Connect with us

Schemes

PMEGP Loan information in Marathi | पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना, अनुदान, पात्रता, कागदपत्रे, फायदे

Published

on

PMEGP Loan information in Marathi

PMEGP Loan information in Marathi: मित्रांनो, आपल्याला जर उद्योग सुरू करायचा असेल तर भारत सरकारची पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना ही खूपच आपल्याला महत्त्वाचे ठरणार आहे.

मित्रांनो आज आपण पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना काय आहे तसेच यामधून आपल्याला अनुदान कशाप्रकारे जास्त मिळू शकते याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.

चला तर मित्रांनो कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना काय आहे याबद्दल अगदी सविस्तर माहिती.

PMEGP Loan information in Marathi पीएमईजीपी कर्जाची माहिती मराठीत, पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना

केंद्र शासनाच्या सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्रालयामार्फत पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना अलीकडच्या काळामध्ये सुरू केलेले आहे.

या योजनेची अंमलबजावणी खादी ग्रामोद्योग आयोग आणि खादी ग्रामोद्योग बोर्ड यांच्या मार्फत केली जात आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये बेरोजगारांसाठी ही योजना राबविण्यात येत आहे.

पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेमध्ये किती अनुदान मिळते

पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेमध्ये ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील उद्योग सुरू करण्यासाठी 35 टक्के अनुदान दिले जाते.

पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेचे फायदे कोणकोणते आहेत

युवकांना तसेच प्रवर्गानुसार कर्ज घेण्यासाठी तसेच अनुदानाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते.

पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेअंतर्गत तसेच शहरी आणि ग्रामीण भागातील तरुणांना पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेअंतर्गत कर्ज घेण्याची सुविधा देखील मिळत असते.

बेरोजगार तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज दिले जात असते.

पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेसाठी पात्रता काय आहे

1) पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेसाठी 18 वर्षे पेक्षा जास्त वयाची व्यक्ती पात्र असणार आहे.

2) अर्जदार हा भारताचा कायमचा नागरिक असावा.

3) अर्जदाराची शैक्षणिक पात्रता किमान आठवी पास असणे गरजेचे आहे.

4) प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजनेसाठी सहकारी संस्था देखील कर्ज घेण्यास पात्र असतात.

पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेसाठी लागणारी कागदपत्रे कोणकोणते आहेत

1) प्रकल्प अहवाल लागत असतो.

2) आधार कार्ड लागत असते.

3) पॅन कार्ड लागत असते.

4) आवश्यक असल्यास विशेष श्रेणी प्रमाणपत्र लागत असते.

5) माजी सैनिक असल्यास प्रमाणपत्र लागत असते.

6) आपले जर शैक्षणिक आणि तांत्रिक अभ्यासक्रम पूर्ण झाले असेल तर प्रमाणपत्र लागत असते.

7) योग्य रीतीने भरलेला फॉर्म लागत असतो.

8) पासपोर्ट आकाराचे फोटो लागत असतात.

9) बँक पासबुक लागत असते.

प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजनेचा कर्ज परतफेड चा कालावधी किती असतो

1) कर्ज मंजूर झाल्यानंतर कर्ज वाटपापूर्वी लाभार्थ्यांनी संबंधित व्यवसायाचे उद्योजकीय प्रशिक्षण घेतले असणे अनिवार्य असते.

2) बँक कर्ज परतफेड चा कालावधी हा तीन ते सात वर्षापर्यंतचा असतो तसेच व्याजदर हा नॉर्मल असतो.

3) लाभार्थ्यास कर्जाचा पहिला हप्ता वाटप केल्यानंतर नोडल बँकेमध्ये मार्जिन मनी अनुदानासाठी पाठवली जाते.

4) तीन वर्षांमध्ये आवश्यक ती खात्री केल्यानंतर अनुदानित रक्कम कर्ज खात्यामध्ये पाठवली जाते.

प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजनेचे फायदे

1) प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत प्रत्येक बेरोजगार तरुणाला कास्ट कॅटेगिरी आणि राहत्या क्षेत्रानुसार अनुदान दिले जात असते.

2) प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत देशातील सर्व बेरोजगार तरुणांना स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडून कर्ज प्राप्त होत असते. तसेच या कर्जाची रक्कम ही कमीत कमी दहा लाख रुपये असते तर जास्तीत जास्त 25 लाख रुपये इतकी असते.

निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला जर व्यवसाय सुरू करायचा असेल तर आपल्याला प्रधानमंत्री रोजगार योजना ही खूपच उपयोगी पडणार आहे.

मित्रांनो आपल्याला प्रधानमंत्री रोजगार योजना या संदर्भात दिलेली माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.

मित्रांनो आपल्याला प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना या संदर्भात दिलेली माहिती कशी वाटली ते आपण कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच वरील प्रमाणे दिलेली माहिती आपण आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

Trending