Connect with us

Farmers Guide

Papai Lagwad Mahiti Marathi । पपई लागवड माहिती मराठीमध्ये

Published

on

पपई लागवड माहिती

पपई लागवड माहिती: भारत देशामध्ये पपई लागवड ही खूपच मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते आज आपण पपई लागवड बद्दल सर्व माहिती जाणून घेऊ भारत हा देश कृषि प्रधान असणारा देश आहे.

भारत देशामध्ये पपईची लागवड ही खूपच मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते त्याचबरोबर महाराष्ट्र मध्ये देखील पपईची लागवड खूपच मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते

पपई लागवड माहिती मराठीमध्ये Papaya Cultivation Information in Marathi

पपई लागवड करण्यासाठी पपई लागवड करण्यासाठी जमीन ही रेतीमिश्रित तसेच पोयटा जमीन लागत असते. पपई लागवडीसाठी जमीन जर काळी असेल तर पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी खूपच आवश्यक असते.

पपई लागवड करण्यापूर्वी काय करावे

पपईसाठी जमीन कशी असावी

पपई लागवड करण्यासाठी उत्तम निचरा सुपीक माध्यम काळी तांबडी poytaa जमीन योग्य ठरत असते खडकाळ जमिनीमुळे पपईची रोपे झाडे चांगली वाढत नाहीत.

पपईच्या झाडासाठी हवामान

पपईची झाडे ही उष्णकटिबंधीय वातावरणामध्ये वाढणारी असतात कडाक्याची थंडी व जोरदार वारे या पिकाला नेहमी हानिकारक ठरत असतात. पपईच्या वाढीसाठी जास्तीत जास्त तापमान हे 44 अंश सेल्सिअस पर्यंत असू शकते

पपईच्या जाती

पपईच्या जाती अनेक प्रकारच्या असतात पुसा नाना पुसा जयंत सनराइज सोलो पुसा डेली सीएस अशाप्रकारे पपईच्या जाती आहेत

पपईची रोपे तयार कशी करावी

पपईची झाडे लागवड करण्यासाठी ताजे बी वापरून रोपे तयार करावीत एक हेक्टर साठी अडीचशे ते साडेतीनशे ग्रॅम बियाणे पुरेसे आहे.

पॉलिथिन पिशवीमध्ये तयार केलेल्या रोपांची वाढ चांगली होते प्रत्येक पिशवीमध्ये एक ते तीन बिया लावून घ्या चांगल्या कुजलेल्या कंपोस्ट ने झाकून त्या पिशवीला पाणी द्यावे रोपे लागवडी योग्य सुमारे सहा ते सात आठवड्यांनी तयार होतात.

पपई लागवडीचा हंगाम कोणता

भारत देशामध्ये पपईची लागवड वर्षभरामध्ये जून जुलै तसेच सप्टेंबर ऑक्टोबर आणि जानेवारी फेब्रुवारी या तीन हंगामामध्ये करत असतात मित्रांनो महाराष्ट्र मध्ये पपईची लागवड ही जून ते आक्टोंबर महिन्यांमध्ये केली जाते

पपई साठी पाणी व्यवस्थापन कसे करावे

पपईला हिवाळ्यामध्ये साधारणपणे दर दहा दिवसांनी पाणी द्यावे तसेच उन्हाळ्यामध्ये आठवड्यातून एकदा पाणी द्यावे दुहेरी अळी पद्धती तसेच सरी किंवा ठिबक सिंचन यांचा पाणी देण्यासाठी वापर करावा

पपई लागवड माहिती

पपई पिकांवर रोग कोणता येतो आणि रोगाचे व्यवस्थापन कसे करावे

पपई पिकावर विषाणूजन्य रोग येत असतात यामध्ये पपया रिंग, स्पॉट, पपया मोझाक या रोगाच्या पपईच्या झाडावरील नवीन येणारी पालवी हे पिवळसर दिसत असते.

तसेच वाढीच्या काळात पानांच्या शिरा हिरव्या दिसून येत असतात पाने हाताला चरचरीत देखील लागत असतात व त्यावर पिवळसर हिरवी चट्टे देखील दिसून येत असतात.

रोगग्रस्त झाडांची फळे ही आकाराने लहान व वेडी वाकडे होत असतात त्यामुळे उत्पादनामध्ये लक्षणीय मोठ्या प्रमाणामध्ये घट होत असते पपईवरील विषाणूजन्य रोगावर रोग झाडावर आल्यानंतर त्याचे नियंत्रण होत नाही.

निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला जर नवीन पपईची लागवड करायची असेल तर आपण सर्वप्रथम ज्या शेतकऱ्यांनी पपईची लागवड केलेली आहे त्या शेतकऱ्यांकडून माहिती घ्यावी तसेच कृषी सेवकांकडून देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये माहिती घ्यावी.

यामुळे आपल्या पपई पिकांवर आपल्याला योग्य प्रकारे व्यवस्थापन करता येईल. तसेच मित्रांनो आपल्याला वरील प्रमाणे दिलेली माहिती पपई लागवड माहिती याबद्दल दिलेली माहिती ही नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.

मित्रांनो आपल्याला वरील प्रमाणे दिलेली माहिती कशी वाटली ते पण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा तसेच वरील प्रमाणे दिलेली माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending