल दिलेली माहिती आपण आपल्या मित्रांसमवेत शेअर नक्की करा.
खूप छान माहिती