Connect with us

Schemes

Personal Loan Information in Marathi | वैयक्तिक कर्ज माहिती, पर्सनल लोनचे असणारे प्रकार

Published

on

Personal Loan Information in Marathi

Personal loan information in Marathi: जेव्हा आपल्याला अचानक वैयक्तिक कारणांसाठी नेहमी पैशाची गरज भासत असते.

अशावेळी आपल्याला इतर कर्ज प्रक्रियांपेक्षा सुलभ व सोपे कर्ज म्हणजे वैयक्तिक कर्ज होय. मित्रांनो तुम्ही वैयक्तिक गरजेसाठी नेहमी पर्सनल लोन घेऊ शकता. चला तर मित्रांनो आज आपण जाणून घेऊया वैयक्तिक कर्ज याबद्दलची माहिती.

Personal Loan Information in Marathi वैयक्तिक कर्जाची माहिती मराठीत

मित्रांनो, आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैसे नेहमी आवश्यकच असतात. जसे की आपल्याला नवीन गाडी घेणे घर खरेदी करणे घरातील वस्तू खरेदी करणे त्याचप्रमाणे आजारपण यासाठी देखील आपल्याला कधी कधी पैसे हे लगेच उपलब्ध लागतात परंतु ते होत नाहीत म्हणून पर्सनल लोन हे खूपच महत्त्वाचे आहे.

वैयक्तिक कर्ज म्हणजे नक्की काय

वैयक्तिक कर्ज म्हणजे तुम्ही विविध कारणांसाठी बँकेकडून कर्ज घेऊ शकता. कारण हे कोणतेही असू शकते यामध्ये कोणती अट लागत नाही.

वैयक्तिक कर्ज तुम्हाला वैयक्तिक खर्चासाठी नेहमी पैसे उधार घेण्याचे आणि नंतर त्याची वेळोवेळी परतफेड करण्याची परवानगी देत असते.

पर्सनल लोन साठी पात्रता काय आहे

1) कर्ज घेण्यासाठी भारताचे नागरिक असणे बंधनकारक आहे.

2) कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचे वय हे 21 वर्षाच्या पुढे असणे गरजेचे आहे.

3) कर्ज घेणाऱ्या व्यक्तीला रोजगार असणे गरजेचे आहे.

4) कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा सिबिल स्कोर हा 750 च्या वर असणे गरजेचे आहे.

पर्सनल लोन साठी लागणारी कागदपत्रे कोणकोणती आहेत

आधार कार्ड
पॅन कार्ड
ड्रायव्हिंग लायसन्स
मतदान कार्ड
पासपोर्ट फोटो
सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट

पर्सनल लोन घेताना घ्यायची काळजी

मित्रांनो, पर्सनल लोन घेत असताना फक्त आपल्याला प्रोसेसिंग फी द्यावी लागत असते. परंतु काही बँका या प्रोसेसिंग फी बरोबरच इतर खर्च देखील सांगत असतात. त्यामुळे कर्ज घेताना या गोष्टी तपासून घेणे खूपच गरजेचे असते.

तसेच आपण जर आपल्या मुदतीपूर्वी कर्जाची परतफेड केली तर त्यांना अपेक्षा एवढे व्याज मिळत नाही. त्यामुळे ते एक युक्ती वापरत असतात. त्यामध्ये हे देखील आपण जाणून घेणे गरजेचे आहे.

पर्सनल लोनचे असणारे प्रकार

 • शिक्षणासाठी कर्ज
 • प्रवासासाठी कर्ज
 • वैद्यकीय कारणासाठी कर्ज
 • लग्नकार्यासाठी कर्ज
 • खरेदीसाठी कर्ज

अशा अनेक वेगवेगळ्या वैयक्तिक कारणांसाठी तसेच वैयक्तिक गरजांसाठी वैयक्तिक कर्ज पर्सनल लोन दिले जाते.

पर्सनल लोन चे असणारे फायदे कोणकोणते आहेत

1) पर्सनल लोन घेण्यासाठी कमीत कमी कागदपत्रांची आवश्यकता असते

2 पर्सनल लोन घेण्यासाठी कोणतेही बँकेला कोणत्याही प्रकारची मालमत्ता दाखवण्याची गरज नसते तसेच तारण ठेवण्याची देखील गरज देखील नसते

3 इतर कर्जाच्या तुलनेमध्ये वैयक्तिक कर्जाची प्रक्रिया ही खूपच जलद गतीने असते

4 आपण आपल्या असणाऱ्या कोणत्याही कारणांसाठी वैयक्तिक कर्ज घेऊ शकतो

पर्सनल लोन चे तोटे कोणकोणते आहेत

1) मित्रांनो आपण जर वैयक्तिक कर्ज घेतले असेल आणि ते वेळेच्या आधी फेडले असेल तर आपल्याला एक ते पाच टक्क्यांपर्यंत अधिक दंड बसू शकतो.

2) पर्सनल लोन मध्ये बँकांचे व्याजदर हे इतर लोनच्या तुलनेमध्ये खूपच जास्त असतात.

3) पर्सनल लोन घेण्यासाठी सिबिल स्कोर हा 750 च्या अधिक लागतो.

4) पर्सनल लोन फेडण्यासाठी कालावधी हा कमी असतो.

पर्सनल लोन देणाऱ्या बँका कोणत्या आहेत

 • कोटक महिंद्रा बँक
 • एचडीएफसी बँक
 • आयडीएफसी बँक
 • आयसीआयसीआय बँक
 • ॲक्सिस बँक
 • स्टेट बँक ऑफ इंडिया
 • बँक ऑफ बडोदा
 • बँक ऑफ महाराष्ट्र
 • इंडियन बँक
 • युनियन बँक
 • पंजाब नॅशनल बँक

निष्कर्ष

मित्रांनो, वरील प्रमाणे दिलेली माहिती वैयक्तिक कर्ज याबद्दलची आपल्याला खूपच उपयोगी पडणार आहे. तसेच आपल्याला अडचणीच्या काळामध्ये पैशाची गरज भागवण्यासाठी वैयक्तिक कर्ज खूपच महत्त्वाचे असते.

मित्रांनो आपल्याला पर्सनल लोन याबद्दल दिलेली माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे. मित्रांनो आपल्याला पर्सनल लोन याबद्दल दिलेले माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच आपल्याला इतर लोन संदर्भात देखील माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की विचारा. तसेच पर्सनल लोन याबद्दल दिलेली माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत तसेच कुटुंबासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

Trending