Connect with us

business ideas

पाणीपुरी व्यवसाय कसा सुरु करावा । How to Start a Pani Puri Business in Marathi Language

Published

on

पाणीपुरी व्यवसाय

काय तुम्हाला व्यवसाय सुरू करण्याचा विचार मनामध्ये येत असेल आज कालच्या काळामध्ये खूपच ट्रेडिंग असा व्यवसाय हा पाणीपुरी व्यवसाय आहे. म्हणूनच आज आम्ही आपल्यासाठी पाणीपुरी व्यवसाय मराठी माहिती घेऊन आलेलो आहोत.

आपल्याला पाणीपुरी व्यवसाय मधून किती प्रकारे नफा मिळतो याचे देखील सर्व माहिती आपल्याला खाली दिलेली आहे. तसेच आपण पाणीपुरी व्यवसाय कशाप्रकारे यशस्वी बनवू शकतो याची देखील उदाहरणे आम्ही आपल्यासाठी खालील प्रमाणे दिलेली आहेत चला तर मग जाणून घेऊया पाणीपुरी व्यवसाय या संदर्भात सविस्तर अशी माहिती.

पाणीपुरी व्यवसाय कसा सुरू करावा

भारत देशामध्ये जवळपास सर्वच लोकांना पाणीपुरी आवडत असते. त्यामुळे पाणीपुरीचा व्यवसाय हा गल्लीबोळा मध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. आज भारत देशामध्ये असे कोणतेही ठिकाण नाही ज्या ठिकाणी पाणीपुरीचा व्यवसाय होत नाही. विशेष म्हणजे उत्तर भारतातील लोक मोठ्या आवडीने हे खात असतात.

तसेच पाणीपुरी या पदार्थाला भारत देशातील इतर राज्यांमध्ये प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या नावांनी संबोधले जाते. मित्रांनो आपल्याला मसालेदार पदार्थांचे नाव ऐकताच नेहमी तोंडाला पाणी सुटत असते मित्रांनो पाणीपुरी हा व्यवसाय कमीत कमी भांडवला मध्ये खूपच मोठ्या प्रकारे सुरू करता येतो.

तसेच पाणीपुरी व्यवसाय मध्ये जास्त नफा देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मिळवता येतो. मित्रांनो आपल्याला जर पाणीपुरीचा स्टॉल लावायचा नसेल आणि आपण फक्त खाऊक विक्रेत्यांसारखे काम करायचे नियोजन करत असाल तर आपण हा व्यवसाय खूपच चांगल्या पद्धतीने करू शकता. आम्ही तुम्हाला या व्यवसाय संबंधित असणाऱ्या काही खास गोष्टी सांगण्याचा खालील प्रमाणे प्रयत्न केलेला आहे.

पाणीपुरी बनवण्यासाठी कच्चामाल हा काय लागत असतो

मित्रांनो, पाणीपुरी बनवण्यासाठी जास्त प्रकारचा कच्चामाल लागत नाही साधारणपणे यासाठी मैदा गरा आणि पाणी लागत असते तसेच आटा देखील लागत असतो.

पाणीपुरी बनवण्याचे यंत्र कोणते

मित्रांनो, पाणीपुरी बनवण्यासाठी दोन मशीन आहेत तसेच या दोन मशीन पैकी एका मशीनचा वापर हा मैदा आणि आटा मिक्स करण्यासाठी केला जातो. तसेच दुसऱ्या मशीन चा वापर हा पाणीपुरी बनवण्यासाठी केला जातो.

पाणीपुरी बनवणाऱ्या मशीनची किंमत ही 60 हजार रुपये आहे ही मशीन आपण ऑनलाइन देखील खरेदी करू शकतो इंडिया मार्ट वरून आणि ॲमेझॉन वरून.

पाणीपुरी व्यवसाय

पाणीपुरी बनवण्याची प्रक्रिया काय आहे

1) सर्वप्रथम आपण आपल्या गरजेनुसार मैदा आणि रव्याचे मिश्रण मिक्सिंग मशीन मध्ये ठेवा.

2) मिश्रण मिक्स केल्यानंतर मशीन चालू करा आणि आवश्यकतेनुसार थोडेसे स्वच्छ पाणी घाला.

3) आपण मिक्स केलेले पीठ हे हळूहळू मिळायला लागेल पीठ घट्ट मळून घ्यावे लागते.

4) यानंतर मित्रांनो मळलेले पीठ हे पाणीपुरी बनवण्याच्या मशीन मध्ये ठेवा.

5) पाणीपुरी बनवण्याच्या मशीनच्या मदतीने पाणीपुरी ही गोल आकारामध्ये बाहेर येत असते.

6) गोल गोल झालेले पुऱ्या यानंतर तळल्या जातात तळल्यानंतर पुऱ्या तुटणार नाहीत याची आपण सर्वप्रथम काळजी घ्यावी. कारण की ह्या पुऱ्या खूपच kdak असतात अशाप्रकारे पाणीपुरी तयार होत असते.

पाणीपुरी व्यवसायासाठी स्थानाची आवश्यकता

मित्रांनो, पाणीपुरी हा व्यवसाय सुरू करण्यासाठी जास्त प्रकारची जागा लागत नाही यामध्ये दहा बाय दहाची खोली देखील पुरेशी असते. आपण मोठा व्यवसाय करण्यासाठी इच्छित असल्यास आपण यापेक्षा जास्त मोठी जागा वापरून मोठं काम करू शकता.

पाणीपुरी व्यवसाय सुरू करण्यासाठी खर्च किती येत असतो

पाणीपुरी हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला 4000 नग पाणीपुरी बनवायचे असेल तर ती बनवण्यासाठी एकूण 38 किलो गरा लागत असतो. या व्यवसायामध्ये तेलाची किंमत रव्याची किंमत विजेचा वापर या गोष्टी सर्व जोडल्या तर एकूण खर्च हा अडीच ते तीन हजार रुपये येत असतो.

पाणीपुरी बनवण्याच्या व्यवसायामध्ये नफा

मित्रांनो, या व्यवसायामध्ये आपण तासाला 4000 पाणीपुरी बनवू शकता म्हणून एका तासाला आपण आठशे रुपये कमवू शकता. असे आपण दिवसातून किती तास मेहनत करता यावर पाणीपुरी व्यवसायाचा नफा अवलंबून आहे.

पाणीपुरी व्यवसायाचे मार्केटिंग कसे करावे

मित्रांनो, पाणीपुरी हा व्यवसाय करत असताना आपण स्वतः स्टॉल लावू शकता तसेच शहरातील विविध ठिकाणी मोठी स्टॉल लावून इतर गरीब लोकांना रोजगार देखील देऊ शकता. अशा परिस्थितीमध्ये तुमचे व्यवसायाला खूपच चांगल्या प्रकारे नफा होत असतो. तुम्हाला जास्त प्रकारे नफा मिळवण्यासाठी तुम्हाला योग्य ठिकाणांची निवड करावी लागते.

जे करून तुम्हाला जास्त प्रकारे नफा मिळेल शहरातील ज्या ठिकाणी लोकांची गर्दी ही जास्त प्रमाणामध्ये असते अशा ठिकाणी तुम्ही स्टॉल लावू शकता. उदाहरण घ्यायचे झाले तर तुम्ही स्टॉल हे बस स्टॅन्ड जवळ रेल्वे स्टेशनच्या बाहेर शाळेच्या बाहेर कॉलेजच्या बाहेर चित्रपटगृहाच्या बाहेर मंदिर इत्यादी ठिकाणी लावू शकता.

अशा ठिकाणी पाणीपुरी विकण्याची शक्यता ही खूपच मोठ्या प्रमाणामध्ये जास्त असते. अशा प्रकारे तुम्ही आपला पाणीपुरीचा व्यवसाय हा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये सुरू करू शकता आणि या व्यवसाय मधून जास्त प्रमाणे नफा कमवू शकता.

पाणीपुरी व्यवसाय याबद्दलचा निष्कर्ष

मित्रांनो, वरील प्रमाणे आपल्याला पाणीपुरी बनवण्याचा व्यवसाय या संदर्भात माहिती दिलेली आहे ही माहिती आपण पाणीपुरी बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला खूपच उपयोगाची पडेल.

तसेच आपला पाणीपुरी व्यवसाय हा जास्त लोकांपर्यंत तसेच आपल्याला यामधून जास्त नफा मिळवण्यासाठी वरील प्रमाणे दिलेली माहिती देखील आपल्याला खूपच उपयोगाची पडेल.

तसेच मित्रांनो आम्हाला अशी आशा आहे की आपल्याला पाणीपुरी व्यवसाय संदर्भात दिलेली माहिती नक्कीच आवडलेली असेल.

तसेच मित्रांनो आपल्याला पाणीपुरी व्यवसाय या संदर्भात दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच आपण वरील प्रमाणे माहिती आवडलेली असेल तर आपण आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending