Connect with us

Farmers Guide

बैला विषयी माहिती । Ox Information in Marathi

Published

on

बैला विषयी माहिती

बैला विषयी माहिती मित्रांनो, आपल्या सर्वांनाच माहित आहे की बैल हा एकमेव प्राणी आहे जो शेतकऱ्याला शेतामध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत करत असतो.

म्हणूनच आज बैलाला शेतकऱ्यांचा वाघ देखील बोलले जाते आणि असे देखील म्हटले जाते की शेतामध्ये पिकलेल्या धान्याचा वाटा असतो. बैल हा शेतकऱ्याचा एकदम जवळचा आणि जिवाभावाचा असणारा सोबती असतो.

तसेच बैलाचा वापर शेतामध्ये मशागत करण्यासाठी त्याचप्रमाणे नांगर करण्यासाठी शेतामधील निघालेले पीक घरी नेण्यासाठी शेतामधील ओढकाम करण्यासाठी अशा वेगवेगळ्या कारणांसाठी बैलाचा उपयोग हा केला जातो.

त्याचबरोबर बैल हा घोडयासारखा वेगाने देखील जाऊ शकतो. त्यामुळे बैलांच्या शर्यती देखील महाराष्ट्रामध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये घेतल्या जातात.

खिलार जातीची जनावरे ही सोलापूर, पंढरपूर, आटपाडी, पुसेगाव, अकलूज इत्यादी ठिकाणी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मिळतात. चला तर मग जाणून घेऊया बैला विषयी माहिती कोण कोणती आहे ती.

बैला विषयी माहिती । Ox Information in Marathi

1) बैलाचा वापर कसा होतो

मित्रांनो, सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण बघायला गेले तर आताच्या काळामध्ये शेतकरी शेतीची मशागत करण्यासाठी आधुनिक यंत्राचा वापर हा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये करत आहे.

तसेच शेतातील शेतमाल घरी नेण्यासाठी देखील ट्रॅक्टरचा वापर करत आहे म्हणून ज्यावेळी ही साधने नव्हती त्या काळात बैलांचा वापर शेतीची प्रचंड मशागत करण्यासाठी केला जायचा.

त्याच्या प्रचंड ताकदीमुळे शेतकरी बैलाचा वापर मोठ्या नांगरासाठी अवजड उपकरणे वैयक्तिक वाहतूक खेचणारे गाड्या इत्यादी सामानांची वाहतूक करण्यासाठी लष्करी वाहतुकीसाठी केला जात होता.

काही शेतकरी अजून देखील बैलाचा वापर हा शेती करण्यासाठी करत असतात. कारण काही शेतकऱ्यांना आधुनिक यंत्रे परवडत नाहीत. त्यामुळे ते बैलाचा वापर करत असतात. मित्रांनो वरील प्रमाणे सर्व गोष्टींचा अंदाज आपण आपणाला लागलाच असेल की बैल प्राणी कसा आहे.

बैलाच्या असणाऱ्या विविध जाती

मित्रांनो, बैल हा माणसांना खूपच वेगवेगळ्या प्रकारे मदत करत असतो. बैलाच्या वेगवेगळ्या जाती देखील आहेत. वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळ्या जाती वापरल्या जातात भारतीय बैलांच्या वेगवेगळ्या जाती आपण जाणून घेणार आहोत.

बैला विषयी माहिती

1) खिलार

मित्रांनो, खिल्लार बैलांची जात ही महाराष्ट्रामध्ये सोलापूर, पंढरपूर, पुसेगाव, आटपाडी, औंध, अकलूज या भागांमध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आढळत असतात. या जातीची जनावरे ताकदवान वेगवान आणि चपळ खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असतात. खिलार या जातीचा उपयोग हा शर्यतीमध्ये केला जातो. ही जात पांढऱ्या रंगाची तसेच राखाडी रंगाची असते आणि लांब शिंगे असतात.

2) हल्ली कर

मित्रांनो, हल्ली कर ही जात कर्नाटक भागामध्ये विजयनगर मध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आढळते. गडद राखाडी रंग या बैलांचा असतो तसेच लांब शिंगे ठळक कपाळ आणि मजबूत पाय पण मध्यम आकाराचा असे हा हल्ली कर बैलाचे वर्णन आहे.

3) कांगायाम

या बैलांच्या जाती कोइंबतूर जिल्ह्यातील धरापुर या भागांमध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आढळत असतात. या बैलांची जात ही आकाराने मोठे तसेच मोठा पोळा आणि लांब आणि सरळ शिंगे पण किंचित वक्र असतात.

4) अलंबडी

मित्रांनो, या बैलांचा रंग गडद राखाडी रंगाचा असतो तसेच त्यांच्या कपाळावर पांढरे रंगाचे डाग देखील असतात. हा बैल तामिळनाडूमधील धर्मापुरी जिल्ह्यामध्ये आढळत असतो. हे बैल दिसायला जवळजवळ हल्ली कर बैलासारखे दिसत असतात या बैलांना बितास असे देखील बोलले जाते.

5) कृष्णा

मित्रांनो, कर्नाटकातील कृष्णा नदीच्या भागांमध्ये या बैलांच्या जाती खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात. तसेच महाराष्ट्र मधील डोंगराळ भागांमध्ये देखील या बैलांच्या जाती खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आढळत असतात.

हे बैल पांढऱ्या रंगाचे तसेच शरीराने मोठे शिंगे मध्यम आकाराचे आणि लहान पोळा असणारे असतात या बैलांचा उपयोग शेतातील कामांसाठी केला जातो.

बैलांचे वर्णन

मित्रांनो, बैलांचे वर्णन करायचे म्हटले तर शेतीच्या कामासाठी मदत करणारा बैल मुख्यत्वे आकाराने मोठा असतो. तसेच चार पाय बैलाला असतात. दोन डोळे बैलाला असतात.

दोन कान बैलाला असतात. त्याचप्रमाणे एक तोंड आणि एक नाक देखील बैलाला असते. चेहरा अकोट असतो. माने खाली पोळी असते. मध्यम व कुबडे असते. घट्ट त्वचा असते. तसेच दोन मोठे शिंग असतात. पांढरा रंग असतो. एक शेपूट आणि शेपटीचा गोंडा कळ्या रंगाचा असतो अशा प्रकारे बैलाचे वर्णन असते.

बैलाचा आहार काय असतो

मित्रांनो, बैल हा शाकाहारी प्राणी असल्यामुळे त्याला गवत शेतातील हिरवा पाला मक्याचे आणि ज्वारीची हिरवी आणि वाळलेली वैरण धान्य या प्रकारचा आहार बैलाला घालतात तसेच त्याला आवडत देखील असतो.

बैलाचा आहार काय असतो

बैलाची राहणीमान

मित्रांनो, बैलाचे वैशिष्ट्य म्हणजे बैल हा कष्टाळू आणि निष्ठावंत असा असणारा प्राणी आहे. महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये बैल हा सामर्थ्याची प्रतीक असे देखील मानले जाते.

स्वभावाने अत्यंत साधा प्राणी आहे. शेतकरी लोक अत्यंत काळजीपूर्वक बैलाचा सांभाळ करत असतात. ग्रामीण भागामध्ये अजूनही बैलाला घरच्या व्यक्तीप्रमाणे सांभाळले जाते.

बैल हा पूर्णपणे शाकाहारी प्राणी आहे. त्यामुळे त्याला वाढलेले गवत धान्य पिकाची ताटे हिरवे गवत खायला नेहमी आवडत असतील. पाळीव प्राण्यांना राहण्यासाठी बांधलेल्या गोठ्यातच बैलांना देखील बांधले जाते.

बैलाचे असणारे सांस्कृतिक महत्त्व

मित्रांनो, आपला भारत देश हा कृषिप्रधान असा असणारा देश आहे. त्यामुळे शेतीसाठी आणि अन्य कामांसाठी बैलाचा होणारा उपयोग पाहता बैलपोळा हा सण महत्त्वाचा मानला जातो.

आपण हा सण बैलाविषयी आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा करत असतो. महाराष्ट्रातील काही भागांमध्ये बैलपोळ्याला बेंदूर असे देखील म्हटले जाते.

तसेच प्राचीन काळापासून बैलाचा उपयोग होत असल्यामुळे अनेक शिल्पकला चित्रकला, हस्तकला आणि इतर सांस्कृतिक कलाप्रकार यामध्ये बैलाचे चित्रण आढळत असते. बैल हा भावनिक आणि संवेदनशील पाळीव प्राणी आहे. त्याला सांभाळणारा मालक जर मरण पावला तर बैलाला देखील दुःख होत असते.

बैला विषयी माहिती याबद्दल शेवटचे शब्द

मित्रांनो, आपल्याला आपल्या जीवनामध्ये बैलाविषयी माहिती कोणी जर विचारली तर आपल्याला वरील प्रमाणे दिलेले माहिती खूपच उपयोगी पडणार आहे.

तसेच आपल्याला बैलाविषयी आणखी माहिती हवी असल्यास आपण ते आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. आम्ही आपल्याला नेहमी माहिती घेऊन येत असतो तसेच बैलाविषयी माहिती आपण आपल्या मित्रांसमवेत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending